Monday 3 October 2016

Dhak Caves ( Thriling experince)


ढाक  भैरी  ( अचाट  वेड साहस )

                  आषाढ़ श्रावण सरींनी पर्वत नाहुन निघाला आणि हिरवागार शालू नेसलेल्या सह्याद्री ने पुन्हा साद घातली .  एक अचाट साहस ( Rappeling ) करण्यासाठी ढाक भैरी च्या सानिध्यात जाताना यावेळी वेगळाच उत्साह होता . मनाला ओढ लागली निसर्गाचं आणखी एक रौद्र रूप पाहण्याची ते सर्व मनोमन अनुभवायची .
                   सह्याद्रीच्या कुशीत आलं कि दिवाळीच्या सफाई घरातील सगळी जाळी जळमटं निघून जावीत आणि स्वछ वाटावं असं चैतन्यं घेऊन मन अगदी ताज तवांन होऊन जात . कोवळ्या गवताच्या पात्यावरून उडणार धुकं धुंद करून सोडणार असतं . जंगल जाग होत होतं . आणि मागे कुठेतरी पक्ष्याची शाळा भरत होती त्यांचा किलबिलाट अजूनही कानात घुमतोय . इथल्या तांबड्या लाल होत जाणाऱ्या नागमोडी वाटा चुकण्यात हि सुख अनुभवणं आहे . असा  तो सह्याद्री
                    कधीतरी कुणीतरी विचारतं " तुला काय मिळतं किल्ले डोंगरमाथे पालथे घालून ?" त्यांना प्रतिक्रिया देताना विचार पडतो कि कसं सांगावं , आम्हाला काय मिळतं ते . म्हणजे मी शब्दात सांगूच शकत नाही . याच उत्तर तुम्हाला स्वतः ला भटकंती केल्यावरच कळेल ,झोपेचं खरं सुख सहयाद्री गार जमिनीला पाट टेकल्यावरच कळेल , तिथल्या सायंकाळचा गारवा ,काताळातले अमृततुल्य पाणी ,डोंगरमाथे पालथे घालताना उमजणाऱ्या इतिहासाच्या पाऊलखुणा ,भूतकाळाच्या गुजगोष्टी सांगण्यास आतुर असलेली गुहांमधील निरव शांतता ,दुर्गाची दुर्गमता जाणवणारे बेलाग सह्यकडे ,असं खूप  काही . त्यात नवीन काही वाचलं पहिला मग मन स्वथ्य बसतं नाही मग त्यात सुट्ट्याची जुळवाजुळव आणि भिडूंची पण !!!!!


                 




    ढाक भैरी गुहा उभ्या कातळात २७०० फूट उंचीवर असलेली , कशी तयार झाली असेल हि गुहा आकलनापलिकडचा थक्क करून सोडणार हा प्रश्न इथे आलं कि सगळ्यांना पडतो , केव्हडी हि निसर्गाची किमया ,
             सकाळी ज्यावेळी कामशेत ला पोहचलो तेव्हा तांबडं फुटायला सुरुवात झाली , एक छोट्या गावात पहाटे चहा/कॉफी काही  मिळेल का या शोधासाठी केलेली पायपीट . त्यातच  रिमझिम पाऊस , अश्यात चहा आणि मस्त गरम भजी अहाहाः  . . . . . .. . . फक्कड नाश्ता झाला . काही वेळाने आणखी एक भिडू कामशेत ला पोहचला .  आम्ही मग कामशेत पोलीस स्टेशन शेजारी आमचे बस्तान बसवले .   सुबोध दादा आणि गिरिदुर्ग टीम ची वाट पाहू लागलो . त्यांनी डेक्कन - शिवाजीनगर -निगडी  मार्गे कामशेत गाठले . यावेळी  बसमधील  मज्जा मस्ती ,गाण्याच्या भेंड्या [ वैदेही चा आवाज  लहान पण गाण्याची सुरुवात तिनेच केली  असणार (तिचा तो मोठा  आवाजात गुणगुणायचा केविलवाणा प्रयत्न ) ]नक्कीच खूप मिस केलं   . असो काही वेळाने जांभवली गावात प्रवेश केला तेव्हा चौकातील गजबज आमचं स्वागत करून गेली . थोडे पुढे गेल्यावर कोंडेश्वर च्या मंदिराकडे जायला उजवीकडे एक वाट जाते तिथून खरा ट्रेक सुरु होतं .
कोंढेश्वर मंदिर 
           या मंदिरात महिलांना प्रवेश नाही असं काही ऐकायला मिळालं . त्याच उत्तर मात्र मिळालं नाही .
असो 
            सर्वांचा परिचय समारंभ संपून आणि भगवान दादा ने rappeling विषयी दिलेली माहिती आणि त्याचे अनुभव ऐकत ट्रेक ला सुरुवात झाली  . पावसामुळे ट्रेक खूप अवघड होतं चालला होता . सगळीकडे चिखल ,
छोटे छोटे धबधबे यामुळे वाट निसरडी झाली होती . थोडे वरती गेल्यावर निसर्गाचे अविस्मरणीय रूप पाहायला मिळालं . दोन्ही बाजूला खोल दरी . प्रचंड धुक आणि आजूबाजूला उमललेली कारवीची फुले त्यावर बागडणारी फुलपाखरे

त्या धुक्यातुन वाट काढत गर्द जंगलात पोहचलो . जवळ जवळ वासोट्याला आलोय असाच फील होता . काही वेळाने खिंडीत पोहचलो जिथून कर्जत ,ठाणे या ठिकाणावरून राजमाची आणि भीमाशंकर ला जायला वाट आहे . एकदम जुन्या ट्रेक ची आठवण आली . इथूनच कुठेतरी वाट चुकली होती राजमाचीची . असो ती खिंड पुन्हा चालून वरती आलो ढाक च्या किल्ल्याजवळ . इथून खरा कस लागतो आपल्या संयमाचा आणि मनाचा . इथून खाली उतरायचा हा विचारच ( एक वेड साहस ) थक्क करून सोडणारा . भगवान दादा च्या मागे सर्व जण हळू हळू एकमेकांना धीर देत येत होते . जरा जरी पाय घसरला तर मग कपाळमोक्ष च . आम्ही खाली उतरून बाकींच्यांना वाट दाखवत पुढे जात होतो . त्यातच छोटा पाण्यातील साप त्याचे पोहण्याचे कर्तब दाखवत होता . त्याला बाजूला केला आणि पुढे ज्या साठी इथे आलो होतो ते अगदी डोळ्यासमोर दिसत होत कधी एकदा तिथे जातोय असा वाटत होत .
दोर खंड 
     जवळजवळ १००  मीटर चा तिरका खडा कातळ आणि खाली खोल दारी . त्यातच रिमझिम पाऊस त्यामुळे थ्रिल आणखीनच वाढलं होतं . पहिला मी प्रयत्न करून बघू म्हणून पुढे गेलो ,पण पहिलच पाऊल घसरलं त्यावरून पुढे येणाऱ्या कठीण मार्गाचा अंदाज आला . मजल दर मजल करत एकदा खाली पोहचलो . तोपर्यंत बरेच ती खिंड पार करून आले होते . तिथे बांधलेले ते दोर नसते ते इथपर्यंत येन निव्वळ अशक्यच . पहिला जो कुणी इथे ते दोर लावून गेला त्याला मनापासून धन्यवाद .
लोखंडी साखळदंड 
   तिथून वरती गुहेपर्यंत जायला उभा १६० फूट उभा कातळ चडून जावा लागतो तो फक्त या लोखंडी साखळदंड आणि आपल्या स्वतः च्या आत्मविश्वासाच्या बळावरच एकदा चढायला सुरुवात केली आणि खाली थोडेसे जरी पहिला तर मग सॅम्पल सगळं इतक्या उंचीवर आपण उभे फक्त त्या दोरीच्या साहाय्याने .
getting from google 
   इथे उभे राहून फोटो काढायची इच्छा तर खूप होती पण धुके आणि पाऊसामुळे एकही फोटो काढता येत नव्हता . इथून फक्त ३० फूट वर कसाबसा चढलो तर पुढे जायला वाट मिळेना . पुन्हा खाली उतरू शकत नव्हतो . इथून खाली उतरणे हा विचार पण अनेकांना इतक्या पावसात घाम फोडू शकतो . थोडंसं आजूबाजूला पहिला एक वाट सापडली पण ३ फूट स्वतः ला वरती खेचायचं तेपण इतक्या उंचीवर तेपण एक दोरीला धरून . प्रयत्न केला आणि वरती आलो . वरून वाट पाहिला तर मी डाव्या बाजूने वरती आलो पण वाट तर उजव्या बाजूला होती . त्या माझ्या चुकीमुळे  इतरांना तर फायदा झाला निदान योग्य मार्ग तर मिळाला यातच कायतर सुख ... तिथून 
थोडे वरती गेल्यावर ७ पायऱ्या लागतात . ते पाहून थोडंसं रिलॅक्स वाटलं . वरतीही पायऱ्या असतील या विचाराने फास्ट गेलो तर वरती आणखी विचित्र वाट . तसे पहायला गेलं तर याआधी मी येऊन गेलेलो . पण ते विसरून आपण पहिल्यांदाच असे काहीतरी करतोय असा विचार केला तरच काय ती मज्जा अनुभवता येते . असो ती वाट ना तिथे धरायला काही, दगड असून त्याला धरता येतं नाही . आपण बरेच जण घरात शिडी वापरतो ( पुण्यात घोडा) असेही म्हणतात . तशीच'काहीशी वाट पण फक्त दोन झाडाचे बुंधे एकमेकात दोरीच्या साह्याने बांधलेले . 
शिडीची वाट 
त्यावरून वरती जायचं . पहिल्यांदा अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही . मनात नको ते विचार येतात . पन असो फारतर २० फूट राहिला होता . त्यामुळे हुरुफ आला होता . त्यात पहिला जाऊन त्या मंदिरातील घंटा वाजवायची होती . सावकाश एक एक पाऊल वरती घेत वरती आलो . स्वर्ग सुख काय म्हणतात ते इथे आल्यावर कळेल .शांत निरव शांतता . ज्यासाठी आलो ते पूर्ण केल्यावर जो आनंद होतो ना . याच साठी केला होता अठ्ठहास . माझ्या पाठीमागे नूतन , वैदेही आले .त्यांना वरती घेतलं . 
गुहेतून दिसणारे दृश्य 



मंदिर
                         

भगवान दादा आला आणि सोबत रॅपलिंग साठीच दोर आणि सेफ्टी हे सगळं एकटा घेऊन आला . जिथून माणूस यायचा अवघड तिथून इथे सामान घेऊन आला . काहीतरी वेगळा पाहतोय असाच वाटत होतं . असो जवळ जवळ १ तास झाला तरी आम्हा ४ भटक्या शिवाय गुहेपर्यंत कुणीही अजून आलेले नव्हतं . मिन आपलं हार्नेस बांधून नुसताच रॅपल्लिंग साठी तयार होऊन बसलो . पुढच्या अर्धा तासात ६ जण कसेबसे आले . मग रोप बांधून रॅपल्लिंग चा श्रीगणेशा केला अर्थात माझ्यापासूनच . भीती वाटत होती .त्यात ट्रायल माझ्यावर काही झालं तर फुकटचा गेलो तर .
rappelling 
जो rockpatch चढायला ३० मि लागले तोच खाली उतरायला ३ मी पण नाही लागले . पुन्हा वरती चालून गेलो आणि मंदिराच्या सुरुवातीला बाकीच्या ट्रेकर्सना मदत करत बसलो . त्यात मला कुणीतरी माझी सेफ्टी हि घेतली चक्क्य मला दोराने बांधून घातलं . खूप काठावर बसलो होतो . त्यामुळे  ३ वाजेपर्यंत ३४ जण गुहेपर्यंत आले . हळू हळू rappeling सुरु होतं . तिथे मदत करायच्या नादात माझ्याकडून  सुबोध दादाचा कॅमेरा भिजला आणि शेंदुराने माखला . मग जरा ओरडा  खाने रास्त च होतं . इतक्या विश्वासाने मला कॅमेरा दिला होता आणि मी त्याची अशी हालत करून ठेवली . असो पुन्हा एकदा rappelling करायची इच्छा होती पण अजून निम्मे   ट्रेकर्स खाली जायचे  बाकी होते  . सर्वात शेवटी निखिल आणि धनश्री लास्टच्या ट्रेकर्सना घेऊन वरती आले    .  जसा वरती आलो तसा खाली उतरून बघू म्हणून सुरुवात केली . मग कळून चुकलं खाली उतरणे किती अवघड आहे . 
खाली उतरलो . आणि बॅक तू खिंड . खिंड पार करून . माझा जंगल ट्रेक'सुरु झाला. इथे कसलाही गोंगाट नाही का शहरातील गाड्याचा आवाज नाही इथे फक्त मी ,जंगल आणि पक्ष्याचा किलबिलाट . पुढे गेल्यावर आमच्यातील आणखी ४ ट्रेकर भेटले . मग गावात येऊन पोहचलो तेव्हा ६ वाजत आले होते .  गावात मस्त चहा झाला . आमच्या बस च्या ड्राइवर चा आजचा अनुभव एकूण झाला ,कसा तो आज  जंगलात हरवला आणि कसा पुन्हा गावात आला . अनुप्रिता ,समीर ,नूतन ,पंकज आणि मी असा गप्पाचा कट्टा जमलेला ,गप्पा , आणि त्यांनी अनुभवलेले  real life  experince त्यात  कधी ७. २० झाले आणि अंधार पडलाय हेच समजले नाही काही वेळाने सर्व ३५ ट्रेकर्स rappelling करून जांभवली गावात परत आले . पावसात हा ट्रेक आणि rappelling केलं हे बऱ्याच ट्रेकर्स ना पटणार नि नाही . पण we 35 trekkers of giridurg have done that very sportingly .  


 snaps for my  phone last time visit
















3 comments:

  1. Ekdm surekh varnan Pranav... 👏👍

    ReplyDelete
  2. Its so awsm yaar pranav. Really it's so fantastic & thrilly. Best luck. Keep it up bro.

    ReplyDelete