Monday, 12 December 2016

थरार नळीच्या वाटेच्या ( भटकंती हरीचंद्रगडाची)


बेलपाड़ा गावातून दिसणारा कोकनकड़ा 
       हरिश्चंद्र गड हे नाव कुठे वाचनात आले की पहिला आठवत  तो कोकणकडा  निसर्गाची अद्भुत कलाकुसर,  गडावरील। तारामती शिखर  आणि त्यातच खडतर अशी  नळीची वाट 
             हरिश्चंद्रगडाचे भौगोलिक स्थान पण तसेच अद्भुत . हरिश्चंद्रगड हा ठाणे ,नगर, पुणे या 3 जिल्ह्यामध्ये विभागला गेला आहे ,  याच निसर्गाचे रौद्ररूपी सुंदरता अनुभवायला आम्ही जाणार होतो
           पुण्यातील गिरिदुर्ग या ग्रुप ने असाच भन्नाट रांगडा बेत आखला होता, हरिश्चंद्रगड (जाता नळीच्या वाटेने आणि येताना हि नळीच्याच वाटेने ) , हा थरारक बेत सह्याद्रीच मनस्वी दर्शन घडवणारा असणार हे माहिती होतं.  गिरिदुर्ग ने त्याच्या टॅग लाईन प्रमाणे ( सामर्थ्य सह्याद्रीचे) असा भन्नाट अनुभव देऊ केला  , या आधी कुणीही नळीच्या वाटेने खाली उतरल्याचे ऐकिवात नव्हते कारण जिथे चढणे इतके बिकट तिथून पुन्हा खाली त्याच वाटेने उतरणे हे केवळ स्वप्नवत !  पण आम्ही 25 भटक्यांनी ते स्वप्नं सत्यात उतरवले ते गिरिदुर्ग च्या सुयोग्य नियोजन आणि आपलेपणामुळे.
       2 दिवसाचा ट्रेक चा प्लॅन असलेने तयारीही आधीच करून ठेवली होती , मनाने तर केव्हाच कोकणकडा सर केला होता, फक्त शरीराने तिथे पोचणे बाकी होते .
           शुक्रवारी रात्री  fc रोड - नाशिक फाटा - आळे फाटा - माळशेज घाट - बेलपाडा असा प्रवास सुरु झाला . सर्व भटक्यांना घेऊन आम्ही निघालो खडतर उभ्या - आडव्या पसरलेल्या डोंगरवाटा सर करायला , त्यात धम्माल ,मस्ती आलीच , नाशिक फाट्यापासून सुरुवात झाली ती गाण्याच्या भेंड्याना  यावेळी वैदेही च्या ऐवजी सुरुवात केली नीलम आणि धनश्री ने , त्यात आमच्या मुलांतर्फे एकमेव असा The great Singer  रक्षित . एकंदर काय तर full to Entertainment ....
         रात्री 3.30 च्या सुमारास बेलपाडा या टुमदार गावी पोचलो . मस्त 2 तास समाज मंदिरात पडी टाकली , दऱ्याकड्याची, उन्हावाऱ्याची, सुखवणाऱ्या रानवाटा ची दृश्य स्वप्नातही रुंजी घालत होती , कोंबड्याच्या आणि थंडगार वाऱ्यामुळे हलकेच जाग आली . बाहेर मिट्ट काळोख पण अंगावर काटा आला मंद थंडीमुळे आणि समोरच्या दृश्यानेही , कारण ,पूर्वेला होती चांदण्या रातीनं मधवलेल्या आभाळाला छेदत जाणारी भव्य कोकणकड्याची अंधुक धूसर अंतर्वक्र रेषा!!!    
दिवस पहिला  -
         सकाळी introduction होऊन , सूचना देऊन .   सर्व भटक्या ट्रेकर्स ना मदत करणारे "कमळू पोकळेच्या " घरी मस्त गरम पोहे खाऊन सुरुवात केली रानोमाळ भटकायला, 

  बेलपाडा गावाच्या पूर्वेकडून नळीची वाट सुरु होते . आमच्या सोबत कमळू दादा सारखा माहितगार आणि प्रेमळ वक्ती वाट दाखवण्यासाठी होतीच
नळीच्या वाटेची सुरुवात 
 , 

जवळपास एक तास पायपीट केल्यावर डाव्या नळीच्या तोंडाजवळ येऊन थांबलो . इथून जवळपास 6 तास फक्त दगडामधून चालायचे होते , आता खरा कस लागणार होता . 5 मिं निवांत थांबून पायपीट चालू केली , सर्व ट्रेकर्स हळूहळू  नळीच्या वाटेने वरती चढाई करत होते , उभा तीव्र चढ , पाठीवरच्या वजनदार सॅकमुळे वेग मंदावला पण संध्याकाळी सूर्यास्त पाहायचा तर कोकणकड्यावरूनच हे एकच ध्येय डोळ्यासमोर ठेऊन वाटचाल सुरु ठेवली , उभ्या कातळ भिंतीमुळे सूर्य किरणे नळीच्या आत पोहचत नव्हती  तोच काय तो दिलासा , दोहोबाजूच्या उंचच कातळभिंतीमधून अजस्त्र धोंड्याच्या राशिवरून वरती चढत गेलो , वरती पहिला rockpatch आमची वाट पाहत दिमाखात उभा होता , तसा 40 फूट उंचीचा पण दरडीमुळे 25 फूट च चढावा लागतो . तो रोप बांधून पार केला ,  पुढे जाऊन आम्ही 8 जण डावीकडे वरती गेल्याने वाट चुकलो परत खाली येऊन उजवीकडील नाळेने वरती जाऊन थांबलो , आता मात्र सूर्य किरणे आमचा चांगलंच घाम काडत होती , 
रौद्रभीषण नाळ 


नाळेतून दिसणारे दृश्य 

डावी नाळ 


काही वेळाने आमचा वाटाड्या येऊन पुढील ट्रॅव्हर्स च्या वाटे वर रोप बांधून तयार ठेवला , आम्ही मोजकेच भटके वरती गेलो , बाकीच्यांना सुबोध दादा, जयेश दादा पाठीमागून वरती घेऊन येत होते . पुढे पुण्यातील दुसरा ग्रुप मधून आलेलं 3 भटके आणि मुंबई चा सोलो trekker सौरभ अशे आम्ही 8 जण वरती पोहचलो जिथून रतनवाडी ला जायला खाली आणि उजवीकडे हरिशचंद्र गडाकडे जायला वाट आहे तिथे .
निवांत क्षणी 

निवांत ठिकाणी अजिंक्य ,पूजा ,दत्तू भाऊ ,मित्रजित ,प्रतीक्षा 

अकेले अकेले (सायली,नीलम )
 तिथे थोडावेळ विश्रांती घेतली आणि कूच केलं पण निसर्ग असच थोडी आपणास त्याच रूप दाखवणारे , पुढे मातीतुन पाय घसरायला सुरुवात झाली ,पण तोही अडथळा पार करून वरती आलो . इथून उजवीकडील वाटेवर मार्गक्रमण केले पण पुढील वाट खूपच बिकट एका कडेला सरळ सोट कातळकडा आणि खाली अजस्त्र अशी नाळ ,  पुढे पठार येईल असे लक्षात होते पण पठार बराच वेळ लागल नाही , पुढे फक्त खोल दरी आणि थरकाप उडवणारा वारा , वाऱ्यामुळे सॅक हेलकावे घेत आमची भंबेरी उडवत होती , आणखी एक कातळ चढल्यावर पठारावर मधमाश्या गुणगुणत होत्या. पठार पार करून शेवटाला जाऊन झाडाखाली पडी घेतली , पाणी केव्हाच संपले होते त्यामुळे कुणाच्यातच त्राण शिल्लक नव्हता , शेवटी डावीकडील वाट धरली आणि समोर पहिला दर्शन झालं ते कोकण कड्याचं , काही वेळाने मंगळ गंगा नदीच पात्र पार करत पुढे आलो , तिथून मागे वळून पाहिले तर सुंदर नजारा आमच स्वागत करत होता , आजोबा डोंगर ,कात्राबाई , आणि खाली बेलपाडा गाव .   जवळपास 7.30  तासची पायपीट करत गडावर पोहचलो ,  भास्कर च्या झोपडीत मस्त लिंबू सरबत आणि पिठले भाकरी वर ताव मारला . दिवसभराच्या पायपीटीमुळे केव्हा झोप लागली ते समजलेच नाही. संध्याकाळी 5 च्या आसपास सर्व गिरिदुर्ग भटके गडावर दाखल झाले , सर्वांनी भास्कर च्या झोपडीतील पाणी पिऊन अमृत म्हणजे काय याचा अनुभव घेतला असेलच , तिथून सर्वांनी धाव घेतली ती कोकणकड्याकडे ,
सोनेरी उतरत्या उन्हात उजळलेल्या कोकण कड्याचं - एकाच वेळी हृदयाचा थरकाप उडवणार आणि त्याचवेळी उत्कट मनस्वी आनंद देणार दृश्य अनुभवत निवांत क्षण अनुभवत बसलो , दूरवरच्या धूसर गूढ शिखरांची टोकं नाह्यळण्यात कसला आनंद आहे ,हे समजायला ट्रेकर च काळीज हवं

kokankada 

         आमच्यासाठी आधीपासून टेन्ट ची सोय आधीच केली होती , त्यात थोडा वेळ बसून सकाळपासून अनुभवलेलं क्षण आठवले , काही वेळाने शेकोटी पेटवून मस्त धम्माल गाणी झाली , पण त्याचा भाग व्हायला मला जमलेच नाही , या निसर्गाची किमया पाहण्यात इतका गुंग झालो कि आजूबाजूला काय होतंय हे समजत देखील नव्हतं. रात्री मस्त डाळ भातवर ताव मारून झोपी गेलो , मात्र रात्री 1 नंतर सुटलेला प्रचंड थंडगार वारा आणि   चित्र विचित्र आवाज यामुळे झोप उडाली ती पुन्हा लागलीच नाही , टेन्ट तर कधी वाऱ्यावर उडून जातो याची भीती सतत वाटत होती  ,  तशी ती काळरात्र पहिल्यांदा अनुभवली.
दिवस - दुसरा   
  
      सकाळी 8 ला उठून  चहा नास्ता करून पुष्करणी तलाव आणि मंदिर पाहण्यासाठी निघालो , 20 मिनिटात पुष्करणी तलावाजवळ आलो , फोटो काढून निर्मळ  पाण्यात तारामती शिखराचे प्रतिबिंम्ब डोळ्यात साठवून शिवलिंगाकडे वाटचाल केली , इतकं थंडगार पाणी आणि गुहेमध्ये मधोमध भले मोठें शिवलिंग ,काय ते प्रचंड वैभव असेल जुन्या काळी याचा अंदाज सुद्धा करवत नाही , 


हरिश्चंद्रगडावरील मंदिर 

पुष्करणी 
तारामती शिखर वेध घेत होतं आम्ही कधी त्याला साधं घालतोय याची पण वेळेअभावी ते शक्य नव्हते .
कारण आम्हाला
डाव्या नळीची भन्नाट उतराई 
    Group फोटो उरकून आम्ही निघालो आणखी वेड साहस करण्यासाठी ,  काही जण प्रचंड घाबरलेले पण त्यांनीही दृढ निश्चय करून त्यांची पाऊले पुढे टाकली  . मला सर्वात मागून यायची सूचना मिळाल्यामुळे  बराच वेळ निवांत घालवायला मिळणार हे माहिती होते . एक एक पाऊल मोजत खाली उतरायला लागणार हे कळून चुकले कारण खाली उतरणे देखील खूप जोखमीचे होते , पुढचे जसे चालतील त्याच्यावर  आमची मागच्या सर्वांची चाल अवलंबून होती ,  थोडे खाली पोहचलो त्यावेळी कळून चुकले मी ,केदार ,सौरभ सोपी वाट सोडून दुसऱ्या कातळ चढून वरती पोहचलो होतो ,  असो हळू हळू सगळे खाली उतरत होते , रोप लावल्यामुळे थोडंसं सोपं नक्कीच झालं होतं . पुढे एक छोटा ओढा लागला त्यातून सगळे खाली आले , ओढा संपल्यावर कळाले काल आपण विनाकारण
डावीकडून निखिल ,धनश्री ,भोसले सर ,अक्षय ,मी ,विशाल 


निवांत 

आपण तंगडतोड करत फिरून गेलो , पठार पार करून खाली घसारड्या वाटेला तर जवळपास अर्धा तास बसून मस्त धम्माल जोक, गप्पा मध्ये तो वेळ कसा गेला हे समजलेच नाही , पुढे जाऊन पुन्हा कुठेतरी जाऊन थांबावे लागणार हे माहित होतं त्यामुळे आमची चाल आणखी मंदावली . त्यात आमच्यासोबत भोसले दादा त्यांनी केलेल्या ट्रेक चे अनुभव आमच्यासाठी वेगळी मेजवानीच होती , तसे सगळेच नवीन पण इतकी घट्ट मैत्री 2 दिवसात झाली हे अप्रूप च , सगळे एकमेकांना धीर देत एकमेकांना सांभाळत , एकंदर धम्माल करत खाली उतरत होते ,
दुपारी 2 वाजता आम्ही दुसऱ्या rockpatch जवळ गेलो पण  तिथून हळू हळू आमचे ट्रेकर्स खाली उतरत होते , जवळपास एक तासांनी आमचा no आला , काल जिथून रोप चा वापर न करता मी वरती चढलो होतो तिथे आज रोप बांधून खाली यावे लागेल असे वाट्लेदेखील नव्हते , खालचे नळीचे दृश्य इतके भयंकर होते की रोप लावून पण भीतीने अंग कपात होते , काल आपण हे हे दगड धोंडे पार करून वरती अलोट यावर माझा विश्वासच बसेना , का कुणी या वाटेने उतरत नाहीत याचा चांगलाच प्रत्यय आता येत होता.
   
      मजल दरमजल करत आम्ही खाली निम्मा वाटेवर आलो . तिथे आधीच सगळे  खात बसले होते , आम्ही तिथे थोडावेळ विश्रांती घेऊन पुन्हा मार्गक्रमण केले . मागे मी , धनश्री ,निखिल ,जयेश ,अक्षय ,विशाल ,शैलेश दादा, जय असे हे 9 जण निवांत गप्पा मारत , एकमेकांची खेचत ,tp करत इतकी प्रचंड नाळ कधी संपत आली ते समजले देखील नाही . 
कमलू  अणि दत्ता भाऊ 

नाळ संपायच्या थोड्या वरती "आमचा वाटाड्या कमळू " पाणी आणून दिले . गावाकडची माणसं  खूप गोड आणि निर्मळ मनाची आपलेपणा शिकावा तर त्यांच्याकडून , काही वेळाने 6 वाजता इतका अंधार पडला की काही दिसणार नाही हे माहिती होत , पण  चांदो मामा नि थोडी मदत केली , त्या moon light च्या प्रकाशात आम्ही पानवठ्या जवळ पोचलो , तिथे प्रतीक्षा ने ब्रेड मसाला तयार करून सर्वाना दिला , थोडासा पोटाला दिलासा . सुबोध दादा ने लिंबू पाणी करून वाटले , आता सर्वांनी एकत्र जायचं असे सांगण्यात आले , कारण जंगलात फसव्या पायवाट आणि त्यात काळोख त्यामुळे  ते पुढील 2 तास खूप भयावह होते . कुठून तरी दुरून गावातील light दिसली की इतका भारी वाटायचं , थोडा फार उत्साह यायचा पण" अभी भी मंजिल बहोत दूर ती" जवळपास 8.30 च्या सुमारास टॉर्च च्या आणि चंद्राच्या साथीने गावात पाऊल ठेवले .बरेच गाववाले आमच्याकडे पाहत होते, कारण आम्ही पादाक्रांत केली होती नळीच्या वाटेची उतरणं तेही 25 मावळयांसोबत कुणालाही दुखापत न होता , 
                एक छोटासा का होईना पण आम्ही जे ठरवले ते करून दाखवून आमचं आणि गिरिदुर्ग च्या सदस्यांचा स्वप्न पूर्ण केलं , 
                         सहभागी  भटके
छायाचित्र - दत्ता भाऊ , विशाल ,शुभम
वाटाड्या - कमळू पोकळे
टीम गिरिदुर्ग - सुबोध दादा, जयेश दादा, धनश्री, वैदेही, नीलम , कोमल, निखिल
 
आणि आम्ही 25 मावळे 
      




Following  photos taken by Jayesh , Mitrajit,  Pariksheet 













       
         

Monday, 3 October 2016

Dhak Caves ( Thriling experince)


ढाक  भैरी  ( अचाट  वेड साहस )

                  आषाढ़ श्रावण सरींनी पर्वत नाहुन निघाला आणि हिरवागार शालू नेसलेल्या सह्याद्री ने पुन्हा साद घातली .  एक अचाट साहस ( Rappeling ) करण्यासाठी ढाक भैरी च्या सानिध्यात जाताना यावेळी वेगळाच उत्साह होता . मनाला ओढ लागली निसर्गाचं आणखी एक रौद्र रूप पाहण्याची ते सर्व मनोमन अनुभवायची .
                   सह्याद्रीच्या कुशीत आलं कि दिवाळीच्या सफाई घरातील सगळी जाळी जळमटं निघून जावीत आणि स्वछ वाटावं असं चैतन्यं घेऊन मन अगदी ताज तवांन होऊन जात . कोवळ्या गवताच्या पात्यावरून उडणार धुकं धुंद करून सोडणार असतं . जंगल जाग होत होतं . आणि मागे कुठेतरी पक्ष्याची शाळा भरत होती त्यांचा किलबिलाट अजूनही कानात घुमतोय . इथल्या तांबड्या लाल होत जाणाऱ्या नागमोडी वाटा चुकण्यात हि सुख अनुभवणं आहे . असा  तो सह्याद्री
                    कधीतरी कुणीतरी विचारतं " तुला काय मिळतं किल्ले डोंगरमाथे पालथे घालून ?" त्यांना प्रतिक्रिया देताना विचार पडतो कि कसं सांगावं , आम्हाला काय मिळतं ते . म्हणजे मी शब्दात सांगूच शकत नाही . याच उत्तर तुम्हाला स्वतः ला भटकंती केल्यावरच कळेल ,झोपेचं खरं सुख सहयाद्री गार जमिनीला पाट टेकल्यावरच कळेल , तिथल्या सायंकाळचा गारवा ,काताळातले अमृततुल्य पाणी ,डोंगरमाथे पालथे घालताना उमजणाऱ्या इतिहासाच्या पाऊलखुणा ,भूतकाळाच्या गुजगोष्टी सांगण्यास आतुर असलेली गुहांमधील निरव शांतता ,दुर्गाची दुर्गमता जाणवणारे बेलाग सह्यकडे ,असं खूप  काही . त्यात नवीन काही वाचलं पहिला मग मन स्वथ्य बसतं नाही मग त्यात सुट्ट्याची जुळवाजुळव आणि भिडूंची पण !!!!!


                 




    ढाक भैरी गुहा उभ्या कातळात २७०० फूट उंचीवर असलेली , कशी तयार झाली असेल हि गुहा आकलनापलिकडचा थक्क करून सोडणार हा प्रश्न इथे आलं कि सगळ्यांना पडतो , केव्हडी हि निसर्गाची किमया ,
             सकाळी ज्यावेळी कामशेत ला पोहचलो तेव्हा तांबडं फुटायला सुरुवात झाली , एक छोट्या गावात पहाटे चहा/कॉफी काही  मिळेल का या शोधासाठी केलेली पायपीट . त्यातच  रिमझिम पाऊस , अश्यात चहा आणि मस्त गरम भजी अहाहाः  . . . . . .. . . फक्कड नाश्ता झाला . काही वेळाने आणखी एक भिडू कामशेत ला पोहचला .  आम्ही मग कामशेत पोलीस स्टेशन शेजारी आमचे बस्तान बसवले .   सुबोध दादा आणि गिरिदुर्ग टीम ची वाट पाहू लागलो . त्यांनी डेक्कन - शिवाजीनगर -निगडी  मार्गे कामशेत गाठले . यावेळी  बसमधील  मज्जा मस्ती ,गाण्याच्या भेंड्या [ वैदेही चा आवाज  लहान पण गाण्याची सुरुवात तिनेच केली  असणार (तिचा तो मोठा  आवाजात गुणगुणायचा केविलवाणा प्रयत्न ) ]नक्कीच खूप मिस केलं   . असो काही वेळाने जांभवली गावात प्रवेश केला तेव्हा चौकातील गजबज आमचं स्वागत करून गेली . थोडे पुढे गेल्यावर कोंडेश्वर च्या मंदिराकडे जायला उजवीकडे एक वाट जाते तिथून खरा ट्रेक सुरु होतं .
कोंढेश्वर मंदिर 
           या मंदिरात महिलांना प्रवेश नाही असं काही ऐकायला मिळालं . त्याच उत्तर मात्र मिळालं नाही .
असो 
            सर्वांचा परिचय समारंभ संपून आणि भगवान दादा ने rappeling विषयी दिलेली माहिती आणि त्याचे अनुभव ऐकत ट्रेक ला सुरुवात झाली  . पावसामुळे ट्रेक खूप अवघड होतं चालला होता . सगळीकडे चिखल ,
छोटे छोटे धबधबे यामुळे वाट निसरडी झाली होती . थोडे वरती गेल्यावर निसर्गाचे अविस्मरणीय रूप पाहायला मिळालं . दोन्ही बाजूला खोल दरी . प्रचंड धुक आणि आजूबाजूला उमललेली कारवीची फुले त्यावर बागडणारी फुलपाखरे

त्या धुक्यातुन वाट काढत गर्द जंगलात पोहचलो . जवळ जवळ वासोट्याला आलोय असाच फील होता . काही वेळाने खिंडीत पोहचलो जिथून कर्जत ,ठाणे या ठिकाणावरून राजमाची आणि भीमाशंकर ला जायला वाट आहे . एकदम जुन्या ट्रेक ची आठवण आली . इथूनच कुठेतरी वाट चुकली होती राजमाचीची . असो ती खिंड पुन्हा चालून वरती आलो ढाक च्या किल्ल्याजवळ . इथून खरा कस लागतो आपल्या संयमाचा आणि मनाचा . इथून खाली उतरायचा हा विचारच ( एक वेड साहस ) थक्क करून सोडणारा . भगवान दादा च्या मागे सर्व जण हळू हळू एकमेकांना धीर देत येत होते . जरा जरी पाय घसरला तर मग कपाळमोक्ष च . आम्ही खाली उतरून बाकींच्यांना वाट दाखवत पुढे जात होतो . त्यातच छोटा पाण्यातील साप त्याचे पोहण्याचे कर्तब दाखवत होता . त्याला बाजूला केला आणि पुढे ज्या साठी इथे आलो होतो ते अगदी डोळ्यासमोर दिसत होत कधी एकदा तिथे जातोय असा वाटत होत .
दोर खंड 
     जवळजवळ १००  मीटर चा तिरका खडा कातळ आणि खाली खोल दारी . त्यातच रिमझिम पाऊस त्यामुळे थ्रिल आणखीनच वाढलं होतं . पहिला मी प्रयत्न करून बघू म्हणून पुढे गेलो ,पण पहिलच पाऊल घसरलं त्यावरून पुढे येणाऱ्या कठीण मार्गाचा अंदाज आला . मजल दर मजल करत एकदा खाली पोहचलो . तोपर्यंत बरेच ती खिंड पार करून आले होते . तिथे बांधलेले ते दोर नसते ते इथपर्यंत येन निव्वळ अशक्यच . पहिला जो कुणी इथे ते दोर लावून गेला त्याला मनापासून धन्यवाद .
लोखंडी साखळदंड 
   तिथून वरती गुहेपर्यंत जायला उभा १६० फूट उभा कातळ चडून जावा लागतो तो फक्त या लोखंडी साखळदंड आणि आपल्या स्वतः च्या आत्मविश्वासाच्या बळावरच एकदा चढायला सुरुवात केली आणि खाली थोडेसे जरी पहिला तर मग सॅम्पल सगळं इतक्या उंचीवर आपण उभे फक्त त्या दोरीच्या साहाय्याने .
getting from google 
   इथे उभे राहून फोटो काढायची इच्छा तर खूप होती पण धुके आणि पाऊसामुळे एकही फोटो काढता येत नव्हता . इथून फक्त ३० फूट वर कसाबसा चढलो तर पुढे जायला वाट मिळेना . पुन्हा खाली उतरू शकत नव्हतो . इथून खाली उतरणे हा विचार पण अनेकांना इतक्या पावसात घाम फोडू शकतो . थोडंसं आजूबाजूला पहिला एक वाट सापडली पण ३ फूट स्वतः ला वरती खेचायचं तेपण इतक्या उंचीवर तेपण एक दोरीला धरून . प्रयत्न केला आणि वरती आलो . वरून वाट पाहिला तर मी डाव्या बाजूने वरती आलो पण वाट तर उजव्या बाजूला होती . त्या माझ्या चुकीमुळे  इतरांना तर फायदा झाला निदान योग्य मार्ग तर मिळाला यातच कायतर सुख ... तिथून 
थोडे वरती गेल्यावर ७ पायऱ्या लागतात . ते पाहून थोडंसं रिलॅक्स वाटलं . वरतीही पायऱ्या असतील या विचाराने फास्ट गेलो तर वरती आणखी विचित्र वाट . तसे पहायला गेलं तर याआधी मी येऊन गेलेलो . पण ते विसरून आपण पहिल्यांदाच असे काहीतरी करतोय असा विचार केला तरच काय ती मज्जा अनुभवता येते . असो ती वाट ना तिथे धरायला काही, दगड असून त्याला धरता येतं नाही . आपण बरेच जण घरात शिडी वापरतो ( पुण्यात घोडा) असेही म्हणतात . तशीच'काहीशी वाट पण फक्त दोन झाडाचे बुंधे एकमेकात दोरीच्या साह्याने बांधलेले . 
शिडीची वाट 
त्यावरून वरती जायचं . पहिल्यांदा अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही . मनात नको ते विचार येतात . पन असो फारतर २० फूट राहिला होता . त्यामुळे हुरुफ आला होता . त्यात पहिला जाऊन त्या मंदिरातील घंटा वाजवायची होती . सावकाश एक एक पाऊल वरती घेत वरती आलो . स्वर्ग सुख काय म्हणतात ते इथे आल्यावर कळेल .शांत निरव शांतता . ज्यासाठी आलो ते पूर्ण केल्यावर जो आनंद होतो ना . याच साठी केला होता अठ्ठहास . माझ्या पाठीमागे नूतन , वैदेही आले .त्यांना वरती घेतलं . 
गुहेतून दिसणारे दृश्य 



मंदिर
                         

भगवान दादा आला आणि सोबत रॅपलिंग साठीच दोर आणि सेफ्टी हे सगळं एकटा घेऊन आला . जिथून माणूस यायचा अवघड तिथून इथे सामान घेऊन आला . काहीतरी वेगळा पाहतोय असाच वाटत होतं . असो जवळ जवळ १ तास झाला तरी आम्हा ४ भटक्या शिवाय गुहेपर्यंत कुणीही अजून आलेले नव्हतं . मिन आपलं हार्नेस बांधून नुसताच रॅपल्लिंग साठी तयार होऊन बसलो . पुढच्या अर्धा तासात ६ जण कसेबसे आले . मग रोप बांधून रॅपल्लिंग चा श्रीगणेशा केला अर्थात माझ्यापासूनच . भीती वाटत होती .त्यात ट्रायल माझ्यावर काही झालं तर फुकटचा गेलो तर .
rappelling 
जो rockpatch चढायला ३० मि लागले तोच खाली उतरायला ३ मी पण नाही लागले . पुन्हा वरती चालून गेलो आणि मंदिराच्या सुरुवातीला बाकीच्या ट्रेकर्सना मदत करत बसलो . त्यात मला कुणीतरी माझी सेफ्टी हि घेतली चक्क्य मला दोराने बांधून घातलं . खूप काठावर बसलो होतो . त्यामुळे  ३ वाजेपर्यंत ३४ जण गुहेपर्यंत आले . हळू हळू rappeling सुरु होतं . तिथे मदत करायच्या नादात माझ्याकडून  सुबोध दादाचा कॅमेरा भिजला आणि शेंदुराने माखला . मग जरा ओरडा  खाने रास्त च होतं . इतक्या विश्वासाने मला कॅमेरा दिला होता आणि मी त्याची अशी हालत करून ठेवली . असो पुन्हा एकदा rappelling करायची इच्छा होती पण अजून निम्मे   ट्रेकर्स खाली जायचे  बाकी होते  . सर्वात शेवटी निखिल आणि धनश्री लास्टच्या ट्रेकर्सना घेऊन वरती आले    .  जसा वरती आलो तसा खाली उतरून बघू म्हणून सुरुवात केली . मग कळून चुकलं खाली उतरणे किती अवघड आहे . 
खाली उतरलो . आणि बॅक तू खिंड . खिंड पार करून . माझा जंगल ट्रेक'सुरु झाला. इथे कसलाही गोंगाट नाही का शहरातील गाड्याचा आवाज नाही इथे फक्त मी ,जंगल आणि पक्ष्याचा किलबिलाट . पुढे गेल्यावर आमच्यातील आणखी ४ ट्रेकर भेटले . मग गावात येऊन पोहचलो तेव्हा ६ वाजत आले होते .  गावात मस्त चहा झाला . आमच्या बस च्या ड्राइवर चा आजचा अनुभव एकूण झाला ,कसा तो आज  जंगलात हरवला आणि कसा पुन्हा गावात आला . अनुप्रिता ,समीर ,नूतन ,पंकज आणि मी असा गप्पाचा कट्टा जमलेला ,गप्पा , आणि त्यांनी अनुभवलेले  real life  experince त्यात  कधी ७. २० झाले आणि अंधार पडलाय हेच समजले नाही काही वेळाने सर्व ३५ ट्रेकर्स rappelling करून जांभवली गावात परत आले . पावसात हा ट्रेक आणि rappelling केलं हे बऱ्याच ट्रेकर्स ना पटणार नि नाही . पण we 35 trekkers of giridurg have done that very sportingly .  


 snaps for my  phone last time visit
















Monday, 19 September 2016

Harihar Fort


हरिहर दुर्ग 


                              राजगडाच्या बालेकिल्ल्याहून दिसणारा सूर्योदय, रायगडाच्या बाजारपेठेतून अस्ताला जाताना दर्यायी सुवर्णरेखा चमकविणारा सूर्यनारायण , राजमाचीच्या जुळ्या किल्ल्यावरून दिसणार तळकोकनातील दृश्य ,प्रसन्नगडावरचा प्रसन्न निसर्ग , अणि अपरिचित गड़वाटा ,त्यांची निरव शांतता हे फ़क्त अणि फ़क्त अनुभवण्याचे क्षण `````````        त्यांना शब्दांच्या ओंजळीत कधीही कैद करता येणार नाही`````````` 
                             न रुळलेल्या पाऊलवाटेवरून भटकताना निसर्गाच्या नवनव्या रूपाचे दर्शन घडते , कधी धुक्यात हरवलेले गडमाथे शोधताना तर कधी त्याच धुक्याच्या  लोटात हरवत -ओळखीच्याच गडकोटांवर भटकताना दरवेळी काही नित्य नवे गवसल्याची अनुभूति येते ``````````     असाच  हरिहर दुर्ग 


गड्याच्या पायऱ्या 

गड  बेस ( निर्गुड़पाड़ा )

     महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात निसर्गाचे चमत्कार दडलेले आहेत  ` नाशिक जिल्ह्यातील  सेलबारी - डोलबारी रांग, अजंठा - सातमाळ रांग, त्र्यंबक रांग या डोंगररांगात अनेक गडकिल्ले आहेत. हरिहर किल्ला त्र्यंबक रांगेतील प्रमुख किल्ला आहे. प्राचिन काळापासून महाराष्ट्रातील बंदरात उतरणारा माल अनेक घाट मार्गांनी नाशिकच्या बाजारपेठेत जात असे. यातील त्र्यंबक रांगेतून जाणार्‍या गोंडा घाटावर लक्ष ठेवण्यासाठी हरीहर , भास्करगड यांची उभारणी करण्यात आली होती. हां दुर्ग गेली कित्येक दशके निसर्गाचे बदल अनुभवत आहे 
                वैशाखातिल दाहक उन असो किवा मृगातील बरसणार्या सरी प्रत्येक ऋतूत याचा श्रृंगार काही आगळावेगकच ` कश्या तयार केल्या असतील या उभ्या काळ्या कातळात असलेल्या पायऱ्या अकलनापलीकडचा  थक्क करणारा हा प्रश्न इथे आलेल्या प्रत्येकाला पडतो ` केवड़ी ही निसर्गाची कलाकुसर। 
                   सहयाद्रीच्या वेढान आज कित्येक जनाना झपाटून टाकलय।  त्यातील एक मि ` या पर्वतरांगा महाराष्ट्राच्या पाठिच कणा शोभतात 
                    

                    मि या आधी ३ वेळा हरिहर ( हर्षगड ) च्या कुशीत जाउन आलो होतो` पन अजूनही तो पाहण्याची हौस पूर्ण होत नाही , यावेळी मला निम्मित मिळाल पुन्हा दुर्ग सर करायचा  गिरिदुर्गच्या  काही  भटक्या मुळे। शनिवारी रात्रि डेक्कन - नाशिक फाटा  येथून आणखी काही ट्रैक्कर्स ना घेऊन निघालो , झोप तर प्रचंड आली होती , पण  वैदेहीने गाण्याच्या भेंड्या सुरु केल्या अणि बस मधील सगळे रथी महारथी सामिल झाले सर्वांच्यात इतका उत्साह होता की पहाटेपर्यन्त सर्वजन गुनगुनत होते , काही वेळाने चहाचा ब्रेक झाला सकाळी ७ च्या सुमारास गावातील सुंदर सकाळ अनुभवत आम्ही निरगुडपाडा या गावी पोहचलो 
    
    थोड्याच वेळात मस्त कांदेपोहे , चहा झाला , गिरिदुर्गच्या  सर्व ट्रेक्कर चा इंट्रोडक्शन होऊन सर्व शिलेदार मार्गस्थ झाले, गडावर जाण्याची पायवाट माहिती असलेने सर्वात पुढे मि वैदेही अणि मागे सुबोध दादा सर्वाना घेऊन येत होता , वाटेतील ओढ़े , पानवठे, आजुबाजूचा सुंदर निसर्ग पहात आम्ही कही अंतरावर येऊन थाबलो मागे पाहिले तर कुणीही दिसत नव्हते कुणाला फारसा ट्रेक अनुभव नव्हता त्यामुळे बरेच जान हळू हळू एकमेकाना साथ देत येत होते , सर्वाना सोबत motivate करत सुबोध दादा ,जयेश दादा पाठीमागून येत आले. तिथे एक फुलपाखरू मला अशिकाय साद घातली की त्या पाखराला पहायला जंगलात किती आतमध्ये आलोय याचा थांगपत्ता नव्हता खुप प्रयत्न केले पन त्याला कैमरा मधे साठवु शकलो नाही पुन्हा मगे आलो तर सर्वजन बरेच पुढे गेले होते। काही वेळाने सुबोध दादा दिसला तो तन्मय ,अनुश्री ताई ,स्नेहा ताई ला सर्वात शेवटी त्यांच्यासोबत हळू जात होता पुढे कहि अंतरावर निखिल ही दिसला। मग मि ,ताई , निखिल पुढे निघालो , दादा तन्मय ला घेऊन येतो असा म्हणाला, मला खरतर सर्वात आधी गड सर करायचा होता पन पुढे निम्मा वाटेत गेल्यावर गडाकडे पाहिले तर वैदेही नी पहिला दरवाजा सर केला होता मनातल्या मनात फुलपाखराला शिव्या घातल्या ( त्या पाखरामुळेच इतका वेळ झाला होता ) 
                         काही वेळाने निखिल ही पुढे गेला ,स्नेहा ताई बिनधास्त चालत होती पन अनुश्री ताई पहिल्याच रॉक पैच ला पाहून थांबली, तिला तो पैच सर करायला  कसेतरी तयार केल ,तस तो पैच पाहून कुणालाही धडकी बसेल असा तो उभा कड़ा त्यातच अधुन मधून येणारा थंडगार वारा सोबतीला रिमझिम पाऊस अणि सोबतीला गर्द धुके 
पहिला रॉक पैच 
         तो पैच पार करुन आम्ही त्या माझ्या सर्वात आवडत्या गडाच्या पायऱ्या जवळ आलो बरेचशे ट्रेक्कर वरती होते त्यामुळे फार कमी लोक त्या पायऱ्याजवळ होते तो एक चांगला sign होता पन ताई ला त्या पायऱ्यावरून घेऊन जाने तस खुप अवघड होते तिच्या चेहर्यावरून तर ती खुप घाबरली होती असच वाटत होते पन शेवटी तो अवघड पैच १५ मि मध्ये सर केला ,वरुन पाहिले तार खालची एकहि पायरी दिसत नव्हती , पन अनुश्री ताई च्या चेहर्यावरचा आनंद पाहून मलाही तिच्या हसण्यात माझाही छोटासा वाटा आहे हे बघुन थोड़ेस प्राउड वॉल माझे मलाच , ते आनंदी क्षण कैमरा मधे कैद केले अणि पुढे निघालो 


गडाच्या पायऱ्या 
      मजल दरमजल करत आम्ही गडाच्या दुसऱ्या पायऱ्याजवळ आलो तर तिथल्या प्रचंड पाऊसमुळे काही पायरावरून पाय सटकट होते एकमेकांना हात देत वरपर्यंत आलो , हाताचे एक बोट ही किती उपयोगी असते याचा प्रत्यय अला होता , अणि आधार या शब्दाच्या प्रैक्टिकल अनुभव घेतला , कही अंतर चालून गेलो तार सर्वजन आमची वाट पाहत बसले होते , तिथे गेल्यावर एक वेगळीच गम्मत ( कुणीतरी अफवा पसरवाली की मला चक्कर अली) पुन्हा त्या फुलपाखरांचा उद्यार झाला। तिथे पुढे आपले आवडतं ( एव्हाना माझ्यातला फोटोग्राफर जागा झाला होता ) मग डोळ्यामधे साठवलेले दृश्य कैमरा च्या फ्रेम मधे कैच करने चालू , मग पराठा ,दही, चटनी वर मनसोक्त ताव मारला अणि त्यातच आपले पूर्वज होतेच आमचे ( रेडी तो ईट ) चे सर्व खायला , माकड़ानी चांगलाच हैदोस घातला , त्यातच अजिंक्य ला कुठेतरी धनुष्यबाण सापडला मग बरेच ग्रुप फोटो , सेल्फी स्टिक (स्वयंप्रतिमाकहेचकदुरसंचालितदंडुका ) ने फोटो काढून झाले ,  पन नेमका माझ्या मोबाइल बंद पडला मग सिमरन च्या मोबाइल वरुण मनसोक्त फोटो काढून झाले काही गोल्डन moment capture करायचे रहूँ गेले पन हेच माझ्यासाठी पुन्हा त्या गडावर जायचे रीज़न आशु शकेल। 
काही वेळाने आम्ही खाली उतरायला लागलो। 
        खरी रिस्क ही गड चढनापेक्ष्या उतारण्यात आहे हे माहिती होते कारन खाली पहिलेतर पूर्ण धुक्याचे साम्राज्य पसरलेले असते खालची पायरी कुटे आहे हे शोधाव लागत मि त्या दोन्ही ताई ना घेऊन उतरत होतो खरी कसरत त्या वेळी करावी लागत होती , त्यात पाठीवर सैक त्यात अनुश्री तै तिची सैक घेऊन उतरायला खुप अवघड जाट असल्याने तिची ही सैक पुढे गळ्यात अडकवून मि पहिला एक एक पायरी उतरून खाली यायचो मग त्याना हळू हळू खाली घेऊन अलो , दुसऱ्या दरवाज्या जवळ तर इतकी अरुंद जागा आहे की तिथे फक्त एक व्यक्ति कसेतरी त्यातून येऊ शकतो त्यातच मुंबईहून एक ग्रुप वरती येत होता त्यामुळे पूर्ण पायऱ्याजवळ जागोजागी ट्रेकर्स अडकून होते त्यातून वात काढून खाली येन खुप अवघड काम होते पन फाइनली मिशन accomplished . नंतर मग आलेल्या वाटेने परत जायला निघालो, मधे बराच पाउस पडून गेल्याने सगळीकडे चिखल माजला होता त्यामुळे घसरण ही खुप वाढली होती , बरेच ट्रैक्कर्स घसरून पडले कुणी नैचरल घसरगुंडीचा अनुभव घेतला त्याच्यावर झालेले जोक ,धम्माल मस्ती करत ,
आम्ही ३ ला आमच्या स्टार्टिंग पॉइंट ला पोहचलो , 
                   तस जाताना निम्मा वाटेपासून ते येताना आम्ही तिघे एकत्र होतो त्याना सुखरूप वरती गडावर चढवून पुन्हा खाली येताना केलेली कसरत माझ्यासाथी एक शिदोरी होती ,त्यांचे  ट्रेक छे अनुभव , 
बाकीच्या इतर गप्पा, ट्रेक दरम्यान झालेल्या गमती जमती ,माझ्यासाठीचा नविन अनुभव ( जबाबदारी थोड़ा मोठा शब्द वाटतो ) पण त्याची नकळत झालेली जाणिव ,ती जबाबदारी मि नीट हाताळू शकलो की ते नाही माहित पन किमान थोड्याफार प्रमाणात टी पूर्ण झाली ,निसर्ग आपल्याला खुप काही शिकवतो सह्याद्रीच्या या open university मधे अजुन बरेच शिक्षण घ्यायचे बाकी आहे, 

                               गिरिदुर्ग सोबत चा माझा दूसरा ट्रेक माझ्या चांगलाच स्मरणात राहिला , आपन बरेच जन स्वताला चांगला ट्रेक्कर मानत असतो पन त्याची खरी लायकी ही अश्या सह्याद्री च्या कुशीत वसलेल्या या ३७०  गिरिदुर्गाची मोहिम केल्यावरच कळते। 
                            

           


          

Monday, 29 August 2016

Chandan Vandan Fort

ट्रेक to चंदन वंदन दुर्ग 
चंदन वंदन दुर्ग




       चंदन वंदन  दुर्ग  ,  आपल्या  जवळच आहेत  हे कदाचित बऱ्याच जणांना माहितीही नसेल .
मीपण  तुमच्यासारखा आम्हीही अनभिज्ञ होतो  ... 
                             रविवार हा आपल्यासोबत खूप काही घेऊन असतो .. काहीजणांसाठी विश्रांती , सुट्टी ,... पण माझ्यासारख्या भटक्यांसाठी एक पर्वणी  ..... या रविवारी कुठे भटकायचं हा विचार करत असताना .. फेसबुक ( त्या झुक्याचे पब्लिक बुक ) वर ( गिरिदुर्ग ) या ग्रुपवर  हा ट्रेक आहे ..असा वाचलं ... मग. लगेच ठरवलं या रविवारी चंदन वंदन दुर्गभ्रमंती   ....... 
                           
                             या पूर्वी या दोन दुर्गाबद्दल काहीही ऐकलं नव्हतं ... त्यामुळे उत्सुकता आणखी वाढली  होती .. गूगल केलं तरी फारसी माहिती मिळाली नाही ....
                           
                            चंदन वंदन दुर्ग ३२०० फूट उंच ..दोन्हीही भव्य पण त्याकडे नेहमीच दुर्लक्ष्य होत आलेलं .... त्यामुळे  त्याच्या विकास आजतागायत  झालेला नाही ... दुर्गावर पाहण्यासारखं' काहीही नाही ....एक दोन पाण्याची टाकी ,काही शिल्लक अवशेष ... पण आजूबाजूचा  परिसर पाहिल्यावर डोळ्यावर विश्वास बसणार नाही असा दृश्यं पहावयास मिळतं ....


                           
परिसर



                     मी रविवार ची जितकी आतुरतेने वाट पाहतो .. तितकी अजून कशाचीही नाही .. 
            आज रविवार सकाळी ६ ला जायचं असल्याने .. पहाटे ५ वाजता उठून .. राजाराम पुलाजवळ जाऊन बसलो .... आज माझ्यासारखे अनेक भटके सिंहगडच्या दिशेने जाताना दिसत होते... 
           मीपण सुबोध दादा आणि गिरिदुर्ग टीम ची वाट पाहू लागलो ... त्यातच सकाळी सकाळी कुणी मंत्री आणि त्यांचा भलामोठा ताफा तिथून गेला ... त्यांच्यामुळे विनाकारण इतरांना त्रास ... असो काही वेळाने आमची  बस आली ... बस मध्ये बसलो पण'त्यात सगळेच अनोळखी १४ .... थोडक्यात (एकटा जीव सदाशिव) अशी काहीशी माजी गत ...पुढे सिंहगड रोड कात्रज मार्गे एक्सप्रेस वे गाठला .. अंतर फारसं नव्हतं.. जास्तीत जास्त २ तास लागतील असा अंदाज होता.. वाटेत ट्राफिक नव्हते पण  मात्र ट्रॅफिक पोलीस  हजर .. एकदा थांबवले ठीक आहे.. पण ३ ठिकाणी पाहुणचार झाला .... वाटेत चहा,नास्ता  झाला ... आम्ही finally १० वाजता बेलमाची या छोट्याश्या गावी पोचलो .. 
                     
बेलमाची गावातील मंदिर 
    सर्वानी गोल 'रिंगनं केलं .. ओळख झाली ..  त्यातील बरेचसे मल्टिनॅशनल कंपनी चे होते . त्यातील ७ जणांचा हा पहिलाच  ट्रेक होता . त्यात सुबोध दादा  गेली १३ वर्षे ट्रेकिंग करतोय १६५+ किल्ले पालथे घातलेत त्याने .. ( he  was  Inspiration  for me ) . आमच्यासोबत  एक  छोटा ट्रेकर ऋग्वेद हि होता . त्यानेही २६ ट्रेक केले आहेत . वयाच्या ४ त्या  वर्ष्यापासून हा छोटा चमू ट्रेक करतोय .. तस नवलच पण  THat is  Fact . ओळखीनंतर   ट्रेक ला सुरुवात झाली . त्यावेळी वाटलं नव्हतं कि इतका वेळ लागेल .. त्यातच नेमका कोणता दुर्ग आधी 'पहायचा  यांवर एकमत नव्हतं .. मग शेवटी ठरलं कि दोन्ही दुर्गाच्या मध्ये पठारापर्यंत जायचं आणि मग ठरवायचं  .. सुरुवातीला जयेश दादा ,मध्ये  आम्ही सर्वजण आणि मागे अनुभवी सुबोध दादा . असा मजल दरमजल करत निसर्गाचे विलोभनीय रूप पाहत आम्ही एकामागे एक असा चाललो होतो . काही वेळ चालत गेल्यावर लक्ष्यात आले कि आपण वाट चुकलोय . मग पुन्हा सुबोध दादा च्या मागे चालणे भागच होते त्याला एकट्याला वाट माहिती होती
 . 
बेस स्टार्ट 
        थोडेसे पुढे गेल्यावरच थकायला झालं . थोडावेळ बसलो आणि मग ठरवलं पठार आल्याशिवाय आता थांबायचं नाही . आता मात्र मूळ पायवाट सापडली होती . जाताना सर्वांचं फोटो,सेल्फी घेणं चालूच होत.. असे दृश्य पाहून कुणीही फोटो काढल्याशिवाय राहनारच नाही .. काही वेळाने पठाराजवळ पोचलो . बरेच  ट्रेकर्स अजून खूप लांब होते . त्यामुळे फोटोग्राफी खूप स्कोप होता . पण त्यावेळी लक्ष्यात आलं कॅमेरा तर घरीच विसरला . मोबाईल होता . पण जी गम्मत    Digital Single -  lens reflix camera  ( DSLR ) ने आहे ती गम्मत मोबाइल च्या कॅमेराला नाही . एक मात्र होता जितका थकवा पठारापर्यंत यायला झाला होता तो क्षणार्धात निघून गेला .
Beautiful in rainy season


Ibrahimpur villege
           थोड्या वेळाने जयेश दादा पठारावर  आला त्याच्याकडे कॅमेरा बघितला . त्याच्याकडे मागितला त्याने लगेच दिलादेखील मग कॅमेरा आणि निसर्गाने जे काही दाखवले ते अद्भुतच . त्याचे शब्दात वर्णन करणे खूप अवघड आहे  
                                         काही वेळाने गड्याच्या मोडकळीस आलेल्या पायऱ्या दिसल्या
वंदन गड 

काही वेळाने गडावर पोचलो . गडाचा दरवाजा आता दगडमातीने झाकला गेलेला'आहे .
दरवाजा 
तिथून पुढे गेलो तर गडावर २ दर्गा, ३ पाण्याची तलाव या  शिवाय काहीही नाहीये . 
दर्गाह 

तलाव 
तिथेच  मस्त जेऊन घेतले आणि परत माज सर्वात आवडता काम फोटोग्राफी चालू .. काही'वेळाने पुन्हा खाली उतरायला गेलो . तिथून भगवा दिमाखात फडकत असताना दिसला . मग तिथे गेल्याशिवाय इथे येऊन गेल्याचे सार्थक होणार नाही . एक छोटोशी वाट डावीकडून भगव्या झेंडयाजवळ जाते .
भगवा 
     तिथे  सुबोध  दादाने खड्या आवाजात    
प्रौढप्रताप पुरंदर 
क्षत्रिय कुलावतंस 
सिंहासनाधीश्वर 
गो ब्राह्मण प्रतिपालक 
भोसले कुलदीपक 
हिन्दवी साम्राज्य संस्थापक 
मुघल जन संघारक 
श्रीमान योगी 
योगिराज 
बुद्धिवंत 
कीर्तिवंत 
कुलवंत 
नीतिवंत 
धनवंत 
सामर्थ्यवंत 
धर्मधुरंधर 
श्रीमंत  श्रीमंत श्रीमंत 
महाराजाधिराज 
छत्रपति शिवाजी महाराज की 

ही  घोषणा दिल्यावर  सर्वांच्या मुखातून आपसूकच               जय      हे उद्गार  आले . 




            पण फोटो काढताना एक गम्मत आणखी घडून गेली . जयेश दादा ची कॅमेरा ची बॅग वाऱ्याने खाली पडून एका झाडामध्ये अडकली . त्यांची बॅग काढताना जे स्कील वापरलं . त्यातून पण खूप काही शिकण्यासारखं होतं ..... 
                                त्यानंतर काही वेळाने  गड  उतरायला सुरुवात केली . उतरताना कुणी पडले ,कुणी घसरले , त्यामुळे सर्वजण अगदी सावकाश चालत होते . कठीण ठिकाणी एकमेकांचा हात पकडून त्यांचं मनोबल वाडवत . मज्जा मस्ती करत सर्वानी चंदन गडाच्या दिशेने कूच केली . चंदन गडाला जायला पठारापासून उजव्या बाजूने एक पायवाट आहे तिथून जात येत . 


नकाशा 
काही वेळ चालून झाल्यावर पुढे कुणीच दिसेना . आपणच ४ जण मागे आहोत .हे कळल्यानंतर झपाजप पाऊल उचलत गेलो काही अंतर गेल्यावर छोटा ऋग्वेद दिसला . मग फोटो काढणं चालू . पूर्ण गडाला traverse मारून एक कठीण patch पार करून गडाच्या रेलिंग जवळ पोचलो . यावेळी मात्र पहिल्यांदा मी,सिमरन,ऋग्वेद ,आणि दानिश तिथे पोचलो . बाकीचे निवांत हळूहळू येत होते . तिथे बसून मस्त पाठ टेकवली आणि सर्वांची वाट पाहू लागलो . १५ मिनिटांनी सर्वजण आले . तिथून सर्वजण एकत्र वरती गडावर गेलो फेरफटका मारला . काहीही मात्र विश्रांती घेणं पसंत केलं . चंदन गडावर कुठेही पाणी नाही असा ऐकलं होतं . मात्र एक विहीर दिसली त्यातून पाणी कसेतरी जेमतेम एक बाटली पाणी भरून घेतले 
काही वेळाने मस्त फोटोशूट झाले तिथे एक वडाचे झाड आहे . त्याच्यावर चडून सर्वानी फोटो काढले .
                                        
तिथे थोडावेळ बसून खाली उतरायला सुरुवात केली . पुन्हा त्या पठारावर जाऊन थांबलो . चंदन गडावरून येताना मात्र बहुतेक सर्वजण खाली  बसूनच उतरले . खूप घसरणीचा भाग पूर्ण करून आम्ही पठारावर आलो . 
तिथून मात्र almost १५ मिनिटात खाली पायथ्याजवळ आलो . यावेळी पण मी पहिला ,
त्यानंतर सिमरन,नंतर सुमित अशे एका पाठोपाठ एक सगळे खाली आले . खाली जाऊन पहिला पाणी शोधला . तिथल्या लोंकानी आम्ही तिकडे येतोय पाहिल्यावर आम्ही पाण्याची सोया केली . काहीवेळ त्या लोंकाची गप्पा मारल्या . गावातील लोक खूप निर्मळ मनाची असतात याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला. तिथे बकरीच्या पिल्लासोबत .  फोटो काढले . थोड्या वेळाने मस्त ताक . आणि पुण्याकडे मार्गक्रमण चालू झाले . येताना सर्वांशी बऱ्यापैकी चांगली ओळख झाली होती . त्यामुळे मज्जा,मस्ती ,चालूच होती.  त्यातच सुबोध दादा ,कोमल , यांनी'गाण्याच्या भेंड्या लावायच्या असा विचारला ? . त्याने दोन गट केले मग काय सगळे सुप्त कवि उदयास आले ,तिथून ज्या भेंड्या सुरु झाल्या त्या पुण्यापर्यंत चालूच होत्या . हिंदी,मराठी,जुन्या नव्या गाण्यांची मैफिलच जणू रमली होती . जे निखळ हसू गाणी गाताना दिसत होत ना तेच खूप सार्थकी होत . एकदी मनापासून काहीही काम केलं तर ते सफल होतच. हे या ट्रेकमुळे आणि या मित्रामुळे अनुभवायला मिळाला . 


गिरिदुर्ग  सोबतचा हा तसा माझा पहिला ट्रेक . पण असे कुठेही वाटली नाही . सुबोध दादा ,जयेश दादा हे आपल्यापैकीच एक आहेत असे वाटत होता .यांच्याकडून नव काहीतरी अनुभवायला मिळाला. त्यासोबत नवीन मित्र मिळाले . आणखी दोन दुर्ग पूर्ण झाले . 








Histroy     ;-  Getting from google 

History of the fort: According to the evidences of copper-inscriptions(Tamralekh) of 1191-1192 B.C., these forts were built-up by king Bhoj II of Shilahar dynasty. Shivaji Maharaj overpowered Chandan-Vandan along with Kalyangad, Sajjangad, Ajinkyatara during the campaign of Satara in 1673. Later, during the regime of Sambhaji, Amanullah Khan attacked the troop of Maratha soldiers on Chandan-Vandan. 25 horses, 20 guns, 2 ensigns, 1 kettle-drum were lost in the hands of Mughals in this battle. Marathas ruled this region up to 1689 B.C. Afterwards Mughals ruled this fort. In 1707, Chhatrapati Shahu Maharaj won this region during rainy season. In 1752, Dadopant was accompanied by soldiers by Balaji Vishwanath to keep close watch on Tarabai. Later, British ruled over these forts