Tuesday, 3 January 2017

आठवणीतील भटकंती ● कळसुबाई @ हरिश्चंद्रगड



                          कळसूबाई  शिखर सर करायचा खुप दिवसापासून मानस होता ,खुप दिवसापासून नाही तर तब्बल ३ महिन्यापासून पण योग जुळून येत नव्हता , शेवटी बेत ठरला या वर्षाची  शेवटची भटकंती कळसूबाई शिखर पादाक्रांत करून होणार .
                          भटकायला जायच्या आधी जय्यत तयारी असते पन  काही कारणास्तव ते यावेळी जमले नहीं  .
समोर जे काय  दिसेल ते बॅगेमधे भरल  . ती पाठीवर घेऊन वारजे पुलाजवळ   सांगली तुन येणाऱ्या भटकयाची वाट पाहू लागलो  . आम्ही ५ भटके आहोत असा समजल होत  . पण आमच्यासोबत मल्हार देखील येत होता  .
अजुन एक भटका सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर बागडण्यासाठी सामिल होत होता   . महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर सर  करुण तो   त्याची भटकंतीची सुरुवात करणार  . सह्याद्री चे रांगड़ रूप अनुभवायला आम्ही रात्रि सुरुवात केली  .
               पुण्यातून वाकड - नाशिक फाटा - संगमनेर -अकोले -राजूर - बारी असा २१० मैलाचा प्रवास करायचा होता  . नाशिक फाट्याजवळ फक्कड़ चहा घेऊन  पुढे कूच केली  . रोड कितीही रुळलेला असला तरी रात्री कुठेतरी  तो चुकतोच  . आम्ही संगमनेर या गावात न जाता बायपास घेतल्याने रस्ता चुकला  . संगमनेर बस स्टैंडपासून डावीकडे अकोले  रस्ता लागतो  .  या रस्त्यावर रात्री कुणीही नसत  . भयान काळोख  . सुनसान रस्ता पाठीमागे सोडत आम्ही रात्री ३ वाजता अकोले गावाजवळ मारुती मंदिरात पड़ी घेतली  . पण बाहेर इतकी ठंडी  १२%  तापमान  . झोप तर लागणार नव्हतीच  पण  बाबु दादा निवांत झोपला होता  ,काल पासून  ५०० मैल गाड़ी चालवत त्याने आम्हाला एथेपर्यंत पोचवल होत  . ५ वाजत नाहीत तोपर्यन्त कोलाहल चालू झाला  . अजुन ५० मैल अंतर दूर बारी गांव  . शेकोटी पेटवण्याचा असफल प्रयत्न करुण पुढे निघालो   .
                                                      निसर्गाने त्याच रूप दाखवायला सुरुवात केली  होती। . रस्ता मागे पडत गेला तशी सह्याद्रीची ऊंची वाढत गेली  . हवेत आणखी गारवा वाढला  . बारी गांव तसे छोटेखानी पन टुमदार तिन्ही बाजूनी डोंगरानी वेढलेल ,पायथ्याला भाताची खाचर  . हे आणखी काही वेडे आलेले दिसतायेत अश्या नजरेने गावातील लोंकानी आमच्याकडे पाहिले  . चहा अणि पाण्याच्या बाटल्या घेऊन शिखर चढायला सुरुवात केली  .
             
गावातून दिसणारे सुंदर दृश्य 



                                  सुरुवातीला  एक ओढा लागला  . पाणी फ़क्त ते नावालाच  . थोड़े अंतर चढून गेल्यावर उजव्या हाताला एक मंदिर !!!!!!   हेच ते कळसुबाईचे मंदिर। भक्तांसाठीच जणू ती खाली येऊन राहिली असावी
कळसुबाई मंदिर ,
गावाजवळील 

कळसुबाई माची मंदिर 


कळसुबाई चे प्रवेशद्वार 


         पुढे चालायला  सुरुवात केलि  .  शुभम  अणि मल्हार   पुढे  मध्ये  प्रस्सना (पप्पू दादा ) , प्रसाद  अणि सर्वात मागे मी अणि महेंद्र ( बाबु दादा ). बाबु  दादा चे मला विशेष कौतुक  वाटतय की हा इतके लांब ड्राइविंग करुण येऊन एकदाही " तुम्ही जा , मी बसतो  असे म्हणाला नाही  . 
                        काही वेळानंतर एक लहान पठार आले  . इथे काही वेळ विश्रांती घेतली  . पाणी , घरातून आणलेली भाकरी ,पोळी यांच्यावर ताव मारून पुढे निघालो  .  पुढे आल्यावर मल्हारला  थोडस लागल,
हीच त्याची  भटकंतीची खरी सुरुवात म्हणावी लागेल  . 
मल्हार 
     इथून पुढे तिथला स्पेशल शिडी ची वाट सुरु होते  . मला सोडून बाकीच्याना तसे हे नविन होते  . एथे पाय जपुन टाकावा लागतो  . सटकला तर दोन दात  पडणार हे ठरलेलेच।  काही शिड्या दगडी  पायऱ्या लोखंडी रेलिंग अश्या आहेत तर कही पूर्ण लोखंडी २ इंची angle मध्ये बनवलेल्या  . आणखी २  वेळा पठार अणि चढ़न असे केले की पोचलोच असे बोलत सर्वाना १३०० मी ऊँची वर घेऊन आलो  . अजूनही  बरच अंतर व् चढ़ाई बाकी होती  . मग मात्र क्षणभर विश्रांती घेऊन लिम्बु सरबत करुन घेऊन पुन्हा नव्या जोमाने चढ़ाई सुरुवात केली। 
आता शेवटच्या कस काढणाऱ्या शिडीला येऊन थांबलो  . साधारण ५० पायऱ्याची अणि ६० ते ७० फुट लांब ही शिडी कळसूबाई का अवघड आहे , ते  सर करने कुणाचेही काम नाही याचा जणू प्रत्ययच देते  . ती एकदा पार केली की शब्दशः स्वर्ग काय असतो याची प्रचिती येते  .
निसर्ग 

मल्हार शिडी चढताना 

डावीकडून प्रसाद (पिंट्या ), बाबु दादा 

१३०० मि उंचीवरून दिसणारे कळसूबाई माचीचे पठार 

जल्लोष 

१६४६ मी उंचीवर शुभम ,प्रसाद ,मि ,मल्हार ,बाबु दादा ,सेल्फी काढताना प्रस्सना (पप्पू दादा)

पैनारोमा वीव 


कळसुबाई मंदिर 

बाबु दादा शिडी उतरताना 

आमचा सोबती (गोल्डन मिहीर ) इति ( मल्हार ने नामकरण केलेला  स्वान )
           
sunset from wilson dam
           तिथे काही वेळा नंतर जेवण करुन खाली उत्तरायल सुरुवात केली  . संध्याकाळी ५ वाजता बारी गावात पोहचलो  . तिथुन हरिश्चंद्र गड   सर करायला जायचे होते त्यामुळे , लगेच बाहेर पडलो। पण रात्री कुणी गड सर करायला तयार होतील अशी स्तिथि नव्हती  . शेवटी  भंडारदरा डैम पहायचा अणि पुढचा प्लान थरवायचा ऐसे एकमत झाले  . कळसुबाई पासून फ़क्त १२  मैलावर शेंडी भंडारदरा हे गांव तिथे  हा  इंग्रजकालीन धरण "सर विल्सन  डैम "
nature creativity




गावात पाहायला मिळालेली अनोखी पाटी 
     तिथुन  मग आज रात्री  पांचनाई गावात मुक्काम करायचा  . असा निर्णय झाला  लगेच भास्कर  ला फ़ोन करुण आमच्या मुक्कामाची सोय झाली  . अंधार  झालेला होता आणखी ४६ मैलाच अंतर कापायच बाकी होत.
रस्ता चा उल्लेख न केलेला बरा।  रात्रि शेवटचे ६ मैलाच अंतर पूर्ण करायला १ तास  लागला। भास्कर ची भेट झाली , मस्त भाकरी पीथल  यावर अडवा हात ,मारला   . भास्कर च्या आईकडून आमचे झालेले लाढ specially मल्हार साहेबांचे , याला स्पेशल टेंट ची वव्यस्था भास्कर ने करुण दिली।  यांच्याकडून दरवेळी नवीनच काहीतरी अनुभवायला मिळत 
                             

हरिश्चंद्रगड फोटो एल्बम 
























       


     सर्व भटक्यानी खालील  गोष्ट्टी लक्षात ठेवाव्या 
 


                                  

                                                   

3 comments:

  1. वा . वाचल्यानंतर अगदी कळसुबाई वर पोहोचल्यासारखं वाटलं. फक्त चढल्याचे श्रम झाले नाही.
    फोटो तर अप्रतिम . ����

    ReplyDelete