Monday, 12 December 2016

थरार नळीच्या वाटेच्या ( भटकंती हरीचंद्रगडाची)


बेलपाड़ा गावातून दिसणारा कोकनकड़ा 
       हरिश्चंद्र गड हे नाव कुठे वाचनात आले की पहिला आठवत  तो कोकणकडा  निसर्गाची अद्भुत कलाकुसर,  गडावरील। तारामती शिखर  आणि त्यातच खडतर अशी  नळीची वाट 
             हरिश्चंद्रगडाचे भौगोलिक स्थान पण तसेच अद्भुत . हरिश्चंद्रगड हा ठाणे ,नगर, पुणे या 3 जिल्ह्यामध्ये विभागला गेला आहे ,  याच निसर्गाचे रौद्ररूपी सुंदरता अनुभवायला आम्ही जाणार होतो
           पुण्यातील गिरिदुर्ग या ग्रुप ने असाच भन्नाट रांगडा बेत आखला होता, हरिश्चंद्रगड (जाता नळीच्या वाटेने आणि येताना हि नळीच्याच वाटेने ) , हा थरारक बेत सह्याद्रीच मनस्वी दर्शन घडवणारा असणार हे माहिती होतं.  गिरिदुर्ग ने त्याच्या टॅग लाईन प्रमाणे ( सामर्थ्य सह्याद्रीचे) असा भन्नाट अनुभव देऊ केला  , या आधी कुणीही नळीच्या वाटेने खाली उतरल्याचे ऐकिवात नव्हते कारण जिथे चढणे इतके बिकट तिथून पुन्हा खाली त्याच वाटेने उतरणे हे केवळ स्वप्नवत !  पण आम्ही 25 भटक्यांनी ते स्वप्नं सत्यात उतरवले ते गिरिदुर्ग च्या सुयोग्य नियोजन आणि आपलेपणामुळे.
       2 दिवसाचा ट्रेक चा प्लॅन असलेने तयारीही आधीच करून ठेवली होती , मनाने तर केव्हाच कोकणकडा सर केला होता, फक्त शरीराने तिथे पोचणे बाकी होते .
           शुक्रवारी रात्री  fc रोड - नाशिक फाटा - आळे फाटा - माळशेज घाट - बेलपाडा असा प्रवास सुरु झाला . सर्व भटक्यांना घेऊन आम्ही निघालो खडतर उभ्या - आडव्या पसरलेल्या डोंगरवाटा सर करायला , त्यात धम्माल ,मस्ती आलीच , नाशिक फाट्यापासून सुरुवात झाली ती गाण्याच्या भेंड्याना  यावेळी वैदेही च्या ऐवजी सुरुवात केली नीलम आणि धनश्री ने , त्यात आमच्या मुलांतर्फे एकमेव असा The great Singer  रक्षित . एकंदर काय तर full to Entertainment ....
         रात्री 3.30 च्या सुमारास बेलपाडा या टुमदार गावी पोचलो . मस्त 2 तास समाज मंदिरात पडी टाकली , दऱ्याकड्याची, उन्हावाऱ्याची, सुखवणाऱ्या रानवाटा ची दृश्य स्वप्नातही रुंजी घालत होती , कोंबड्याच्या आणि थंडगार वाऱ्यामुळे हलकेच जाग आली . बाहेर मिट्ट काळोख पण अंगावर काटा आला मंद थंडीमुळे आणि समोरच्या दृश्यानेही , कारण ,पूर्वेला होती चांदण्या रातीनं मधवलेल्या आभाळाला छेदत जाणारी भव्य कोकणकड्याची अंधुक धूसर अंतर्वक्र रेषा!!!    
दिवस पहिला  -
         सकाळी introduction होऊन , सूचना देऊन .   सर्व भटक्या ट्रेकर्स ना मदत करणारे "कमळू पोकळेच्या " घरी मस्त गरम पोहे खाऊन सुरुवात केली रानोमाळ भटकायला, 

  बेलपाडा गावाच्या पूर्वेकडून नळीची वाट सुरु होते . आमच्या सोबत कमळू दादा सारखा माहितगार आणि प्रेमळ वक्ती वाट दाखवण्यासाठी होतीच
नळीच्या वाटेची सुरुवात 
 , 

जवळपास एक तास पायपीट केल्यावर डाव्या नळीच्या तोंडाजवळ येऊन थांबलो . इथून जवळपास 6 तास फक्त दगडामधून चालायचे होते , आता खरा कस लागणार होता . 5 मिं निवांत थांबून पायपीट चालू केली , सर्व ट्रेकर्स हळूहळू  नळीच्या वाटेने वरती चढाई करत होते , उभा तीव्र चढ , पाठीवरच्या वजनदार सॅकमुळे वेग मंदावला पण संध्याकाळी सूर्यास्त पाहायचा तर कोकणकड्यावरूनच हे एकच ध्येय डोळ्यासमोर ठेऊन वाटचाल सुरु ठेवली , उभ्या कातळ भिंतीमुळे सूर्य किरणे नळीच्या आत पोहचत नव्हती  तोच काय तो दिलासा , दोहोबाजूच्या उंचच कातळभिंतीमधून अजस्त्र धोंड्याच्या राशिवरून वरती चढत गेलो , वरती पहिला rockpatch आमची वाट पाहत दिमाखात उभा होता , तसा 40 फूट उंचीचा पण दरडीमुळे 25 फूट च चढावा लागतो . तो रोप बांधून पार केला ,  पुढे जाऊन आम्ही 8 जण डावीकडे वरती गेल्याने वाट चुकलो परत खाली येऊन उजवीकडील नाळेने वरती जाऊन थांबलो , आता मात्र सूर्य किरणे आमचा चांगलंच घाम काडत होती , 
रौद्रभीषण नाळ 


नाळेतून दिसणारे दृश्य 

डावी नाळ 


काही वेळाने आमचा वाटाड्या येऊन पुढील ट्रॅव्हर्स च्या वाटे वर रोप बांधून तयार ठेवला , आम्ही मोजकेच भटके वरती गेलो , बाकीच्यांना सुबोध दादा, जयेश दादा पाठीमागून वरती घेऊन येत होते . पुढे पुण्यातील दुसरा ग्रुप मधून आलेलं 3 भटके आणि मुंबई चा सोलो trekker सौरभ अशे आम्ही 8 जण वरती पोहचलो जिथून रतनवाडी ला जायला खाली आणि उजवीकडे हरिशचंद्र गडाकडे जायला वाट आहे तिथे .
निवांत क्षणी 

निवांत ठिकाणी अजिंक्य ,पूजा ,दत्तू भाऊ ,मित्रजित ,प्रतीक्षा 

अकेले अकेले (सायली,नीलम )
 तिथे थोडावेळ विश्रांती घेतली आणि कूच केलं पण निसर्ग असच थोडी आपणास त्याच रूप दाखवणारे , पुढे मातीतुन पाय घसरायला सुरुवात झाली ,पण तोही अडथळा पार करून वरती आलो . इथून उजवीकडील वाटेवर मार्गक्रमण केले पण पुढील वाट खूपच बिकट एका कडेला सरळ सोट कातळकडा आणि खाली अजस्त्र अशी नाळ ,  पुढे पठार येईल असे लक्षात होते पण पठार बराच वेळ लागल नाही , पुढे फक्त खोल दरी आणि थरकाप उडवणारा वारा , वाऱ्यामुळे सॅक हेलकावे घेत आमची भंबेरी उडवत होती , आणखी एक कातळ चढल्यावर पठारावर मधमाश्या गुणगुणत होत्या. पठार पार करून शेवटाला जाऊन झाडाखाली पडी घेतली , पाणी केव्हाच संपले होते त्यामुळे कुणाच्यातच त्राण शिल्लक नव्हता , शेवटी डावीकडील वाट धरली आणि समोर पहिला दर्शन झालं ते कोकण कड्याचं , काही वेळाने मंगळ गंगा नदीच पात्र पार करत पुढे आलो , तिथून मागे वळून पाहिले तर सुंदर नजारा आमच स्वागत करत होता , आजोबा डोंगर ,कात्राबाई , आणि खाली बेलपाडा गाव .   जवळपास 7.30  तासची पायपीट करत गडावर पोहचलो ,  भास्कर च्या झोपडीत मस्त लिंबू सरबत आणि पिठले भाकरी वर ताव मारला . दिवसभराच्या पायपीटीमुळे केव्हा झोप लागली ते समजलेच नाही. संध्याकाळी 5 च्या आसपास सर्व गिरिदुर्ग भटके गडावर दाखल झाले , सर्वांनी भास्कर च्या झोपडीतील पाणी पिऊन अमृत म्हणजे काय याचा अनुभव घेतला असेलच , तिथून सर्वांनी धाव घेतली ती कोकणकड्याकडे ,
सोनेरी उतरत्या उन्हात उजळलेल्या कोकण कड्याचं - एकाच वेळी हृदयाचा थरकाप उडवणार आणि त्याचवेळी उत्कट मनस्वी आनंद देणार दृश्य अनुभवत निवांत क्षण अनुभवत बसलो , दूरवरच्या धूसर गूढ शिखरांची टोकं नाह्यळण्यात कसला आनंद आहे ,हे समजायला ट्रेकर च काळीज हवं

kokankada 

         आमच्यासाठी आधीपासून टेन्ट ची सोय आधीच केली होती , त्यात थोडा वेळ बसून सकाळपासून अनुभवलेलं क्षण आठवले , काही वेळाने शेकोटी पेटवून मस्त धम्माल गाणी झाली , पण त्याचा भाग व्हायला मला जमलेच नाही , या निसर्गाची किमया पाहण्यात इतका गुंग झालो कि आजूबाजूला काय होतंय हे समजत देखील नव्हतं. रात्री मस्त डाळ भातवर ताव मारून झोपी गेलो , मात्र रात्री 1 नंतर सुटलेला प्रचंड थंडगार वारा आणि   चित्र विचित्र आवाज यामुळे झोप उडाली ती पुन्हा लागलीच नाही , टेन्ट तर कधी वाऱ्यावर उडून जातो याची भीती सतत वाटत होती  ,  तशी ती काळरात्र पहिल्यांदा अनुभवली.
दिवस - दुसरा   
  
      सकाळी 8 ला उठून  चहा नास्ता करून पुष्करणी तलाव आणि मंदिर पाहण्यासाठी निघालो , 20 मिनिटात पुष्करणी तलावाजवळ आलो , फोटो काढून निर्मळ  पाण्यात तारामती शिखराचे प्रतिबिंम्ब डोळ्यात साठवून शिवलिंगाकडे वाटचाल केली , इतकं थंडगार पाणी आणि गुहेमध्ये मधोमध भले मोठें शिवलिंग ,काय ते प्रचंड वैभव असेल जुन्या काळी याचा अंदाज सुद्धा करवत नाही , 


हरिश्चंद्रगडावरील मंदिर 

पुष्करणी 
तारामती शिखर वेध घेत होतं आम्ही कधी त्याला साधं घालतोय याची पण वेळेअभावी ते शक्य नव्हते .
कारण आम्हाला
डाव्या नळीची भन्नाट उतराई 
    Group फोटो उरकून आम्ही निघालो आणखी वेड साहस करण्यासाठी ,  काही जण प्रचंड घाबरलेले पण त्यांनीही दृढ निश्चय करून त्यांची पाऊले पुढे टाकली  . मला सर्वात मागून यायची सूचना मिळाल्यामुळे  बराच वेळ निवांत घालवायला मिळणार हे माहिती होते . एक एक पाऊल मोजत खाली उतरायला लागणार हे कळून चुकले कारण खाली उतरणे देखील खूप जोखमीचे होते , पुढचे जसे चालतील त्याच्यावर  आमची मागच्या सर्वांची चाल अवलंबून होती ,  थोडे खाली पोहचलो त्यावेळी कळून चुकले मी ,केदार ,सौरभ सोपी वाट सोडून दुसऱ्या कातळ चढून वरती पोहचलो होतो ,  असो हळू हळू सगळे खाली उतरत होते , रोप लावल्यामुळे थोडंसं सोपं नक्कीच झालं होतं . पुढे एक छोटा ओढा लागला त्यातून सगळे खाली आले , ओढा संपल्यावर कळाले काल आपण विनाकारण
डावीकडून निखिल ,धनश्री ,भोसले सर ,अक्षय ,मी ,विशाल 


निवांत 

आपण तंगडतोड करत फिरून गेलो , पठार पार करून खाली घसारड्या वाटेला तर जवळपास अर्धा तास बसून मस्त धम्माल जोक, गप्पा मध्ये तो वेळ कसा गेला हे समजलेच नाही , पुढे जाऊन पुन्हा कुठेतरी जाऊन थांबावे लागणार हे माहित होतं त्यामुळे आमची चाल आणखी मंदावली . त्यात आमच्यासोबत भोसले दादा त्यांनी केलेल्या ट्रेक चे अनुभव आमच्यासाठी वेगळी मेजवानीच होती , तसे सगळेच नवीन पण इतकी घट्ट मैत्री 2 दिवसात झाली हे अप्रूप च , सगळे एकमेकांना धीर देत एकमेकांना सांभाळत , एकंदर धम्माल करत खाली उतरत होते ,
दुपारी 2 वाजता आम्ही दुसऱ्या rockpatch जवळ गेलो पण  तिथून हळू हळू आमचे ट्रेकर्स खाली उतरत होते , जवळपास एक तासांनी आमचा no आला , काल जिथून रोप चा वापर न करता मी वरती चढलो होतो तिथे आज रोप बांधून खाली यावे लागेल असे वाट्लेदेखील नव्हते , खालचे नळीचे दृश्य इतके भयंकर होते की रोप लावून पण भीतीने अंग कपात होते , काल आपण हे हे दगड धोंडे पार करून वरती अलोट यावर माझा विश्वासच बसेना , का कुणी या वाटेने उतरत नाहीत याचा चांगलाच प्रत्यय आता येत होता.
   
      मजल दरमजल करत आम्ही खाली निम्मा वाटेवर आलो . तिथे आधीच सगळे  खात बसले होते , आम्ही तिथे थोडावेळ विश्रांती घेऊन पुन्हा मार्गक्रमण केले . मागे मी , धनश्री ,निखिल ,जयेश ,अक्षय ,विशाल ,शैलेश दादा, जय असे हे 9 जण निवांत गप्पा मारत , एकमेकांची खेचत ,tp करत इतकी प्रचंड नाळ कधी संपत आली ते समजले देखील नाही . 
कमलू  अणि दत्ता भाऊ 

नाळ संपायच्या थोड्या वरती "आमचा वाटाड्या कमळू " पाणी आणून दिले . गावाकडची माणसं  खूप गोड आणि निर्मळ मनाची आपलेपणा शिकावा तर त्यांच्याकडून , काही वेळाने 6 वाजता इतका अंधार पडला की काही दिसणार नाही हे माहिती होत , पण  चांदो मामा नि थोडी मदत केली , त्या moon light च्या प्रकाशात आम्ही पानवठ्या जवळ पोचलो , तिथे प्रतीक्षा ने ब्रेड मसाला तयार करून सर्वाना दिला , थोडासा पोटाला दिलासा . सुबोध दादा ने लिंबू पाणी करून वाटले , आता सर्वांनी एकत्र जायचं असे सांगण्यात आले , कारण जंगलात फसव्या पायवाट आणि त्यात काळोख त्यामुळे  ते पुढील 2 तास खूप भयावह होते . कुठून तरी दुरून गावातील light दिसली की इतका भारी वाटायचं , थोडा फार उत्साह यायचा पण" अभी भी मंजिल बहोत दूर ती" जवळपास 8.30 च्या सुमारास टॉर्च च्या आणि चंद्राच्या साथीने गावात पाऊल ठेवले .बरेच गाववाले आमच्याकडे पाहत होते, कारण आम्ही पादाक्रांत केली होती नळीच्या वाटेची उतरणं तेही 25 मावळयांसोबत कुणालाही दुखापत न होता , 
                एक छोटासा का होईना पण आम्ही जे ठरवले ते करून दाखवून आमचं आणि गिरिदुर्ग च्या सदस्यांचा स्वप्न पूर्ण केलं , 
                         सहभागी  भटके
छायाचित्र - दत्ता भाऊ , विशाल ,शुभम
वाटाड्या - कमळू पोकळे
टीम गिरिदुर्ग - सुबोध दादा, जयेश दादा, धनश्री, वैदेही, नीलम , कोमल, निखिल
 
आणि आम्ही 25 मावळे 
      
Following  photos taken by Jayesh , Mitrajit,  Pariksheet 

       
         

3 comments:

  1. Khupach chan, ase vatat hote ki mi tumchya sobat ch aahe.

    ReplyDelete
  2. Khupach chan, he vachun zalyavar ase vatat aahe ki aapan hi jaave.

    ReplyDelete