हरिहर दुर्ग
राजगडाच्या बालेकिल्ल्याहून दिसणारा सूर्योदय, रायगडाच्या बाजारपेठेतून अस्ताला जाताना दर्यायी सुवर्णरेखा चमकविणारा सूर्यनारायण , राजमाचीच्या जुळ्या किल्ल्यावरून दिसणार तळकोकनातील दृश्य ,प्रसन्नगडावरचा प्रसन्न निसर्ग , अणि अपरिचित गड़वाटा ,त्यांची निरव शांतता हे फ़क्त अणि फ़क्त अनुभवण्याचे क्षण ````````` त्यांना शब्दांच्या ओंजळीत कधीही कैद करता येणार नाही``````````
न रुळलेल्या पाऊलवाटेवरून भटकताना निसर्गाच्या नवनव्या रूपाचे दर्शन घडते , कधी धुक्यात हरवलेले गडमाथे शोधताना तर कधी त्याच धुक्याच्या लोटात हरवत -ओळखीच्याच गडकोटांवर भटकताना दरवेळी काही नित्य नवे गवसल्याची अनुभूति येते `````````` असाच हरिहर दुर्ग
गड्याच्या पायऱ्या |
गड बेस ( निर्गुड़पाड़ा ) |
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात निसर्गाचे चमत्कार दडलेले आहेत ` नाशिक जिल्ह्यातील सेलबारी - डोलबारी रांग, अजंठा - सातमाळ रांग, त्र्यंबक रांग या डोंगररांगात अनेक गडकिल्ले आहेत. हरिहर किल्ला त्र्यंबक रांगेतील प्रमुख किल्ला आहे. प्राचिन काळापासून महाराष्ट्रातील बंदरात उतरणारा माल अनेक घाट मार्गांनी नाशिकच्या बाजारपेठेत जात असे. यातील त्र्यंबक रांगेतून जाणार्या गोंडा घाटावर लक्ष ठेवण्यासाठी हरीहर , भास्करगड यांची उभारणी करण्यात आली होती. हां दुर्ग गेली कित्येक दशके निसर्गाचे बदल अनुभवत आहे
वैशाखातिल दाहक उन असो किवा मृगातील बरसणार्या सरी प्रत्येक ऋतूत याचा श्रृंगार काही आगळावेगकच ` कश्या तयार केल्या असतील या उभ्या काळ्या कातळात असलेल्या पायऱ्या अकलनापलीकडचा थक्क करणारा हा प्रश्न इथे आलेल्या प्रत्येकाला पडतो ` केवड़ी ही निसर्गाची कलाकुसर।
सहयाद्रीच्या वेढान आज कित्येक जनाना झपाटून टाकलय। त्यातील एक मि ` या पर्वतरांगा महाराष्ट्राच्या पाठिच कणा शोभतात
मि या आधी ३ वेळा हरिहर ( हर्षगड ) च्या कुशीत जाउन आलो होतो` पन अजूनही तो पाहण्याची हौस पूर्ण होत नाही , यावेळी मला निम्मित मिळाल पुन्हा दुर्ग सर करायचा गिरिदुर्गच्या काही भटक्या मुळे। शनिवारी रात्रि डेक्कन - नाशिक फाटा येथून आणखी काही ट्रैक्कर्स ना घेऊन निघालो , झोप तर प्रचंड आली होती , पण वैदेहीने गाण्याच्या भेंड्या सुरु केल्या अणि बस मधील सगळे रथी महारथी सामिल झाले सर्वांच्यात इतका उत्साह होता की पहाटेपर्यन्त सर्वजन गुनगुनत होते , काही वेळाने चहाचा ब्रेक झाला सकाळी ७ च्या सुमारास गावातील सुंदर सकाळ अनुभवत आम्ही निरगुडपाडा या गावी पोहचलो
थोड्याच वेळात मस्त कांदेपोहे , चहा झाला , गिरिदुर्गच्या सर्व ट्रेक्कर चा इंट्रोडक्शन होऊन सर्व शिलेदार मार्गस्थ झाले, गडावर जाण्याची पायवाट माहिती असलेने सर्वात पुढे मि वैदेही अणि मागे सुबोध दादा सर्वाना घेऊन येत होता , वाटेतील ओढ़े , पानवठे, आजुबाजूचा सुंदर निसर्ग पहात आम्ही कही अंतरावर येऊन थाबलो मागे पाहिले तर कुणीही दिसत नव्हते कुणाला फारसा ट्रेक अनुभव नव्हता त्यामुळे बरेच जान हळू हळू एकमेकाना साथ देत येत होते , सर्वाना सोबत motivate करत सुबोध दादा ,जयेश दादा पाठीमागून येत आले. तिथे एक फुलपाखरू मला अशिकाय साद घातली की त्या पाखराला पहायला जंगलात किती आतमध्ये आलोय याचा थांगपत्ता नव्हता खुप प्रयत्न केले पन त्याला कैमरा मधे साठवु शकलो नाही पुन्हा मगे आलो तर सर्वजन बरेच पुढे गेले होते। काही वेळाने सुबोध दादा दिसला तो तन्मय ,अनुश्री ताई ,स्नेहा ताई ला सर्वात शेवटी त्यांच्यासोबत हळू जात होता पुढे कहि अंतरावर निखिल ही दिसला। मग मि ,ताई , निखिल पुढे निघालो , दादा तन्मय ला घेऊन येतो असा म्हणाला, मला खरतर सर्वात आधी गड सर करायचा होता पन पुढे निम्मा वाटेत गेल्यावर गडाकडे पाहिले तर वैदेही नी पहिला दरवाजा सर केला होता मनातल्या मनात फुलपाखराला शिव्या घातल्या ( त्या पाखरामुळेच इतका वेळ झाला होता )
काही वेळाने निखिल ही पुढे गेला ,स्नेहा ताई बिनधास्त चालत होती पन अनुश्री ताई पहिल्याच रॉक पैच ला पाहून थांबली, तिला तो पैच सर करायला कसेतरी तयार केल ,तस तो पैच पाहून कुणालाही धडकी बसेल असा तो उभा कड़ा त्यातच अधुन मधून येणारा थंडगार वारा सोबतीला रिमझिम पाऊस अणि सोबतीला गर्द धुके
पहिला रॉक पैच |
गडाच्या पायऱ्या |
खरी रिस्क ही गड चढनापेक्ष्या उतारण्यात आहे हे माहिती होते कारन खाली पहिलेतर पूर्ण धुक्याचे साम्राज्य पसरलेले असते खालची पायरी कुटे आहे हे शोधाव लागत मि त्या दोन्ही ताई ना घेऊन उतरत होतो खरी कसरत त्या वेळी करावी लागत होती , त्यात पाठीवर सैक त्यात अनुश्री तै तिची सैक घेऊन उतरायला खुप अवघड जाट असल्याने तिची ही सैक पुढे गळ्यात अडकवून मि पहिला एक एक पायरी उतरून खाली यायचो मग त्याना हळू हळू खाली घेऊन अलो , दुसऱ्या दरवाज्या जवळ तर इतकी अरुंद जागा आहे की तिथे फक्त एक व्यक्ति कसेतरी त्यातून येऊ शकतो त्यातच मुंबईहून एक ग्रुप वरती येत होता त्यामुळे पूर्ण पायऱ्याजवळ जागोजागी ट्रेकर्स अडकून होते त्यातून वात काढून खाली येन खुप अवघड काम होते पन फाइनली मिशन accomplished . नंतर मग आलेल्या वाटेने परत जायला निघालो, मधे बराच पाउस पडून गेल्याने सगळीकडे चिखल माजला होता त्यामुळे घसरण ही खुप वाढली होती , बरेच ट्रैक्कर्स घसरून पडले कुणी नैचरल घसरगुंडीचा अनुभव घेतला त्याच्यावर झालेले जोक ,धम्माल मस्ती करत ,
आम्ही ३ ला आमच्या स्टार्टिंग पॉइंट ला पोहचलो ,
तस जाताना निम्मा वाटेपासून ते येताना आम्ही तिघे एकत्र होतो त्याना सुखरूप वरती गडावर चढवून पुन्हा खाली येताना केलेली कसरत माझ्यासाथी एक शिदोरी होती ,त्यांचे ट्रेक छे अनुभव ,
बाकीच्या इतर गप्पा, ट्रेक दरम्यान झालेल्या गमती जमती ,माझ्यासाठीचा नविन अनुभव ( जबाबदारी थोड़ा मोठा शब्द वाटतो ) पण त्याची नकळत झालेली जाणिव ,ती जबाबदारी मि नीट हाताळू शकलो की ते नाही माहित पन किमान थोड्याफार प्रमाणात टी पूर्ण झाली ,निसर्ग आपल्याला खुप काही शिकवतो सह्याद्रीच्या या open university मधे अजुन बरेच शिक्षण घ्यायचे बाकी आहे,
गिरिदुर्ग सोबत चा माझा दूसरा ट्रेक माझ्या चांगलाच स्मरणात राहिला , आपन बरेच जन स्वताला चांगला ट्रेक्कर मानत असतो पन त्याची खरी लायकी ही अश्या सह्याद्री च्या कुशीत वसलेल्या या ३७० गिरिदुर्गाची मोहिम केल्यावरच कळते।