ट्रेक to चंदन वंदन दुर्ग
चंदन वंदन दुर्ग , आपल्या जवळच आहेत हे कदाचित बऱ्याच जणांना माहितीही नसेल .
या पूर्वी या दोन दुर्गाबद्दल काहीही ऐकलं नव्हतं ... त्यामुळे उत्सुकता आणखी वाढली होती .. गूगल केलं तरी फारसी माहिती मिळाली नाही ....
चंदन वंदन दुर्ग ३२०० फूट उंच ..दोन्हीही भव्य पण त्याकडे नेहमीच दुर्लक्ष्य होत आलेलं .... त्यामुळे त्याच्या विकास आजतागायत झालेला नाही ... दुर्गावर पाहण्यासारखं' काहीही नाही ....एक दोन पाण्याची टाकी ,काही शिल्लक अवशेष ... पण आजूबाजूचा परिसर पाहिल्यावर डोळ्यावर विश्वास बसणार नाही असा दृश्यं पहावयास मिळतं ....
मी रविवार ची जितकी आतुरतेने वाट पाहतो .. तितकी अजून कशाचीही नाही ..
थोडेसे पुढे गेल्यावरच थकायला झालं . थोडावेळ बसलो आणि मग ठरवलं पठार आल्याशिवाय आता थांबायचं नाही . आता मात्र मूळ पायवाट सापडली होती . जाताना सर्वांचं फोटो,सेल्फी घेणं चालूच होत.. असे दृश्य पाहून कुणीही फोटो काढल्याशिवाय राहनारच नाही .. काही वेळाने पठाराजवळ पोचलो . बरेच ट्रेकर्स अजून खूप लांब होते . त्यामुळे फोटोग्राफी खूप स्कोप होता . पण त्यावेळी लक्ष्यात आलं कॅमेरा तर घरीच विसरला . मोबाईल होता . पण जी गम्मत Digital Single - lens reflix camera ( DSLR ) ने आहे ती गम्मत मोबाइल च्या कॅमेराला नाही . एक मात्र होता जितका थकवा पठारापर्यंत यायला झाला होता तो क्षणार्धात निघून गेला .
थोड्या वेळाने जयेश दादा पठारावर आला त्याच्याकडे कॅमेरा बघितला . त्याच्याकडे मागितला त्याने लगेच दिलादेखील मग कॅमेरा आणि निसर्गाने जे काही दाखवले ते अद्भुतच . त्याचे शब्दात वर्णन करणे खूप अवघड आहे
तिथेच मस्त जेऊन घेतले आणि परत माज सर्वात आवडता काम फोटोग्राफी चालू .. काही'वेळाने पुन्हा खाली उतरायला गेलो . तिथून भगवा दिमाखात फडकत असताना दिसला . मग तिथे गेल्याशिवाय इथे येऊन गेल्याचे सार्थक होणार नाही . एक छोटोशी वाट डावीकडून भगव्या झेंडयाजवळ जाते .
तिथे सुबोध दादाने खड्या आवाजात
काही वेळ चालून झाल्यावर पुढे कुणीच दिसेना . आपणच ४ जण मागे आहोत .हे कळल्यानंतर झपाजप पाऊल उचलत गेलो काही अंतर गेल्यावर छोटा ऋग्वेद दिसला . मग फोटो काढणं चालू . पूर्ण गडाला traverse मारून एक कठीण patch पार करून गडाच्या रेलिंग जवळ पोचलो . यावेळी मात्र पहिल्यांदा मी,सिमरन,ऋग्वेद ,आणि दानिश तिथे पोचलो . बाकीचे निवांत हळूहळू येत होते . तिथे बसून मस्त पाठ टेकवली आणि सर्वांची वाट पाहू लागलो . १५ मिनिटांनी सर्वजण आले . तिथून सर्वजण एकत्र वरती गडावर गेलो फेरफटका मारला . काहीही मात्र विश्रांती घेणं पसंत केलं . चंदन गडावर कुठेही पाणी नाही असा ऐकलं होतं . मात्र एक विहीर दिसली त्यातून पाणी कसेतरी जेमतेम एक बाटली पाणी भरून घेतले
History of the fort: According to the evidences of copper-inscriptions(Tamralekh) of 1191-1192 B.C., these forts were built-up by king Bhoj II of Shilahar dynasty. Shivaji Maharaj overpowered Chandan-Vandan along with Kalyangad, Sajjangad, Ajinkyatara during the campaign of Satara in 1673. Later, during the regime of Sambhaji, Amanullah Khan attacked the troop of Maratha soldiers on Chandan-Vandan. 25 horses, 20 guns, 2 ensigns, 1 kettle-drum were lost in the hands of Mughals in this battle. Marathas ruled this region up to 1689 B.C. Afterwards Mughals ruled this fort. In 1707, Chhatrapati Shahu Maharaj won this region during rainy season. In 1752, Dadopant was accompanied by soldiers by Balaji Vishwanath to keep close watch on Tarabai. Later, British ruled over these forts
चंदन वंदन दुर्ग |
मीपण तुमच्यासारखा आम्हीही अनभिज्ञ होतो ...
रविवार हा आपल्यासोबत खूप काही घेऊन असतो .. काहीजणांसाठी विश्रांती , सुट्टी ,... पण माझ्यासारख्या भटक्यांसाठी एक पर्वणी ..... या रविवारी कुठे भटकायचं हा विचार करत असताना .. फेसबुक ( त्या झुक्याचे पब्लिक बुक ) वर ( गिरिदुर्ग ) या ग्रुपवर हा ट्रेक आहे ..असा वाचलं ... मग. लगेच ठरवलं या रविवारी चंदन वंदन दुर्गभ्रमंती .......
या पूर्वी या दोन दुर्गाबद्दल काहीही ऐकलं नव्हतं ... त्यामुळे उत्सुकता आणखी वाढली होती .. गूगल केलं तरी फारसी माहिती मिळाली नाही ....
चंदन वंदन दुर्ग ३२०० फूट उंच ..दोन्हीही भव्य पण त्याकडे नेहमीच दुर्लक्ष्य होत आलेलं .... त्यामुळे त्याच्या विकास आजतागायत झालेला नाही ... दुर्गावर पाहण्यासारखं' काहीही नाही ....एक दोन पाण्याची टाकी ,काही शिल्लक अवशेष ... पण आजूबाजूचा परिसर पाहिल्यावर डोळ्यावर विश्वास बसणार नाही असा दृश्यं पहावयास मिळतं ....
परिसर |
आज रविवार सकाळी ६ ला जायचं असल्याने .. पहाटे ५ वाजता उठून .. राजाराम पुलाजवळ जाऊन बसलो .... आज माझ्यासारखे अनेक भटके सिंहगडच्या दिशेने जाताना दिसत होते...
मीपण सुबोध दादा आणि गिरिदुर्ग टीम ची वाट पाहू लागलो ... त्यातच सकाळी सकाळी कुणी मंत्री आणि त्यांचा भलामोठा ताफा तिथून गेला ... त्यांच्यामुळे विनाकारण इतरांना त्रास ... असो काही वेळाने आमची बस आली ... बस मध्ये बसलो पण'त्यात सगळेच अनोळखी १४ .... थोडक्यात (एकटा जीव सदाशिव) अशी काहीशी माजी गत ...पुढे सिंहगड रोड कात्रज मार्गे एक्सप्रेस वे गाठला .. अंतर फारसं नव्हतं.. जास्तीत जास्त २ तास लागतील असा अंदाज होता.. वाटेत ट्राफिक नव्हते पण मात्र ट्रॅफिक पोलीस हजर .. एकदा थांबवले ठीक आहे.. पण ३ ठिकाणी पाहुणचार झाला .... वाटेत चहा,नास्ता झाला ... आम्ही finally १० वाजता बेलमाची या छोट्याश्या गावी पोचलो ..
सर्वानी गोल 'रिंगनं केलं .. ओळख झाली .. त्यातील बरेचसे मल्टिनॅशनल कंपनी चे होते . त्यातील ७ जणांचा हा पहिलाच ट्रेक होता . त्यात सुबोध दादा गेली १३ वर्षे ट्रेकिंग करतोय १६५+ किल्ले पालथे घातलेत त्याने .. ( he was Inspiration for me ) . आमच्यासोबत एक छोटा ट्रेकर ऋग्वेद हि होता . त्यानेही २६ ट्रेक केले आहेत . वयाच्या ४ त्या वर्ष्यापासून हा छोटा चमू ट्रेक करतोय .. तस नवलच पण THat is Fact . ओळखीनंतर ट्रेक ला सुरुवात झाली . त्यावेळी वाटलं नव्हतं कि इतका वेळ लागेल .. त्यातच नेमका कोणता दुर्ग आधी 'पहायचा यांवर एकमत नव्हतं .. मग शेवटी ठरलं कि दोन्ही दुर्गाच्या मध्ये पठारापर्यंत जायचं आणि मग ठरवायचं .. सुरुवातीला जयेश दादा ,मध्ये आम्ही सर्वजण आणि मागे अनुभवी सुबोध दादा . असा मजल दरमजल करत निसर्गाचे विलोभनीय रूप पाहत आम्ही एकामागे एक असा चाललो होतो . काही वेळ चालत गेल्यावर लक्ष्यात आले कि आपण वाट चुकलोय . मग पुन्हा सुबोध दादा च्या मागे चालणे भागच होते त्याला एकट्याला वाट माहिती होती
.
बेस स्टार्ट |
Beautiful in rainy season |
Ibrahimpur villege |
काही वेळाने गड्याच्या मोडकळीस आलेल्या पायऱ्या दिसल्या
काही वेळाने गडावर पोचलो . गडाचा दरवाजा आता दगडमातीने झाकला गेलेला'आहे .
तिथून पुढे गेलो तर गडावर २ दर्गा, ३ पाण्याची तलाव या शिवाय काहीही नाहीये .
वंदन गड |
दरवाजा |
दर्गाह |
तलाव |
भगवा |
प्रौढप्रताप पुरंदर
क्षत्रिय कुलावतंस
सिंहासनाधीश्वर
गो ब्राह्मण प्रतिपालक
भोसले कुलदीपक
हिन्दवी साम्राज्य संस्थापक
मुघल जन संघारक
श्रीमान योगी
योगिराज
बुद्धिवंत
कीर्तिवंत
कुलवंत
नीतिवंत
धनवंत
सामर्थ्यवंत
धर्मधुरंधर
श्रीमंत श्रीमंत श्रीमंत
महाराजाधिराज
छत्रपति शिवाजी महाराज की
ही घोषणा दिल्यावर सर्वांच्या मुखातून आपसूकच जय हे उद्गार आले .
पण फोटो काढताना एक गम्मत आणखी घडून गेली . जयेश दादा ची कॅमेरा ची बॅग वाऱ्याने खाली पडून एका झाडामध्ये अडकली . त्यांची बॅग काढताना जे स्कील वापरलं . त्यातून पण खूप काही शिकण्यासारखं होतं .....
त्यानंतर काही वेळाने गड उतरायला सुरुवात केली . उतरताना कुणी पडले ,कुणी घसरले , त्यामुळे सर्वजण अगदी सावकाश चालत होते . कठीण ठिकाणी एकमेकांचा हात पकडून त्यांचं मनोबल वाडवत . मज्जा मस्ती करत सर्वानी चंदन गडाच्या दिशेने कूच केली . चंदन गडाला जायला पठारापासून उजव्या बाजूने एक पायवाट आहे तिथून जात येत .
नकाशा |
काही वेळाने मस्त फोटोशूट झाले तिथे एक वडाचे झाड आहे . त्याच्यावर चडून सर्वानी फोटो काढले .
तिथे थोडावेळ बसून खाली उतरायला सुरुवात केली . पुन्हा त्या पठारावर जाऊन थांबलो . चंदन गडावरून येताना मात्र बहुतेक सर्वजण खाली बसूनच उतरले . खूप घसरणीचा भाग पूर्ण करून आम्ही पठारावर आलो .
तिथून मात्र almost १५ मिनिटात खाली पायथ्याजवळ आलो . यावेळी पण मी पहिला ,
त्यानंतर सिमरन,नंतर सुमित अशे एका पाठोपाठ एक सगळे खाली आले . खाली जाऊन पहिला पाणी शोधला . तिथल्या लोंकानी आम्ही तिकडे येतोय पाहिल्यावर आम्ही पाण्याची सोया केली . काहीवेळ त्या लोंकाची गप्पा मारल्या . गावातील लोक खूप निर्मळ मनाची असतात याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला. तिथे बकरीच्या पिल्लासोबत . फोटो काढले . थोड्या वेळाने मस्त ताक . आणि पुण्याकडे मार्गक्रमण चालू झाले . येताना सर्वांशी बऱ्यापैकी चांगली ओळख झाली होती . त्यामुळे मज्जा,मस्ती ,चालूच होती. त्यातच सुबोध दादा ,कोमल , यांनी'गाण्याच्या भेंड्या लावायच्या असा विचारला ? . त्याने दोन गट केले मग काय सगळे सुप्त कवि उदयास आले ,तिथून ज्या भेंड्या सुरु झाल्या त्या पुण्यापर्यंत चालूच होत्या . हिंदी,मराठी,जुन्या नव्या गाण्यांची मैफिलच जणू रमली होती . जे निखळ हसू गाणी गाताना दिसत होत ना तेच खूप सार्थकी होत . एकदी मनापासून काहीही काम केलं तर ते सफल होतच. हे या ट्रेकमुळे आणि या मित्रामुळे अनुभवायला मिळाला .
गिरिदुर्ग सोबतचा हा तसा माझा पहिला ट्रेक . पण असे कुठेही वाटली नाही . सुबोध दादा ,जयेश दादा हे आपल्यापैकीच एक आहेत असे वाटत होता .यांच्याकडून नव काहीतरी अनुभवायला मिळाला. त्यासोबत नवीन मित्र मिळाले . आणखी दोन दुर्ग पूर्ण झाले .
Histroy ;- Getting from google
History of the fort: According to the evidences of copper-inscriptions(Tamralekh) of 1191-1192 B.C., these forts were built-up by king Bhoj II of Shilahar dynasty. Shivaji Maharaj overpowered Chandan-Vandan along with Kalyangad, Sajjangad, Ajinkyatara during the campaign of Satara in 1673. Later, during the regime of Sambhaji, Amanullah Khan attacked the troop of Maratha soldiers on Chandan-Vandan. 25 horses, 20 guns, 2 ensigns, 1 kettle-drum were lost in the hands of Mughals in this battle. Marathas ruled this region up to 1689 B.C. Afterwards Mughals ruled this fort. In 1707, Chhatrapati Shahu Maharaj won this region during rainy season. In 1752, Dadopant was accompanied by soldiers by Balaji Vishwanath to keep close watch on Tarabai. Later, British ruled over these forts