श्री शिवप्रतिस्थान हिंदुस्थान गेले ३३ वर्षे धारातीर्थ यात्रा (मोहीम ) आयोजित करत आहे
|
भिडे गुरुजी आणि धारकरी ( प्रेरणा मंत्र ) बोलताना |
धारातीर्थ यात्रा (मोहीम ) कश्यासाठी :-
याचे उत्तर खूप सोपे आहे. अखंड हिंदुस्थानाला स्वातंत्र मिळून उणीपुरी सत्तर वर्षे उलटून गेली , तरी पण हिंदुसमाज मनाने पूर्णतः परतंत्रचं आहे . कर्तृत्ववान ,शीलवान ,धैर्यवान ,साहसी ,संयमी ,प्रखर ,स्वधर्माभिमानी उगवत्या तरुणांची पिढी हि राष्ट्राची खरी मूलभूत संपत्ती आहे ,या कसोटीवर हिंदुस्थान आजही दरिद्रीच आहे .
श्री शिवछत्रपतींच्या वृत्तीची अवघी तरुण पिढी हि राष्ट्राची क्रमांक एकची निकडीची गरज आहे . यासाठी श्री शिवप्रभूंच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या व अनेक हुतात्मांच्या व स्वतंत्रविरांच्या बलिदानाने धारातीर्थ बनलेल्या ,गडकोट्याच्या मोहीमा ,प्रतिवर्षी आयोजित करण्यात येतात .
या वर्षी हि मोहीम
!! श्री पन्हाळगड ते श्री विशाळगड !!
* श्री पावनखिंड मार्गे *
मोहिमेचा कालावधी : -- माघ शु ।। ५ ।। ते माघ शु ।।९।। , श्री शिवशक ३४३ ( १ फेब्रु ते ५ फेब्रु )
आषाढातील वारकऱ्याला जशी पंढरीची ओढ असते अगदी तशीच ओढ आम्हा धारकऱ्यांना असते ,पण त्यात फरक निश्चितच आहे . आत्मउद्धार ,आत्मसाक्षात्कार ,आत्मउन्नतीचा मार्ग सांगणारा वारकरी प्रवाह आहे . तर राष्ट्रोउन्नती ,राष्ट्रभक्ती ,राष्ट्रसाक्षात्काराचा मार्ग सांगणारा धारकरी प्रवाह आहे .
चला !
कुठं जायचं ?
एका माणसाच्या जीवासाठी धावायचं कुठवर ?
बाजी ! कश्यासाठी हे कष्ट घेता ?
कोण्याच्या स्वार्थापायी ?
आणि तेही एका माणसाच्या जिवापायी ?
कोणाच्या सत्तेनं आम्ही या माणसांना गुंतवलं ?
कोणाच्या अधिकाराने ?
जीवनात अखेरचं मोल असतं ते स्वतः च्या जीवाचं !
मग त्या जिवाच्या कवड्या यांनी आम्ही मांडलेल्या पटावर का उधळाव्यात ?
कसल्या आणि कुणाच्या भरवश्यावर ?
बाजी , फुलाजी तुम्ही स्वामी कार्यासाठी का ह्या अवघड वाटचालीत सामील झालात ?
कोणत्या त्यागापायी ?
हे व्हावं हि तो श्रींची इच्छा आहे असं आम्ही म्हणालो ,
पण हा महाचंडिकेचा होम धडाडत असता ,
त्याच पौरोहित्य आमच्या हाती का सुपुर्ध केलंत ?
यातून खरं काही साधणार आहे का ?
या पालखीचा वीट येतो !
नशिबानं या संकटातून पार पडतोच तर . . . . . . . . . . . . . . . .
बाजी , पालखीचा मन तुम्हाला देऊ ! ..........
या आणि अश्या असंख्य अनेक प्रश्न - उत्तराचा मागोवा घेण्यासाठी आम्ही हजारो धारकरी
अखंड हिंदुस्थानातून एकवटलो होतो . पन्हाळगडावरील पुसाटी बुरुजाजवळ चातकासारखी ज्या वेळेची आम्ही वर्षभर आतुरतेने वाट पाहत असतो . ती वेळ अगदी काही तासांवर येऊन थांबली होती .
घरातून ४ दिवस पुरेल इतकी शिदोरी ,मुबलक पाणी ,अंथरून ,पांघरून ,हळदीची पुढी ,
विजेरी ( टॉर्च ) , सुई दोरा , दंतमंजन ( कोलगेट ) , लेखणी वही हे सर्व बॅग मध्ये भरून घराचा उंभरठा ओलांडला . घरातून बाहेर पडल्यापासूनच मोहिमेची सुरुवात झाली होती. . पाठीवर २० - २५ किलो बोजा घेऊन बसची वाट पाहत उभा होतो . क्षणातच बस दाखल झाली . सारा परिसर धारकर्यांनी .. हर हर महादेव च्या गर्जनेने दणाणून सोडला . आम्ही पन्हाळगडावर पोहचलो . गड हिंदुस्तानातून आलेल्या धारकऱ्यांनी फुलून गेला होता .
दुपारी सन्माननीय परमपूजनीय श्री संभाजीराव भिडे गुरुजी ( गुरुवर्य .
यांच्या बोलीतून पन्हाळगड ते विशाळगड जाज्वलं रणसंग्राम अनुभवण्यास सुरुवात झाली . आम्ही कधी ३५० वर्षे मागे शिवकालीन पन्हाळगडावर पोहचलो हे समजले देखील नाही . गुरुजींच्या वाणीतून शिवकाळातून मागोवा घेऊन परततो तितक्यात डॉ आडके नि पन्हाळा गडावरील प्रत्येक वास्तू व त्याचा इतिहास सांगण्यास सुरुवात केली . जणू काही त्या प्रसंगाचे आम्ही साक्षीदार आहोत . याची प्रचितीच येत होती .
पर्णालदुर्गाविषयी थोडेसं : -
पर्णालदुर्ग होय ! श्री शिवकालीन संस्कृत काव्यामध्ये हे नाव आढळते . दुर्ग पन्हाळा ... . . . एक अभेद्य दुर्ग ! प्राचीन दुर्ग ! सुवर्णभूमी महाराष्ट्रातील राजा शिलाहार गंडरादित्य यांच्या राजधानीचा गड . . . ! समुद्रसपाटी पासून वरून हिशेब करता श्री पन्हाळगड २७०० फूट उंच आहे खरा . पण कोल्हापूरपासून हि उंची सुमारे ७०० फूट आहे . येन पायथ्यापासून केवळ २५० फूट उंचीवर पन्हाळा वसला आहे . श्री पन्हाळगडावर अनेक तळी ,त्यात फुलणाऱ्या कमळावरून पद्मालय असे नाव त्यास लाभले . पुढे काही दिवस आदिलशाहीत हा गड नंदू लागला त्यावेळी शहानबिदुर्ग म्हणून ओळखला जाऊ लागला . आज मात्र पन्हाळा हे सर्वत्र रूढ आहे .
गड चढ़तानाच उजव्या बाजूस स्फुर्तिस्थान आहे . इथपासून तो दि ६ मार्च १६७३
पर्यंत .श्री पन्हाळा विजापुरांकडे होता . दि ६मार्च रोजी अण्णाजी दत्तो ,कोंडाजी फर्जद ,गंनाजी ,मोत्याजीमामा रवळेकर असे निधड्या छातीचे मावळे केवळ ६० सहकाऱ्यांसोबत पन्हाळगडावर चढाई केली . व एका रात्रीत गड जिंकून घेतला . दक्षिण दिग्विजयापूर्वी आपल्या छत्रपती आणि बाळ संभाजी यांची भेट याच गडावर झाली होती .
दक्षिण दिग्विजयाविषयी थोडेसं : -
छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी या दिग्विजयात तब्बल १११ किल्ले
आपल्या स्वराज्यात समाविष्ट करून घेतले ते हि फक्त २१ महिन्यात ( पावणे दोन वर्षे ) .विचार केला ते फक्त
सव्वाचार दिवसात एक किल्ला जिंकून घेतला .
मोहिमेचा वृंतांत : - मोहिमेची सुरुवात श्री पन्हाळा गडावरील पुसाटी बुरुजाजवळ झाली . ती तुळजाभवानीच्या स्मरणाने . प्रथम
भगवा ध्वज , मागे शस्त्र पथक व त्यामागे हजारो धारकरी . रात्री ३. ३० ला ध्वज पुसाटी बुरुजाच्या पाऊलवाटेने खाली उतरला . सर्वानी तुरुकवाडी च्या खिंडीकडे मार्गक्रमन केले . शेवटचा धारकरी दुपारी १२. ४५ ला गडाखाली उतारला . इतकी प्रचंड धारकऱ्यांची संख्या . तुरुकवाडीनंतर उजव्या दिशेला पश्चिमेकडे मसाई चे पठार आहे . पाचगणी च्या पठारापेक्षाही खूप मोठं पठार . पठारावर एकही झाडाचा लवलेश नाही.
|
मसाई पठारावर जाताना धारकरी |
|
Add caption |
|
मसाई देवी मंदिर |
|
पांडवकालीन लेणींकडे जाणारा पठारावरील मार्ग |
पठारावर जायच्या आधी विश्रांती घेऊन पुढे निघालो . आधीच ठरवलं होतं आता थांबायचं ते थेट मसाई देवीच्या मंदिराजवळ . जवळपास ९ किमी खुलं पठार . आणि आम्हाला तिथवर पोचायला १० वाजले त्यामुळे दुपारचं १२ च कडक ऊन सहन करावं लागलं . पठारावर अलीकडे पाणी साठवण्यासाठी काही प्रयत्न झालेले आहेत . आम्हाला पठार पार करायला ३ तास लागले . मसाई देवीचं दर्शन घेऊन पुढे निघालो . पुढे कुंभारवाडा - खोतवाडी - केळेवाडी - मंडलाईवाडी - धनगरवाडी - कापरेवाडी - आंबेवाडी - कळकवाडी - रिंगेवाडी - माळवाडी असे जवळपास ३६ किमी अंतर पार करून माळवाढीच्या पठारावर जेऊन झोपी गेलो . सर्व शरीर थकलं होत . येताना असंख्य धारकरी , त्यांची वेगवेगळी बोली भाषा , त्यांचा वागणं त्यांचं बोलणं ,हे पाहण्यात ,अनुभवण्यात एक वेगळाच आनंद यायचा .
दिवस दुसरा
|
एक छोटीसी खिंड |
|
एकापाठोपाठ येणारे धारकरी |
कालच्या प्रचंड थकव्यामुळे रात्री झोप कधी लागली हे कळेलच नाही . घरी बेडवर झोप लागणार नाही इतकी मस्त झोप या धरणी मातेच्या कुशीत लागली . आज सकाळी डॉ राजेंद्र चव्हाणके ( सुदर्शन चॅनेल ) प्रमुख यांचे स्वदेशी या विषयावर मोलिक वाख्यान होते . आज चालायचं अंतर खूप जास्त नव्हतं . त्यामुळे सर्वच धारकरी थोडेसं निवांत पणे आवरून माळवाडीच्या शाळेच्या मैदानावर जमले . तिथे काही श्लोक ,काही गीत म्हणून पुढे वाटचाल केली . आजच अंतर फक्त १८ किमी होत खरं पण दाट अरण्य आणि चढ उतरणीचा मार्ग असल्याने थकवा आजही जाणवला . येतं एक धारकरी आपल्या २ वर्षाच्या छोट्या धारकर्याला डोक्यावर घेऊन चालत होता. त्या छोट्या धारकर्याच्या चेहऱ्यावरील स्मितहास्य नकळत आमचाही उत्साह वाढवून गेलं . आतापासूनच त्या धारकर्याच्या मनावर असे संस्कार घडतायेत .नक्कीच हा धारकरी मुलगा पुढे काहीतरी करून दाखवणार यात तिळमात्र शंका नाही . . . . .. .....
|
हाच तो २ वर्षाचा धारकरी |
माळवाडी नंतर पाटेवाडी - म्हसवड - मान धनगरवाडा - पांढरपाणी होता . आम्ही धनगरवाड्यात थांबलो . कोकणी टुमदार घर पहवीत ती इथेच . एकदम छोटंसं गाव . गावात सर्वच धनगर .आम्ही फुलाजी कस्तुरे यांच्या घरासमोर बैठक मांडली . त्यांनी केलेले आदरातिथ्य , आमच्यासाठी खूपच भारावून टाकणारं होत . गावाकडील स्वच्छ निर्मळ मनाची माणसं ती . तिथे बॅग ठेऊन पांढरपाणी गावांत
श्री तानवडे काकांचे संस्कृत छंद आणि त्याचे अर्थ जाणून घेतले , मूळ छंद कविराजभूषणांनी कथित'केलेले आहेत . मूळ संस्कृत ,,हिंदी मोडी भाषेत मिळतात . कविराजभूषणांनी संपूर्ण शिवचरित्र फक्त एका ओळीत कथित केले . त्याचं शोधाचे श्रेय
श्री भिडे गुरुजी आणि श्री निनादजी बेडेकर याना जातं .
|
गुरुजी मार्गदर्शन करताना |
दिवस तिसरा -
आज काल परवा पेक्ष्या प्रचंड उत्साह होता . कारण हि तसेच होते . आज मोहीम श्री पावनखिंड
मार्गे जाणार होती . पावनखिंड कधी एकदा पाहतोय असे वाटत होते . बाजीप्रभू देशपांडे च्या रक्ताने
पावन झालेली ती गजापूर ची खिंड आम्हास खुणावत होती . आम्हाला हाक देत होती . त्याआधी भंडारा
( महाप्रसाद ) चा आयोजन होते . आम्ही खिंडी च्या मुखाजवळ पोहचलो . अंगावर काटा च आला . काय ते खिंडीचे रांगडं रौद्र रूप , बाजू प्रभू खिंडीत पुढे लढतायेत .
|
जंगलातून जाणारी वाट |
|
पावनखिंडीकडे जाताना |
|
पावनखिंडीत |
|
खिंडीतील पाणी |
|
खिंडीतून वाट काढताना बाबू दादा आणि हनुमंत चव्हाण |
|
वरून दिसणारी भयावह खिंड |
|
विसावू या वळणावर |
आणि हे बोल कानात घुमतायेत याचा भास होऊ लागला .
राजे , आता उसंत नाही .तीनशे धारकरी घेऊन तुम्ही गड गाठा .आम्ही खिंड लढवतो .'
' नाही , बाजी ! तुम्हाला सोडून आम्ही जाणार नाही .जे व्हायचं असेल ,ते होऊ दे .'
राजे ! आता बोलत बसायला फार वेळ नाही .एकदा वडिलकीचा मान दिलात तो पाळा .गड गाठा !.
'नाही , बाजी ! ते होणार नाही .,
मला सांगता ? या बाजीला ? राजे ,हि सारी फॊज बदलांची आहे . प्रसंग ओढवून घेतलात ,तर तुमच्या मुसक्या आवळून या पालखीतून तुम्हाला जाव लागेल . विंजाईशपत सांगतो ,यात तिळमात्र बदल घडणार नाही .. राजे बऱ्या बोलणं गड गाठा !
आमची चिंता करू नका , राजे ! तुम्ही गड गाठा ,गडावर जाताच तोफेची इशारत द्या .तोवर एकही गनिम या खिंडीतून आत येणार नाही .
,बाजी '
,बोलू नका , राजे , लहान तोंडी मोठा घास घेतला असला ,तर क्षमा करा .पण निघा राजे निघा , जा म्हणतो ना .
हे ध्यानी मनी घोळवत आम्ही ती चिंचोळी खिंड पार करत होतो . आज हि या घोडखिंडीची ( पावनखिंड , गजापूर खिंड ) भयानता आपल्याला जाणवते . ३५० वर्ष्यापुर्वी त्याची भयाणता ,दाहकता काय असेल याचा साधा विचार देखील केला तरी रोमांच वाटतो . भर पावसाळ्यात एखादा संतप्त ओढा खळाळत ,फेसाळत कसा येत असेल . बाजींचा पट्टा ,तो तलवारीचा खणखणाट आणि आर्त किंकाळ्या कश्या असतील याचा नंगा नाच आम्ही प्रत्येक पावलावर त्याचा अनुभव घायचा प्रयत्न करत होतो . शत्रू - शस्त्रांनी झालेल्या आघातांनी फाटलेल्या वस्त्रावर रक्ताची शिवण त्या खिंडीत चढली होती . आम्हाला ती चिंचोळी खिंड पार करायला ४ तास लागले .
तिथून टेम्भूरने -भातटली - गजापूर असा इतिहासातील मार्गाचा मागोवा घेत विशाळगडावर पोहचलो .
तिथून खाली दरी मध्ये
बाजीप्रभू आणि फुलाजी देशपांडे यांची समाधी जिथे आहे तिथे मुक्काम होता .
दिवस चौथा :-
आज मोहिमेच्या समारोपाचा दिवस . डोक्यावर भगवा फेटा ,हातात काठी अह्ह्हह्ह काय दिसतायेत धारकरी . विशाळगडावर हजारो मावळे श्री छत्रपती शिवाजी महाराज ,श्री छत्रपती संभाजी महाराज ,
बाजूप्रभू देशपांडे ,नरवीर शिवा काशीद (
हा जन्मला शिवा काशीद म्हणून आणि धारातीर्थ झाला प्रतिशिवाजी म्हणू काय ते भाग्य या शिवाचे ) फुलाजीप्रभू ,आणि यशवंत जगदाळे (
याचे नाव इतिहासात फारसे प्रचिलित नाही पण त्याचाही पराक्रम तितकाच ) याचं स्मरण करण्यासाठी ठाकले होते . सगळीकडे फेटे बांधून घ्यायची लगबग . लक्ष्य भिडे गुरुजींच्या शब्दांकडे .
गुरुजींचे शब्द म्हणजे पुढच्या वर्ष भराची आमची शिदोरी . तितकी शिदोरी पुढील मोहिमेसाठी पुरते .
आता लक्ष्य एकच ३२ मन सोन्याचं सिहांसन . . ..
विशाळगडाविषयी थोडंसं : -
हा दुर्ग पन्हाळगडापासून २० कोसांवर आहे . एकदम जबरदस्त गड . श्री विशाळगड लहान मोठ्या टेकड्यांची अशी काही विचित्र मांडणी आहे कि , तो अगदी जवळ येईपर्यंत कळतही नाही . कारण श्री विशाळगडाच्या अलीकडेच मोठी दरी आहे . जणू काही आईच बोट धरून एखादे मुलं बसल्यासारखे सह्याद्रीच्या ८ - १० लांब अरुंद वाटेने श्री विशाळगड जोडला गेला आहे . तेवढी अरुंद वाट ओलांडली कि लागतात श्री विशाळगडावर नेणाऱ्या पायऱ्या .
हाही गड महाराष्ट्रातील इतर दुर्गाप्रमाणेच भोज शिलाहारांनी बांधला असे मानले जाते . या गडाच्या भोवताली मलिक उत्तुजार ,फाजलखान या मुसलमान सरदारांनी मराठयांशी लढाया केल्या व त्यात ते पराभूत झाले हि इतिहासाची साक्ष आहे .
श्री विशाळगडावर नरवीर श्री बाजूप्रभू आणि त्यांचे बंधू श्री फुलाजीप्रभू यांच्यावर श्री शिवरायांनी अंत्यसंस्कार करवले . बाजी आणि फुलाजी या दोंघाची समाधीस्थळे अद्दापही श्री विशाळगडावरील पाताळदरीत आहेत .
इ . स १६८९ मध्ये औरंग्याने या गडाला वेढा दिला ,चहुबाजूनी कोंडी केली . अखेर नाईलाजाने मराठ्यांनी पांढरे निशाण दाखवले . गड त्यांच्या ताब्यात गेला अन त्याच्या खुणा आजही गडावर आहेत . गडावर प्रवेश करतानाच महादरवाजा होता . पण तो गोऱ्या लोंकानी १८१८ साली तो भुईसपाट केला . आणि पारतंत्र्याच्या काळरात्रीस प्रारंभ झाला . तेथील मुंढा दरवाजा अद्दापही आहे . श्री राजाराम महाराजांचे श्री सिंहगडावर निधन झाल्यांनतर त्यांच्या पत्नी अहिल्याबाई तथा अंबिकाबाई या हातात श्री राजाराम महाराजांचे पागोटे घेऊन सती गेल्या ,त्या जेथे सती गेल्या तेथील वृन्दावनचेही दर्शन घेतलेच पाहिजे असे पवित्र ठिकाण या गडावर आहे . या गडावरील सर्वच दरवाजे पडलेलले आहेत . सरकारवाडा नावाची वास्तू आणि एक पिराचा दर्गा आहे . गडावर दोन तळी आहेत . भोपाळतळे व अर्धचंद्र तळे आणि शेजारीच श्री महादेवाचे एक छानसे मंदिरही आहे . तेथील शिवलिंग अतिशय सुंदर आहे . श्री पन्हाळगड आणि श्री विशाळगड तसेच श्री पावनखिंड पाहिल्यानंतर श्री शिवछत्रपतींच्या कर्तृत्वची ,सामर्थ्याची खूण पटेल यात संशय नाही
काही श्लोक :-
इतिहास वाचू विचारू स्वतः ला ।
कसा ऱ्हास आणि किती नाश झाला ? ।।
उठा हिंदूंनो ! संपवू आत्मघात ।
" शिवाजी " स्मरू मंत्र नेहमी उरात ।।
।। राष्ट्रांत निर्मु अवघ्या शिवसुर्यजाळ ।।
ठवे पोपटांचे जिथे पेरू बाग ।
वने चंदनाची तिथे नित्य नाग ।।
दुधासाठी मांजर फिरे दारोदारी ।
जिथे स्वार्थसत्ता तिथे हे पुढारी ।।
श्लोक इथे लिहावे तितकं कमी आहे .
मोहीम फत्ते झाली
त्यात सहभागी हजारो धारकरी
श्लोक साभार - योगेश देशपांडे
छायाचित्र साभार - मनोज मरकळे , सच्चिदानंद चिटणीस
आणखी काही छायाचित्रे
|
समारोप |
|
भिडे गुरुजी |
|
विशाळगडावरून दिसणारे भगवे वादळ |
|
गुरुवर्य |
|
बाजीप्रभू आणि फुलाजीप्रभू याची समाधी व असंख्य धारकरी |
काही विशेष सूचना :-
१ - मसाई पठारावर पाणी फारसे नाही त्यामुळे पाण्याची सोय
२ - मसाई देवी मंदिरासमोर पांडवकालीन गुहा आढळतात त्या जरूर पाहाव्यात
३ - श्री पन्हाळगडावरून विशाळगडाकडे जायला २ वाटा आहेत - राजदिंडी , पुसाटी बुरुज
४- कमीत कमी ३ दिवस वेळ काढूनच श्री पन्हाळगड ते विशाळगड करावा
५ - श्री पावनखिंडीत खाली उतरून प्रवाहाच्या मार्गाने गेल्यास आपण सरळ विशाळगडाच्या पायथ्याची असणाऱ्या गजापूर या गावात पोहचू .
६ - पावनखिंडीचा रणसंग्राम जाणून घायचा असेल तर हि यात्रा करावी
७- आपण फिरताना आपला निसर्ग , आपला इतिहास , आपणच जपयला हवा याची जाणीव ठेवावी
।। श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान ।।
। राष्ट्रांत निर्मू अवघ्या शिवसुर्यजाळ ।
- प्रणव अजित मांगूरकर ( धारकरी कोल्हापूर विभाग )