Monday 12 March 2018

सह्यगिरीतील 360 सेकंद

             सह्याद्रीतील अशी ३६० सेकंद . ज्यासाठी किमान एक - दीड वर्षे खर्ची गेलीयेत ,ती ३६० सेकंद एका अवलिया भटक्यांसाठी, उकृष्ठ कलाकारांसाठी सह्याद्रीने मंतरलेली निसर्गरूपी चादर च ..
          आपण आज या प्रवासात कोणत्याही गडकिल्ल्यावर वा घाटवाटेत विहार करणार नाहींआहोत तर सह्याद्रीशी प्रामाणिकपणे केलेल्या कार्याचा मागोवा घेणार आहोत , चला तर मग सफर करूया निसर्गाच्या कलाकुसरीची... आणि  कलाकाराच्या कार्याची


          आज थोड्या वेगळ्या विषयाचा मागोवा घेतोय , बऱ्याच जणांना अजूनही प्रश्न पडला असेल हा सारखा ३६० चा जयघोष करतोय पण ते नेमकं काय . तर ही छोटीशी ६ मिनिटांची सह्याद्रीच्या कलाकुसरीची शॉर्टफिल्म .  एक भटका जिवलग मित्र अनिकेत कस्तुरे याने एका ध्यासाने केलेली प्रायोगिक तत्वावर केलेलं चित्रीकरण . आज त्याने केलेल्या अथक परिश्रमाचं फळ आज 10000 लोकांच्या नजरेत दिसतंय . एक छोटी पण अतिशय महत्त्वाची एक पायरी आज सर झालीये त्याच  या सह्याद्री पार्ट1 या चित्रफितीचा हा घेतलेला मागोवा .....


         आपला सहयाद्री हा खऱ्या अर्थाने पर्वत नसून ती दख्खन पठाराची विभंग कडा आहे . सह्याद्रीला संपूर्ण जगात सह्याद्री या त्याच्या अस्तित्व रुपी नावाने लौकिक जिवंत ठेवणे त्याचे अवर्णनीय सौन्दर्य कॅमेराच्या माध्यमातून चित्ररूपी रुपात रंगवणे हेच ध्येय । ध्यानी मनी फक्त हाच वसा घेऊन सुरुवात केली खरी , पण कोणतेही काम अगदी सहज सुलभतेने झाले तर त्याची कष्टाची चव चाखता येत नाही . अनिकेत पुढे तर एक भली मोठी कोकणकडया सारखी अभेध्य मोठी भिंत उभी होती . असंख्य अडथळे ,खाच खळगे हे सर्व परिक्षा घेण्यासाठी उभे होतेच . 


              सुरुवात झाली ती ज्येष्ठा मेघांनी पण तोच सर्वात मोठा अडथळा ....( एखाद्य शिल्प आपल्याला प्रचंड भावतं खर . पण त्यामागील कथेचा आपण कधी जाणीवपुर्वक विचार केलाय का . हा पण एक संशोधनाचा विषय असो . त्या कालाकुसरीला रूप देणारा तो म्हणजे शिल्पकार आणि त्याचे हत्यार . ) .....सह्याद्रीला चित्रफितीत कैद करण्यासाठी छायाचित्रकाराचे  हत्यार  ते म्हणजे स्वतः च्या जीवापेक्ष्या प्रिय असा  त्याचा कॅमेरा .. म्हणून मी ज्येष्ठा च्या मेघांना  सर्वात मोठा अडथळा म्हणालो . पावसात  कॅमेरा घेऊन चित्रीकरण करणं हे खुप मोठं दिव्य काम म्हणता येणार नाही ...बरेच जण म्हणतील त्यात काय एवढं सेफ्टी घेऊन चित्रीकरण करायचं पण सह्याद्रीच्या नभांसोबत हे असला वेढ  धाडस करणं हे काही खायचं काम नाही. सह्याद्रीच्या अनवट पायवाटा तुडवायच्या तेपण सगळा संसार घेऊन .  सोबतीला एकमेव साथीदार तो म्हणजे सह्याद्रीच त्याचा तो मित्र  कोसळणारा प्रचंड पाऊस आणि निसरड्या वाटा ...



                यापुढील  behind the scenes अनिकेत कडून ऐकलंय आणि पाहिलंय .. त्याचेच शब्दांकन माझ्या शब्दात ... हे असे …....…
                   नुकतच भटकू लागलो होतो . कोणतरी फोन करावा .. येतोयस का इकडे चाललोय तिकडे चाललोय भटकायला .. आपण always रेडी . बॅग तर तयारच असते . जरा खाऊ टाकला पाणी भरून घेतलं. की ठोकली ना धूम...... पण आता एका संकल्पपूर्तीसाठी प्रयत्न करायचे व संकल्प सिद्धीस घेऊन जायच . हाच ध्यास असलेने योग्य नियोजन करणे भागच होते. पहिला कॅमेराच्या गौडबंगाल मोठं... कॅमेरा क्रॉप सेन्सर .. त्यावर फुल्लफ्रेम चा result काढायचा  प्रयत्न. त्यासाठी करावे लागणारे जुगाड .. त्याची सोय करायची. प्रवासासाठी स्वतः ची गाडी नाही ... मग" गाव तिथे एस टी " ही संकल्पना आपल्यासाठी च . याची चांगलीच जाणीव झाली .  सगळा संसार सोबतीला घेऊन महामंडळाच्या एस टी चा प्रवास हेपण एक मोठं दिव्य.. त्यात त्या वर्षी पावसाला पण प्रचंड चेव चढलेला .. तो काय विश्रांतीचे नावच घेईना. त्या पावसाने कॅमेराला कवेत घेतला की झालं तर . अख्ख आयुष्य टांगणीला. करिअर वरच पाणी .. फिरायचं . असे नानाविविध प्रश्न सोबतीला होते. 



            वर्षभर हळूहळू . सर्व छायाचित्रण पूर्ण केलं. त्या संपूर्ण वर्षात .. जे काय काय भोगलंय. ते आठवलं तरी आजही अंगावर काटा येतो.  धड आपण खुप कामवतोय असेही नाही..  पैसे नसताना पोटाला चिमटे काढून दिवस काढले. टेंटशिवाय काढलेली भरपावसातील काळरात्र ..पावसात भिजल्याने आलेलं आजारपण त्याचेही औषध सह्याद्रीतच शोधल. त्यातच पोटापाण्यासाठी चाललेली धडपड.. या सर्वांचे फलित आपल्या समोर आहेच.
                   Back to my words .....
     आज हे आपल्या समोर मांडतोय याचं कारण . या व्हिडिओने 10000 चा पहिला टप्पा पूर्ण केला तो एक आनंद दाई क्षण आणि एका कलाकाराला एका वेगळ्या पद्धतीने दिलेली दाद म्हणा ना .. आज आम्ही या अनिकेत घेतलेल्या ध्यासाला सोबत करतोय ... सोबतीला बरेच मित्र आहेत , माझेही एक खूप वर्ष्यापासूनचे स्वप्न पूर्णत्वास जातंय .. आम्हाला यापुढे ही अशीच साथ हवी .. तुमच्या पाठवळाची , तुमच्या आधाराने उत्तम पद्धतीने सह्याद्रीतील  मृगजळ रुपी अद्भुत सौन्दर्य आपल्या समोर घेऊन येऊ ... 

      धन्यवाद अनिकेत आमच्या  स्वप्नांना मार्ग दाखवून आकाश मोकळे केल्याबद्दल ... सह्याद्री 1 मधील आणखी 2  कलाकार त्यांच्याशिवाय काही गोष्टी अपूर्ण होत्या ते म्हणजे हृषीकेश गंगन आणि आनंद पांडे ..
.. सहयाद्री देवतेला नमन करून चला आपली रजा घेतो,
                           --- शब्दांकन  ( प्रणव मांगुरकर)
टीम मेंबर - मिलिंद दीक्षित , आर्या कस्तुरे , वैदेही नेने , गोमटेश , दीपाली ,  सिद्धेश कुरपाने, अनिकेत कस्तुरे , प्रणव मांगुरकर )
    
     एवढं बोललो सह्याद्री १ बद्दल  तर एकदा त्याचीही सफर करूनच जाऊ मग क्लिक करा  -SAHYADRI PART 1       
Keep exploring  भटकेहो .......


             कुठेही भटकंती किंवा पर्यटनासाठी जातांना खालील गोष्टी अनुसरण करा ( सह्याद्री  ट्रेककर ब्लोगेर्स )

                  

Friday 2 February 2018

प्रवास 2 राजधानांच्या राजगड ते रायगड ( via singapur ) भाग दुसरा



       
सह्याद्रीचा अप्रतिम पैनारोमा 



राजगड पासून  सुरू झालेली पायपीट वरोती ला येऊन थबकली .  सह्याद्रीच्या  काळ्या पाषाण दगडावर  आजवर  खूपवेळा  विसावा घेतला पण  आज  सह्याद्रीने  जणूं  हिरवी चादर घालून स्वागत केले ,  याआधी भ्रमंती करताना कधीही निवांत पणे सोय झाली नव्हती पण आज ती अनुभवली , आज झालेला सारा शीण कुठल्या कुठे निघून पळून गेला , रात्री सह्याद्री  ने  आम्हा ५ मावळ्यांना एक सुरक्षित छप्पर दिले मगच त्यांने  पावसाला  भूमी चिंब करायची  परवानगी दिली , रात्रभर  भर  पावसात  अडकलो असतो रायगड ला साद घालणे अशक्यच होते .. पण त्याची कृपा होतीच ,  पूर्ण रात्र  पावसाने  साऱ्या  पंचक्रोशीला  न्हाहून टाकलं , उद्या सकाळी बाहेर पडायचं की नाही यावर  शिक्का मोर्तब काही केल्या होईना , इतक्या प्रचंड जोरदार  धारा , सोबतीला  सोसाट्याचा वारा , पाऊस वेळेत थांबला पण पावसाने खुप आव्हाने पुढ्यात वाढून ठेवली  ,  गावातील काकांनी तर गाडीने  जा असा  सल्ला  वजा  इशारा दिला , पण गाडीने जाणारे भटके कसले त्यात तब्बल 3 महिन्यांनी असा  कसदार  तंगडतोड ट्रेक  चालू झाला होता .. पण  काढता  पाय घेतलाच 
वरोति गावामागील ओढ़ा व् बंधारा 

               सकाळी मस्त चहा घेऊन मिहिरच्या काकांसोबत  सोबत गावामागील  नदीवरील पूल  जवळ केला .  कालच्या पावसाने  थोडंफार पाणी  साठलेलं पोहण्याची  तीव्र इच्छा फाट्यावर मारून  नाइलाजाने तिथून निघालो , आज  वेल्हा ला नेमका बाजार असतो त्यामुळे , मोहरी ,एकलगाव , कुसुर पेठ येथील गावकरी  आठवडा बाजाराला  डोईवर सामान घेऊन तुरुतुरु  डोंगर उतरत होते .. अगदी लहान सहान पोर सारं पण आईचा पदर धरून मागे धावत होती ..  तीच गम्मत एक स्फुर्ती देऊन ताजेतवाने करून गेली .. वरोतिपासून सुरू झालेला चड अगदी कुसुरपेठ पर्यंत आहे .. वाटेतुन जातां जाता मागे वळून पहावं , मागे  तोरणा आणि राजगड  आमच्या  वाटचालीवर लक्ष देऊन उभेच ...  काय केल्या  आमचा पिच्छा  दोघांनी ही सोडला नाही .. 
तोरणा राजगढ़ एक फ्रेम मध्ये
कुसुरपेठेचा अंगावर येणारा चढ चढून  वरती आलो .. शिळीमकर काकांचा निरोप घेऊन सिंगापूर  गावाकडे कूच केली ..




काकांनी सांगितल्या प्रमाणे शिवाजी मोरे ना भेटायचं मग ते  येतील 

वाट दाखवायला मग गावात जायचं त्यांचा शोध घायचा असे ठरलं.. वाटेत  एकेठिकाणी शिदोरी सोडली तेवढ्यात मोरे काका पुढ्यातून जात होते .. जसा प्लॅन होता अगदी तसच  चालला होतं.. आमचं काम फक्त एकच काम ओझोवाल्याच ..  बस चलते रहो.. मोरे काकांनी सिंगापूर नालीचा पर्याय पुढे केला ..
भटके अणि सोबतीला \अभेद्य असा लिंगाना 

सिंगापूर नालीचा प्रवेश  


सोबती 
 कालच्या पावसामुळे बोरट्याची नाळ उतरणे  रिस्की होते सो  सिंगापूर चा उतार  चालू झाला .. आमची देपाळलेली चाल पाहता 5 तास  तर हमखास लागणार हे निश्चित ..  माझे अवसान तिथेच गळाले .  पाय दुखत असताना देखील फक्त खाज  या एका कारणासाठी इथवर आलो होतो... शेवटी संध्याकाळी 5 वाजता  सर्वात शेवटी  घाटावरून कोकणात उतरलो .. उतरताना भिकनाल, अग्या नालीचे विलोभनीय दृश्य डोळ्यात साठवत .आलो.. अरेरे थांबा एक  अति महत्वाचा  क्षण राहिलाच . तो म्हणजे आपला  भव्य अतिदिव्य , कातळ सुळका लिंगाणा हो........ आकाश ठेंगणे करणारा .. रायलिंगचा साथीदार .. इथे कधीतरी night स्टे नक्कीच करायचंय ... लिंगाणा 2 वेळा केला .. एकदा दुखापत झाली त्यामुळे निम्म्या तुन सोडून दिला . आणि दुसऱ्या वेळी  पाण्याच्या प्रचंड दुर्भिश्यामुळे राहून1 गेला.. असो ..
दापोली गावातील सुंदर असे दत्त मंदिर 

अक्राळ विक्राळ निसर्ग चमत्कार 

गमती जमती 

कवर फोटोसाठी चाललेली धडपड 

 दापोली गावातील ओढा पार करून मोरे काकांच्या घरी आलो .. पाठीमागे  वळून पाहिले तर  सह्याद्री ने  काय रूपड निर्माण करून ठेवलंय.. सर्व काही अंगावर येऊ लागलेत .. असे जणू काही.. आपण हे सर्व उतरून खाली अलोत हेच  मनी पटेना.. डोळ्यात  सह्याद्रीचा  हा पॅनोरमा बसेना कॅमेरात काय घंटा बसणार.. गावातील दत्त  मंदिरात  थोडावेळ पडी घेतली . इथून बस नि जाऊ  वाघेऱ्या पर्यंत असा निर्णय झाला ..  मग काय निव्वळ टाईमपास सुरू.. गाव तिथे यस टी या संकल्पनेचा प्रचंड राग आला  .. मला चालतच जायचं होतं..  पण काय करणार  पोरांची अवस्था ही तशीच झालेली .. तावणार उन्ह , पाणी नाही , पाठीवर ओझं , आणि त्यात मला आणि सुरेंद्र दादाला सोडून सर्वांचा पहिलाच इतका मोठा ट्रेक .. छोटेमोठे ट्रेक झालेले पण रेंज ट्रेक तसा नव्हता झालेला...  गावात यस टी संध्याकाळी 7 ला होती .. त्याची वाट पाहत बसलो खरे .. पण गावात यस टी यायचे नावच घेऊन.. शेवटी आली पण न थांबताच  गावातील झाडाला वळसा मारून पुन्हा आल्या मार्गाने निघून गेली.. पोरांची तोंड पाहण्यासारखी झाली होती.. गावातील लोकांनी आणखी एक पर्याय पुढे केला. डोहाजवळ जी बस येईल त्या बसने जावा.. चलो चले म्हणत डोहाजवळ पोचलो ..  तो नजारा पाहून एकतरी  मुक्काम  इथे झालाच पाहिजे असं मन सांगत होत .. सगळ्यांची हीच तीव्र इच्छा  आणि  या सह्याद्री च्या  अप्रतिम  नजराण्याने शेवटी मुक्काम घडलाच...  दादा नि  अवधूत नि पुन्हा गावात जाऊन जेवण बनवून आणले ..राहुल व मिहीर नी  चहा बनवला .. चहा हुन सुख ते आणखी काय तेपण स्वतः बनवलेला . वा..... मजा आआआआआ गया.. भयाण शांततेत घळवलेली रात्र , घाबरलेला राहुल , काळमिट्ट  अंधार आणि दादाने परत यायला केलेला वेळ हे सर्व पुढील भागात .. तोपर्यंत  सिंगापूर नालीतच  सर्वांची भूत आणि मन , व पाय भटकूदेत ....…


राजगढ़ ते रायगढ़  वाचनासाठी खालील लिंक वर  क्लीक करा 
click  इथे करा 







भटकंती करताना हे नेहमी लक्षात  ठेवा