Tuesday, 2 April 2019

माहुलीची काळरात्र

माहुली कधीही रिकाम्या हाती पाठवत नाही.... अगदी शिवकाळापासून ही परंपरा आजतागायत सुरू आहे... आम्हाला पण माहुली ने बरेच काही दिले... माहुलीचा दौलच न्यारा .....
            आम्ही आमच्या नवीन कामाची सुरुवात अनिकेत च्या आणि  बऱ्याच भटक्यांना भुरळ पाडणाऱ्या माहुली चे दर्शन घेऊन...  माहुली आमच्या निस्सीम भक्तीला पावणार हे माहिती होतं.... पण आमच्या प्रेमाची आणि  भक्तीची माहुली अशी परीक्षा  घेईल असे कधी स्वप्नात सुद्धा वाटले नव्हते.... तयारी तर परिपुर्ण होती.... सणसणीत अस्सल नियोजन झालेलं.. पुढील 3 एक दिवस तानसा अभयारण्य पिंजून काढणार होतो...   .... भर रात्री 11 ला सुरुवात झाली... खरी.. पण  भयंकर उष्मा आणि खडी चढाई... पाठीवर  20 एक किलो सामान.. वरती माथ्यावर पोचायला पहाटेच  4 वाजले ... येरवी आम्हाला भर उन्हात 3 एक तास लागले असतील पण यावेळी काहीतरी विपरीत च घडत होतं... असो सकाळी सुरुवात झाली सुंदर अश्या मनमोहक सुर्यदयाने ... दिवसभर मनासारखं शूट झालं... रात्री मुक्कामाला आम्ही .. मस्त जागा निवडली .खरी .. पण आजवर अशी रात्र वैराच्या ची वाटेला येऊ नये.. अशी .. . आमचा नुकताच टेंट लावून झाला होता... जेवण बनवायची तयारी चालू होती.. अचानक ढग दाटून आले.  विजांचा कडकडाट चालू झाला.. पाऊस आला की सगळा प्लॅन फसणार हे माहिती होत.. जवळपास लपायला ही काही नव्हता.. माहुलीची गुहा ..किंवा .. मुख्य महाद्वार हे आमच्यापासून 1 तासाचा अंतरावर ... वाटेत रात्री कालाकुठ्ठ अंधार... त्यात.. आमचा सगळा कॅमेराच्या संसार आमच्यासोबत... अख्य करियर दावणीला लागलेलं... 2 एक मिनिटात।। चांगली जागा शोधून आडोसा पाहू असा निर्णय झाला.. खाली आलो .. पुन्हा टेंट लावला... गेले 20 तास आम्ही फक्त पायपीट करत होतो.. आता थोडी उसंत मिळेल .. असे वाटलं.. पण पुढेही.. मोठा काहीतरी प्लॅन  माहुलीने आमच्यासाठी आखला होतं... 15 मिनिटात.. विजा बंद झाल्या.. हे असं आमच्याच बाबतीत का होतं काय माहिती.. चांगली जागा सोडून आम्ही ना घर का घाट का अश्या ठिकणी अडकलो ... वरती होतं त्यावेळी वीजा आणि खाली आलो त्यावेळी अचानक... इतका वारा आणि धुक्याची चादर पसरली की आम्ही 1 फुटावरच पाहू शकत नव्हतो.... हेड टॉर्च असून आणखी टॉर्च लावल्या तरीही काहीच दिसत नव्हतं..  20 मिनिटात हे पण वादळ शमले..
            ‎पण अजूनही काहीतरी पुढे होतेच.. थोडा मोकळा श्वास घेतोच तोवर... बरेच.. सरपटणारे प्राणी आजूबाजूला येऊन आपली हजेरी देऊ लागले..  . आजवर  बिबट्याचे किस्से आम्ही माहुली बाबतीत एकलेत.. पण साप बाबा  आमच्या दिमतीला हजर होईल हे ध्यानी मनी पण नव्हतं.. बर आला तर आला.. हजेरी दिली .. आम्हाला फुंकरा देऊन जायचं.. पण नाही... त्याला हाकलून लावायचे असंख्य प्रयत्न केले पण नाही....  सर्वांची दमछाक होऊ पर्यंत आम्हाला सापाने दमावलं... त्यात विषारी साप त्यामुळे पंगा घायचा प्रश्न च येत नव्हता.. सुमारे दीड1 तास याने खूप दमावलं.. आमच्या सगळ्या टॉर्च त्याच्याकडे पॉईंट करून होत्या... दिवसभर कष्ट कमी होते.. म्हणून हे रात्रीस खेळ चाले हे title शोभेल असे प्रसंग चालू होते... साप आता जाईल मग जाईल याची च वाट आम्ही 4 जण पहात होत.. सोबत गावातील माहितगार असा गुरू ही होता... त्यामुळे भीती थोडी कमी होती..  हा साप एकटा कमी होता.. म्हणून .. दुसरा साप ही त्याचा दिमतीला मागून आलाच... आता कुठेच जाऊ शकत नव्हते... वरती बांबू पिट viper आमची मज्जा पाहतोय... आणि खालती.. पांढऱ्या होताच...  ..टॉर्च मध्ये 2 दिसले पण आजूबाजूला आणखी असण्याची जाणीव क्षणगाणिक वाढत होती... त्यामुळे .. तिथून काढता पाय घेणं .. महत्त्वाचे होते...  सापांमुळे आमची पुरती भांभेरी उडालेली... तिथून टेंट आम्ही सेकंदात कसा गुंडाळला आगे जो होगा देखा जायेंगा असे म्हणून अक्षरशः पळत सुटलो..  सुरक्षित जागा इथून अजून.. 50 एक मिनिटांवर.. त्यात लक्ख असा काळोख.. त्यादिवशी रात्र का असते .. थोडक्यात.. रात्रीचा राग आला होता... आम्ही आव आणून फक्त सूर्योदयाची वाट पाहत चालत होतो.. रस्ता .. अगदीच अरुंद.. आजूबाजूला घनदाट जंगल.. .. त्यामुळे.. रात्रीचा खेळ ऐन रंगात होता..   शेवटी.. तासाभराच्या पायपीट आणि रात्रीचा पाठशिवणीचा खेळ करून ध्वजाजवळ पोचलो..  सकाळ झाली.. पुन्हा .. आमची कामे चालू झाली... पण माहुलीचा हा प्रसाद आमच्यासाठी एक आठवण.. आणि  अनोखी पर्वणी होती..
                                   क्रमशः........

Monday, 12 March 2018

सह्यगिरीतील 360 सेकंद

             सह्याद्रीतील अशी ३६० सेकंद . ज्यासाठी किमान एक - दीड वर्षे खर्ची गेलीयेत ,ती ३६० सेकंद एका अवलिया भटक्यांसाठी, उकृष्ठ कलाकारांसाठी सह्याद्रीने मंतरलेली निसर्गरूपी चादर च ..
          आपण आज या प्रवासात कोणत्याही गडकिल्ल्यावर वा घाटवाटेत विहार करणार नाहींआहोत तर सह्याद्रीशी प्रामाणिकपणे केलेल्या कार्याचा मागोवा घेणार आहोत , चला तर मग सफर करूया निसर्गाच्या कलाकुसरीची... आणि  कलाकाराच्या कार्याची


          आज थोड्या वेगळ्या विषयाचा मागोवा घेतोय , बऱ्याच जणांना अजूनही प्रश्न पडला असेल हा सारखा ३६० चा जयघोष करतोय पण ते नेमकं काय . तर ही छोटीशी ६ मिनिटांची सह्याद्रीच्या कलाकुसरीची शॉर्टफिल्म .  एक भटका जिवलग मित्र अनिकेत कस्तुरे याने एका ध्यासाने केलेली प्रायोगिक तत्वावर केलेलं चित्रीकरण . आज त्याने केलेल्या अथक परिश्रमाचं फळ आज 10000 लोकांच्या नजरेत दिसतंय . एक छोटी पण अतिशय महत्त्वाची एक पायरी आज सर झालीये त्याच  या सह्याद्री पार्ट1 या चित्रफितीचा हा घेतलेला मागोवा .....


         आपला सहयाद्री हा खऱ्या अर्थाने पर्वत नसून ती दख्खन पठाराची विभंग कडा आहे . सह्याद्रीला संपूर्ण जगात सह्याद्री या त्याच्या अस्तित्व रुपी नावाने लौकिक जिवंत ठेवणे त्याचे अवर्णनीय सौन्दर्य कॅमेराच्या माध्यमातून चित्ररूपी रुपात रंगवणे हेच ध्येय । ध्यानी मनी फक्त हाच वसा घेऊन सुरुवात केली खरी , पण कोणतेही काम अगदी सहज सुलभतेने झाले तर त्याची कष्टाची चव चाखता येत नाही . अनिकेत पुढे तर एक भली मोठी कोकणकडया सारखी अभेध्य मोठी भिंत उभी होती . असंख्य अडथळे ,खाच खळगे हे सर्व परिक्षा घेण्यासाठी उभे होतेच . 


              सुरुवात झाली ती ज्येष्ठा मेघांनी पण तोच सर्वात मोठा अडथळा ....( एखाद्य शिल्प आपल्याला प्रचंड भावतं खर . पण त्यामागील कथेचा आपण कधी जाणीवपुर्वक विचार केलाय का . हा पण एक संशोधनाचा विषय असो . त्या कालाकुसरीला रूप देणारा तो म्हणजे शिल्पकार आणि त्याचे हत्यार . ) .....सह्याद्रीला चित्रफितीत कैद करण्यासाठी छायाचित्रकाराचे  हत्यार  ते म्हणजे स्वतः च्या जीवापेक्ष्या प्रिय असा  त्याचा कॅमेरा .. म्हणून मी ज्येष्ठा च्या मेघांना  सर्वात मोठा अडथळा म्हणालो . पावसात  कॅमेरा घेऊन चित्रीकरण करणं हे खुप मोठं दिव्य काम म्हणता येणार नाही ...बरेच जण म्हणतील त्यात काय एवढं सेफ्टी घेऊन चित्रीकरण करायचं पण सह्याद्रीच्या नभांसोबत हे असला वेढ  धाडस करणं हे काही खायचं काम नाही. सह्याद्रीच्या अनवट पायवाटा तुडवायच्या तेपण सगळा संसार घेऊन .  सोबतीला एकमेव साथीदार तो म्हणजे सह्याद्रीच त्याचा तो मित्र  कोसळणारा प्रचंड पाऊस आणि निसरड्या वाटा ...



                यापुढील  behind the scenes अनिकेत कडून ऐकलंय आणि पाहिलंय .. त्याचेच शब्दांकन माझ्या शब्दात ... हे असे …....…
                   नुकतच भटकू लागलो होतो . कोणतरी फोन करावा .. येतोयस का इकडे चाललोय तिकडे चाललोय भटकायला .. आपण always रेडी . बॅग तर तयारच असते . जरा खाऊ टाकला पाणी भरून घेतलं. की ठोकली ना धूम...... पण आता एका संकल्पपूर्तीसाठी प्रयत्न करायचे व संकल्प सिद्धीस घेऊन जायच . हाच ध्यास असलेने योग्य नियोजन करणे भागच होते. पहिला कॅमेराच्या गौडबंगाल मोठं... कॅमेरा क्रॉप सेन्सर .. त्यावर फुल्लफ्रेम चा result काढायचा  प्रयत्न. त्यासाठी करावे लागणारे जुगाड .. त्याची सोय करायची. प्रवासासाठी स्वतः ची गाडी नाही ... मग" गाव तिथे एस टी " ही संकल्पना आपल्यासाठी च . याची चांगलीच जाणीव झाली .  सगळा संसार सोबतीला घेऊन महामंडळाच्या एस टी चा प्रवास हेपण एक मोठं दिव्य.. त्यात त्या वर्षी पावसाला पण प्रचंड चेव चढलेला .. तो काय विश्रांतीचे नावच घेईना. त्या पावसाने कॅमेराला कवेत घेतला की झालं तर . अख्ख आयुष्य टांगणीला. करिअर वरच पाणी .. फिरायचं . असे नानाविविध प्रश्न सोबतीला होते. 



            वर्षभर हळूहळू . सर्व छायाचित्रण पूर्ण केलं. त्या संपूर्ण वर्षात .. जे काय काय भोगलंय. ते आठवलं तरी आजही अंगावर काटा येतो.  धड आपण खुप कामवतोय असेही नाही..  पैसे नसताना पोटाला चिमटे काढून दिवस काढले. टेंटशिवाय काढलेली भरपावसातील काळरात्र ..पावसात भिजल्याने आलेलं आजारपण त्याचेही औषध सह्याद्रीतच शोधल. त्यातच पोटापाण्यासाठी चाललेली धडपड.. या सर्वांचे फलित आपल्या समोर आहेच.
                   Back to my words .....
     आज हे आपल्या समोर मांडतोय याचं कारण . या व्हिडिओने 10000 चा पहिला टप्पा पूर्ण केला तो एक आनंद दाई क्षण आणि एका कलाकाराला एका वेगळ्या पद्धतीने दिलेली दाद म्हणा ना .. आज आम्ही या अनिकेत घेतलेल्या ध्यासाला सोबत करतोय ... सोबतीला बरेच मित्र आहेत , माझेही एक खूप वर्ष्यापासूनचे स्वप्न पूर्णत्वास जातंय .. आम्हाला यापुढे ही अशीच साथ हवी .. तुमच्या पाठवळाची , तुमच्या आधाराने उत्तम पद्धतीने सह्याद्रीतील  मृगजळ रुपी अद्भुत सौन्दर्य आपल्या समोर घेऊन येऊ ... 

      धन्यवाद अनिकेत आमच्या  स्वप्नांना मार्ग दाखवून आकाश मोकळे केल्याबद्दल ... सह्याद्री 1 मधील आणखी 2  कलाकार त्यांच्याशिवाय काही गोष्टी अपूर्ण होत्या ते म्हणजे हृषीकेश गंगन आणि आनंद पांडे ..
.. सहयाद्री देवतेला नमन करून चला आपली रजा घेतो,
                           --- शब्दांकन  ( प्रणव मांगुरकर)
टीम मेंबर - मिलिंद दीक्षित , आर्या कस्तुरे , वैदेही नेने , गोमटेश , दीपाली ,  सिद्धेश कुरपाने, अनिकेत कस्तुरे , प्रणव मांगुरकर )
    
     एवढं बोललो सह्याद्री १ बद्दल  तर एकदा त्याचीही सफर करूनच जाऊ मग क्लिक करा  -SAHYADRI PART 1       
Keep exploring  भटकेहो .......


             कुठेही भटकंती किंवा पर्यटनासाठी जातांना खालील गोष्टी अनुसरण करा ( सह्याद्री  ट्रेककर ब्लोगेर्स )

                  

Friday, 2 February 2018

प्रवास 2 राजधानांच्या राजगड ते रायगड ( via singapur ) भाग दुसरा



       
सह्याद्रीचा अप्रतिम पैनारोमा 



राजगड पासून  सुरू झालेली पायपीट वरोती ला येऊन थबकली .  सह्याद्रीच्या  काळ्या पाषाण दगडावर  आजवर  खूपवेळा  विसावा घेतला पण  आज  सह्याद्रीने  जणूं  हिरवी चादर घालून स्वागत केले ,  याआधी भ्रमंती करताना कधीही निवांत पणे सोय झाली नव्हती पण आज ती अनुभवली , आज झालेला सारा शीण कुठल्या कुठे निघून पळून गेला , रात्री सह्याद्री  ने  आम्हा ५ मावळ्यांना एक सुरक्षित छप्पर दिले मगच त्यांने  पावसाला  भूमी चिंब करायची  परवानगी दिली , रात्रभर  भर  पावसात  अडकलो असतो रायगड ला साद घालणे अशक्यच होते .. पण त्याची कृपा होतीच ,  पूर्ण रात्र  पावसाने  साऱ्या  पंचक्रोशीला  न्हाहून टाकलं , उद्या सकाळी बाहेर पडायचं की नाही यावर  शिक्का मोर्तब काही केल्या होईना , इतक्या प्रचंड जोरदार  धारा , सोबतीला  सोसाट्याचा वारा , पाऊस वेळेत थांबला पण पावसाने खुप आव्हाने पुढ्यात वाढून ठेवली  ,  गावातील काकांनी तर गाडीने  जा असा  सल्ला  वजा  इशारा दिला , पण गाडीने जाणारे भटके कसले त्यात तब्बल 3 महिन्यांनी असा  कसदार  तंगडतोड ट्रेक  चालू झाला होता .. पण  काढता  पाय घेतलाच 
वरोति गावामागील ओढ़ा व् बंधारा 

               सकाळी मस्त चहा घेऊन मिहिरच्या काकांसोबत  सोबत गावामागील  नदीवरील पूल  जवळ केला .  कालच्या पावसाने  थोडंफार पाणी  साठलेलं पोहण्याची  तीव्र इच्छा फाट्यावर मारून  नाइलाजाने तिथून निघालो , आज  वेल्हा ला नेमका बाजार असतो त्यामुळे , मोहरी ,एकलगाव , कुसुर पेठ येथील गावकरी  आठवडा बाजाराला  डोईवर सामान घेऊन तुरुतुरु  डोंगर उतरत होते .. अगदी लहान सहान पोर सारं पण आईचा पदर धरून मागे धावत होती ..  तीच गम्मत एक स्फुर्ती देऊन ताजेतवाने करून गेली .. वरोतिपासून सुरू झालेला चड अगदी कुसुरपेठ पर्यंत आहे .. वाटेतुन जातां जाता मागे वळून पहावं , मागे  तोरणा आणि राजगड  आमच्या  वाटचालीवर लक्ष देऊन उभेच ...  काय केल्या  आमचा पिच्छा  दोघांनी ही सोडला नाही .. 
तोरणा राजगढ़ एक फ्रेम मध्ये
कुसुरपेठेचा अंगावर येणारा चढ चढून  वरती आलो .. शिळीमकर काकांचा निरोप घेऊन सिंगापूर  गावाकडे कूच केली ..




काकांनी सांगितल्या प्रमाणे शिवाजी मोरे ना भेटायचं मग ते  येतील 

वाट दाखवायला मग गावात जायचं त्यांचा शोध घायचा असे ठरलं.. वाटेत  एकेठिकाणी शिदोरी सोडली तेवढ्यात मोरे काका पुढ्यातून जात होते .. जसा प्लॅन होता अगदी तसच  चालला होतं.. आमचं काम फक्त एकच काम ओझोवाल्याच ..  बस चलते रहो.. मोरे काकांनी सिंगापूर नालीचा पर्याय पुढे केला ..
भटके अणि सोबतीला \अभेद्य असा लिंगाना 

सिंगापूर नालीचा प्रवेश  


सोबती 
 कालच्या पावसामुळे बोरट्याची नाळ उतरणे  रिस्की होते सो  सिंगापूर चा उतार  चालू झाला .. आमची देपाळलेली चाल पाहता 5 तास  तर हमखास लागणार हे निश्चित ..  माझे अवसान तिथेच गळाले .  पाय दुखत असताना देखील फक्त खाज  या एका कारणासाठी इथवर आलो होतो... शेवटी संध्याकाळी 5 वाजता  सर्वात शेवटी  घाटावरून कोकणात उतरलो .. उतरताना भिकनाल, अग्या नालीचे विलोभनीय दृश्य डोळ्यात साठवत .आलो.. अरेरे थांबा एक  अति महत्वाचा  क्षण राहिलाच . तो म्हणजे आपला  भव्य अतिदिव्य , कातळ सुळका लिंगाणा हो........ आकाश ठेंगणे करणारा .. रायलिंगचा साथीदार .. इथे कधीतरी night स्टे नक्कीच करायचंय ... लिंगाणा 2 वेळा केला .. एकदा दुखापत झाली त्यामुळे निम्म्या तुन सोडून दिला . आणि दुसऱ्या वेळी  पाण्याच्या प्रचंड दुर्भिश्यामुळे राहून1 गेला.. असो ..
दापोली गावातील सुंदर असे दत्त मंदिर 

अक्राळ विक्राळ निसर्ग चमत्कार 

गमती जमती 

कवर फोटोसाठी चाललेली धडपड 

 दापोली गावातील ओढा पार करून मोरे काकांच्या घरी आलो .. पाठीमागे  वळून पाहिले तर  सह्याद्री ने  काय रूपड निर्माण करून ठेवलंय.. सर्व काही अंगावर येऊ लागलेत .. असे जणू काही.. आपण हे सर्व उतरून खाली अलोत हेच  मनी पटेना.. डोळ्यात  सह्याद्रीचा  हा पॅनोरमा बसेना कॅमेरात काय घंटा बसणार.. गावातील दत्त  मंदिरात  थोडावेळ पडी घेतली . इथून बस नि जाऊ  वाघेऱ्या पर्यंत असा निर्णय झाला ..  मग काय निव्वळ टाईमपास सुरू.. गाव तिथे यस टी या संकल्पनेचा प्रचंड राग आला  .. मला चालतच जायचं होतं..  पण काय करणार  पोरांची अवस्था ही तशीच झालेली .. तावणार उन्ह , पाणी नाही , पाठीवर ओझं , आणि त्यात मला आणि सुरेंद्र दादाला सोडून सर्वांचा पहिलाच इतका मोठा ट्रेक .. छोटेमोठे ट्रेक झालेले पण रेंज ट्रेक तसा नव्हता झालेला...  गावात यस टी संध्याकाळी 7 ला होती .. त्याची वाट पाहत बसलो खरे .. पण गावात यस टी यायचे नावच घेऊन.. शेवटी आली पण न थांबताच  गावातील झाडाला वळसा मारून पुन्हा आल्या मार्गाने निघून गेली.. पोरांची तोंड पाहण्यासारखी झाली होती.. गावातील लोकांनी आणखी एक पर्याय पुढे केला. डोहाजवळ जी बस येईल त्या बसने जावा.. चलो चले म्हणत डोहाजवळ पोचलो ..  तो नजारा पाहून एकतरी  मुक्काम  इथे झालाच पाहिजे असं मन सांगत होत .. सगळ्यांची हीच तीव्र इच्छा  आणि  या सह्याद्री च्या  अप्रतिम  नजराण्याने शेवटी मुक्काम घडलाच...  दादा नि  अवधूत नि पुन्हा गावात जाऊन जेवण बनवून आणले ..राहुल व मिहीर नी  चहा बनवला .. चहा हुन सुख ते आणखी काय तेपण स्वतः बनवलेला . वा..... मजा आआआआआ गया.. भयाण शांततेत घळवलेली रात्र , घाबरलेला राहुल , काळमिट्ट  अंधार आणि दादाने परत यायला केलेला वेळ हे सर्व पुढील भागात .. तोपर्यंत  सिंगापूर नालीतच  सर्वांची भूत आणि मन , व पाय भटकूदेत ....…


राजगढ़ ते रायगढ़  वाचनासाठी खालील लिंक वर  क्लीक करा 
click  इथे करा 







भटकंती करताना हे नेहमी लक्षात  ठेवा





Sunday, 11 June 2017

प्रवास २ राजधान्यांचा .. राजगड ते रायगड ( via सिंगापूर ) भाग 1

आज सकाळी कामानिमित्त बाहेर निघतोय ..जाताना बॅग घेतली खूप हलकी वाटतीये, कदाचित मोहिमेचा परिणाम असावा ...
      सतत भास होतोय कि डोक्यावर टोपी आहे ..पाण्यात ओला केलेला टॉवेल , हातात काठी आहे व पाठीवर जड झालेली बॅग आहे ..
    चार दिवसाची शिदोरी ,पोळी , 3 लिटर पाणी , पाण्याचा बाटल्या आणि लोणचं
     सकाळची भयंकर थंडी ,
                     तो थंडगार गारवा ,
दुपारची अंगाची लाहीलाही करणारं कडक ऊन ,
आणि रात्रीच जागरण ।।।।
                     रात्रीची तंबूत काढलेली रात्र ,
ती स्मशान शांतता .......
       नदीतील थंड पाण्यात केलेली अंघोळ , सकाळचा चहा ,राहुलने केलेली चुलीवरील मॅगी , सुरेंद्र काकांनी दिलेली हाक ( चला रे कार्यकर्त्यांनो ), मिहिरचा ओसंडून वाहणारा उत्साह व अवधूत आणलेला ( life saviours चिवडा ) आणि डेपाळलेला मी

रायगड 


 बर  असो थोडस आपल्या सह्याद्री विषयी : - 
                                                    सहयाद्रीने मला काय दिले हे विचाराल तर ..आज जे काही थोडेफार धाडसाने करतोय ती या सह्याद्रीचीच कृपा ..सह्याद्री प्रत्येकवेळी नवीन काहीतरी देतोच ..स्वावलंबन ,प्रसंगावधान ध्येय , चिकाटी ,निसर्गप्रेम असे अनेक पैलू माझ्या आयुष्याला वेळोवेळी पडले . जगणाच्या एक वेगळाच अर्थ जणू कथित करून गेला ..आम्ही आताच पायदळ घातलेल्या गुंजन मावळातील व शिवथर खोऱ्यातील क्षण , मनी साठविलेले एक एक दृश्य, जगलेला एक एक क्षण अजून सुध्दा ताजाच आहे .सर्व क्षण सर्रकन ......।।।। डोळ्यासमोरून जातायेत ..इथल्या रौद्र सौन्दर्यात, रांगडेपणात एक विलक्षण शक्ती आहे ...एकदा का तुम्ही या विश्वात सामील झालात कि परतीचे दोर आपोआपच कापले जातात ... जो कुणी येतो तो या जादुई दुनियेत रमून जातो .... # पण एक मात्र सर्वांनी नेहमी लक्षात ठेवावं आत्मविश्वास असावा साहसीपणा असावा पण आततायीपणा नको ।।आपण जिथे जातो तिथे आपल्या आठवणी शिवाय काहीही मागे ठेवू नये #
      भटकंती म्हणजे फक्त शरीराचा व्यायाम नव्हे .तर हा एक सर्वोत्तम मार्ग आहे . जेणेकरून तुम्ही आम्ही निसर्गाशी एकरूप होऊन जाऊ ..नियमित भटकणाऱ्या ना विचारलं जग कसे आहे ... सर्वांचं एक उत्तर येईल सुंदर ...
              अशीच गुंजन मावळात विसावलेला राजगड , तोरणा . एक अभेध्य सुळका लिंगाणा आणि शिवथर खोऱ्यातील स्वराज्याची आपली राजधानी रायगड .. अशी 4, 5 दिवसाची भटकंती साध घालत होती .. माझे तसे 2 हेतू होते ... एक तर 4 जून ला होणाऱ्या ( ना भूतो ना भविष्यती ) अश्या 32 मन सुवर्ण सिहांसन पुनर्र स्थापनासंकल्प सोहळा सोहळा श्री रायगडावर होणार होता ..त्या सोहळ्याचे आमंत्रण श्री राजगडाला द्यायलाच। हवे .कारण ती स्वराज्याची पहिली राजधानी .कदाचित राजगड हि रायगडाकडे डोळे लावून बसला असेल .त्यामुळे राजगड ते रायगड पायी भ्रमंती चा संकल्प केला . दुसरा हेतू असा की गेल्या काही महिन्यात सह्याद्रीच्या कुशीत विसावलो नव्हतो .त्यामुळे ती सुद्धा खल भरून काढायची होतीच..
सुरुवात 


          4 जून च्या सोहळ्याला उपस्थित राहायचे असलेने 30 तारखेला सुरुवात करणे क्रमप्राप्त होते . पण काही कारणास्तव 31 मे ला सुरुवात करायची असे ठरले . आम्ही पाठीवर बोजे घेऊन सकाळी स्वारगेट  बस स्थानकावर डेरे दाखल झालो.. कोण कुठले ५ भटके फक्त सह्याद्री प्रेमापोटी व भटकंतीच्या वेढामुळे एकत्र आले.. . सकाळी ८ ची वेल्हा लागली आणि आमचा श्री गणेशा झाला .. वैदेही ची रजा घेऊन पुढे निघालो .. ( वैदेही , राहुल , मिहीर हे माझे पुण्यातील भटके मित्र , यावेळी राहुल, मिहीर सोबत येत होते पण वैदेहिची आमच्यासोबत यायची प्रखर इच्छा असूनही जमले नाही ... नेक्स्ट time नक्की जाऊ असे सांगून निरोप घेतला) ..
          बस हळू हळू कात्रज चा घाट ओलांडून सुसाट वेगाने नसरापूर highway ला लागली.. मधेच कात्रज ते सिहंगड ट्रेक च्या आठवणी जाग्या झाल्या .. पण आता सिहंगड कधीही पाहायचा नाही हे ठरवले आहेच ..राव पर्यटन स्थळ करून टाकलाय ( गडकोट हे पर्यटन स्थळ ? कल्पना पण करवत नाही) असो ९.३० ला मार्गासनी उतरून एस.टी ला  $ जय महाराष्ट्र $ केला ... इथून डावीकडे एक वाट जाते ती राजगडा कडे .. अजून ३ मैल लांब गुंजवणे हे पायथाचे गाव .. त्यात पूर्ण डांबरी रस्ता.. वाट लागतो पायाची .. या येत्या काही दिवसात आम्हाला प्रत्येक गड जगायचं होता.. त्याचं इतिहासात रमून जायचं होतं...
गावगावत चालू असलेली मशागतीची लगभग ( चाहुल मेघ सरींची )

11 वाजता गुंजवणे गावात पोहचलो . त्याचा पायथ्याला चिकटलो न वरती पाहिलं .. बस्स्स.............आपण या सह्याद्रीचा अगंधपणापुढे किती शूद्र आहोत याची पुरती जाणीव झाली. या सह्यशिरेचा स्वामी शिवशंकर आहे . सह्याद्रीच्या गिरीशिखरावर शंभू महादेव ठाण मांडून बसला आहे.. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक ,भौगोलिक जडण-घडणी मध्ये सह्यगिरीचे स्थान अलौकिक आहे.. लिहिण्यासारखं बरंच काही आहे ..पण नंतर लिहीन यावर कधीतरी
सहभागी भटके अणि मागे अभेद्द राजगड 

          आम्ही गुंजवणे हुन चोर दरवाजा वाटेवरून सुरुवात केली . मागच्या वेळी शॉर्टकट मार्गाने गेलेलो ती वाट सापडली नाही . अक्षर:श्या जंगलातून, काट्याकुट्यातून वाट काढत निघालो.. मूळ वाट डोंगरधारेवरून जाते., आम्ही मात्र डोंगराच्या बाजूने उन्हाच्या झरोळ्यातून घसरांच्या वाटेवर पोहचलो . अंगाची लाहीलाही करणारे कड़क ऊन , भरकटकेली वाट आणि नजरेत च धडकी भरणारा राजगडाचा डोलारा . सुरुवातच खडतर झालेली . सह्याद्रीने आपला कौल दाखवायला सुरुवात केलेली अजून खूप काही बाकी होत. आपला चांगलाच कस लागणार हे एव्हाना कळून चुकले . लक्ष होते पद्मावती माचीवर निघणारा चोर दरवाजा, डाव्याबाजूला प्रचंड सुवेळा माची त्यात असलेलं नैसर्गिक नेढ, समोर पद्मावती माची आणि त्यामागे असलेला अभेद्य बालेकिल्ला .. काही वेळाने पाणी पिऊन ताजेतवाने होऊन पायपीट सुरु केली . काही वेळात थोडासा चढ चढून गेलं की एक घसारा लागतो ..
राहुल राजे घसारा पर करताना टॉप स्पीड मधे 

इथून मात्र वरपर्यंत वाट दिसते ..पण इथून पुढे फक्त चढाईचा मार्ग ..पुरती दाणादाण उडते... एक लक्षात घायला हवे .हा राजगडाचा। राजमार्ग नसून चोरवाट आहे. कुठे गर्द कारवी च अरण्य तर कुठे बोडकी झाडे ..इथे एक पाण्याचे टाके आहे..
राजगाड चोर दरवाजा मार्गावर विसावा 
इथून ६० फूट वर तटबंदीमध्ये लपला आहे तो चोर दरवाजा .
 सुरेंद्र काका ( चोर दरवाजा मार्ग ) सुरक्षिततेसाठी रेलिंग 
वरपर्यंत पायऱ्या आहेत.. एका बाजूला दरी तर दुसऱ्या बाजूला उभा कातळकडा ...इथून दिसणारे दृश्य विहंगम च आहे.. आता सुरक्षिततेच्या दृष्टीने रेलिंग लावले गेलेत.. आत गेल्यावर ९० अंशात वाट डावीकडे वळते
निसर्ग सौंदर्य



चोर दरवाजा मधून जाताच ९० % वरती जाणाऱ्या पायऱ्या 






.जवळपास 10 ते 15 पायऱ्या चढून वर गेल्यावर पद्मावती तलाव लागतो .सध्या इथे पर्यटक निवासस्थान आहे पण।।।खूप गलिच्छ त्यामुळे आम्ही पद्मावती देवी मंदिरात बैठक मारली ..तिथे भेटलेल्या कचरे काकू कडून चहा घेतला. शिदोरी सोडली... वेळ फार कमी असलेने लगेच किल्ला पाहावयास गेलो. पण दुपारी ४ वाजताच भन्नाट वारा, गडद धुकं त्यामुळे सारा गड झाकोळला गेला... निदान सूर्यास्त तर पाहता येईल अशी भाबडी आशा ठेवत बालेकिल्ला गाठला.. जाता जाता राहुल ला आम्ही उद्या जिथून जाणार आहोत तो संजीवनी माचीचा मार्ग दाखवला... त्याची तिथेच तरतरलेली..कारण प्रचंड धुकं.. त्यात पुढे काहीच दिसतं नाही .जेमतेम 1 फुटाची पायवाट .. हे बघून कुणाचीही अशीच अवस्था होईल.. ज्यावेळी मी पहिल्यांदा आलेलो त्यावेळीही माझी अवस्था याहून काही वेगळी नव्हती आम्ही तर रात्री 3 वाजता पार केला होता...बालेकिल्ला फिरून ( फक्त दरवाज्याला स्पर्श करून म्हणा ना) कारण बालेकिल्ल्याचा मार्ग हि खडतर .आणि त्यात थोडा जरी अंधार पडला तर अवघड ..त्यामुळे माघारी आलो.. काही काळ सदरेजवळ बसून देवळात परत आलो... प्रचंड वाऱ्यामुळे आमचा मॅगी चा बेत बारगळला त्यामुळे घरातून आणलेलं अन्न खाऊन मंदिरातच तंबू टाकला.... बाकीचे मंदिरात असताना... सहजच बाहेर पडलो... पद्मावती मंदिराच्या मागे माचीच्या तटबंदीत नाग राजांनी दर्शन दिलं.. ( इथे साप आहेत हे कुणालाच कळून दिलं नाही ..आधीच भीती होती हे आणखी कश्याला , त्यामुळे खबरदारी म्हणून मी राहुल, मिहीर ,अवधूत बरोबर फिरलो कुणालाही अजून देखील माहिती नाही मी का त्याच्या मागे पुढे फिरत होतो, आता कळेल म्हणा)




गड सर केल्याचा आनंद 

बालेकिल्लावरील दरवाजा 

बालेकिला व्  संजीवनी माची कड़े जाणारा मार्ग 

राज सदर ( त्याचे जीर्णोंदार सुरु असलेले काम )

        राजगड पाहायला किमान ३ दिवस हवेत , एक दिवस बालेकिल्ला, एक दिवस सुवेळा माची, आणि एक दिवस संजीवनी माची असा प्लॅन केला तर राजगड किती अभेध्य आणि बेलाग आगे याचा थोडासा प्रत्यय येईल ..रात्री झोपी जायच्या आधी उद्या सकाळी उजाडलं कि निघू रे असा विनंती वजा फर्मान सोडला..
कचरे  काकू ,आजी   आमच्या मुक्कामाचे ठिकाण 


   दिवस दुसरा --  आज सकाळी पहाटे ५ वाजता उठून संजीवनी माचीवरून अळू दरवाजा ने तोरणा जवळ करण्याचा हेतू होता.. कारण तब्बल 6 तास  पायपीट करून ते साध्य होणार होत.. पण सकाळी काहीच दिसेना ... टॉर्च च्या प्रकाशात फक्त 3 ते 4 फूट दिसेल अशी चिन्हे ..त्यात काल जे काही पाहिलंय त्यामुळे ही पोर इतक्या लवकर चालायला सुरुवात करतील हे शक्यच नव्हतं... सकाळी राहुल ने मॅगी केली . घरात गॅस चा वापर करणारा आज स्टोह च्या मिणमिणत्या ज्वालेतून मॅगी बनवली , आमचा मॅगी शेफ याने या भटकंतीत , स्टोह, चूल अश्या सर्व पद्धतीने मॅगी उत्तम बनवली ..असो सकाळी बाहेर पडायला ७ चा मुहूर्त सापडला .. कचरे काकूंना बिदागी दिली ..त्याआधी देवीला साकडे घालून संकल्प सोहळ्याला यायचं निमंत्रण दिले ..
थोडीशी फोटू ग्राफी welldone राहुल 


पद्मावती मंदिर पासून संजीवनी माची पर्यंत यायला 40 मिं लागली. पण नेमका " अळू दरवाजा " सापडेना .. कुठे धुक्यात लपून बसलेला काय माहिती .. शेवटी मी , राहुल , मिहीर ने खालून तटबंदी पालथी घातली आणि सुरेंद्र काका , अवधूत ने बुरुजाच्या डावी बाजू पालथी घातली... काही वेळाने शोधलाच .. नवख्या भटक्याला सापडणे थोडे अवघडच..फोटू काढायच्या वेळी मात्र सुंदर दर्शन दिले..
आम्ही ५ भटके  आणि मगे (अळू दरवाजा ) 

गडावरील जास्त घनतेमुळे सकाळी 8 लाच कपडे  ओलेचिंब झाले.. पुढे तर घामामुळे असंख्य वेळा स्नान झालेच.. तोरण्यावर जाणारी पायवाट पूर्णपणे मळलेली आहे त्यामुळे वाट चुकण्याचा प्रश्न नाही ...एक छोटासा रॉक patch उतरून वाट मस्त गर्द वनराईतुन जाते..

मि अणि सुरेंद्र काका अणि मागे सहयाधारेवरून जाणारी मळलेली पायवाट  

मस्त वनराई ( खिंडीकडे जाणारी वाट )

                         
सुंदर रस्ता  



 तिथून पुढे वाट खिंडीत उतरते.. वाटेत मस्त करवंद हाणली.रस्तावरच काही काळ विश्रांती घेतली ... वा असा रस्ता आणि मस्त आल्हाददायक वातावरण ...अलीकडेच शासनाने वन्य प्राण्यांसाठी पाणवठे तयार केलेत इति काका.. मला तर काय दिसलं नाही पण काकांना दिसला ..असो नंतर तोरणा जवळ करून उतरलो दुपारचे २ वाजलेले होते .इथून पासली फाटा अजून २ प्रहर लांब (अदमासे 6 तास लागणार )पण( देवा घाणेकर) दादाशी फ़ोन वर बोलणे झालेल त्यामुळे त्याने दिलेला सल्ला विचारात घेतला ..त्याने एक जवळची वाट सांगितली.. शेणवड गावी जाऊन मग पुढे पासली फाटा.. ती वाट शोधावीच लागणार होती.. शेवटी डोंगरधारेवरून पश्चिमेला पाहिलं गाव दिसेल तिकडे जायचं असं एकमत झाले.. पाण्याची कमतरता .. जवळपास 15 लिटर पाणी असूनही ( प्रत्येकी 3 लिटर ) आणखी खूप गरज होती.. शरीर त्याहूनही जास्त टॉक्सिक पाण्याचा स्वरूपात बाहेर फेकत होतं.. काही वेळाने उजवीकडे खाली डोंगरमाथ्याला एक गाव दिसले ..थोडा जीवात जीव आला. ओढे ,नाले, दऱ्या पार करत कसेतरी पोहचलो ..येताना पडून लोटांगण घालण्याचे ओपनिंग मीच केलं.. ओपनिंग बॅट्समन चा मान मलाच मिळाला...पोहचलो खरे पण पुरता दम निघाला , घसा पार सुकला होता आणि हृदयाचे ठोके तर ५ वा गियर टाकून फुल स्पीड ने पळत होते.. थोडेजरी over speed झाले असते तर direct यम सदनी होतोच.. गावात पोहचलो खांद्या वरची बॅग उतरवली आणि तसाच बसलो.. सर्वांची तशीच कंडिशन होती.. सर्वांची लागलीच होती. पण तरीही मिहीर ,राहुल ला गावात विहीर शोधायला पिटाळले. पण विहिरीत पाणी मात्र नव्हते..पण गुहिनी गावातील सखुबाई गुहिनी (आजींनी )बोलवून पोटच्या पोराप्रमाणे विचारपूस केली.. पाणी पाजलं.. त्या स्वतः मैलोमाईल लांबून कुठून तरी विकत पाणी आणतात
गुहिनी गावातील ( सखुबाई गुहिनी )

 मागे राजगढ़ ( लोकेशन शोधवी लागेल )

पण आम्हाला निर्मल मनाने पाणी देऊ केलं.. गावातील माणसाचं निराळी.. आजीच्या घरी जेवण करून निघालो.. इथून पूर्ण डांबरी रस्ता ..मेघ पण दाटून आलेलं.. कुठेतरी शंकेची पाल चुकचुकली पाऊस पडला तर कसला ट्रेक आणि कसलं काय।।।पन सुरेंद्र काकांनी दिलेल्या आत्मविश्वासाने सांगितलं ...( अरे चला आपल्याला निसर्ग पूर्णपणे साथ देणार अगदी रायगड ला पोहचत नाही तोपर्यंत ) ..आणि झालेही तसंच.. वाटेत कंटाळा यायचा प्रश्न नव्हता.. सुरेंद्र काकांनी केलेल्या भटकंतीचे किस्से, मी केलेल्या ट्रेक अनुभव ,राहुल मिहीर केलेल्या गमती जमती मध्ये संध्याकाळी 6 ला पासली गावात पोहचलो ..


तिथे मस्त 2-2 कप कोरा चहा घेऊन वरोती ला मिहिरच्या काकांकडे जाऊन काही सोय होते का असं ठरवून निघालो. इथून दीड मैला वर ( 4 कमी) आहे अशी माहिती मिळाली.. अजून २ तास पायपीट ..आधीच गेले १२ तास पाठीवर ओझे घेऊन फिरतोय त्यात आणखी २ तास ...पासली फाटा हुन एक रस्ता डावीकडे हरपूड, वरोटी ला जातो तर सरळ मार्ग वेल्हा ते केळद खिंडीतून भोर ला जातो ...वरोटीचा रस्ता गर्द जंगलातून जाणारा ..पूर्ण चढाईचा ..घाट रस्ता.. रात्री अनुभवलेली स्मशान शांतता आम्ही फक्त ५ भटके आजूबाजूला फक्त गर्द काळोख त्यात एक आसरा आमच्या टॉर्च चा मिन मिनाता उजेड . पण असंख्य काजव्यांनी आमचे यथासांग स्वागत केले... पाहता क्षणी सगळा दिवसभराचा क्षीण कुठल्याकुठे निघून गेला...अहा ....काय ते दृश्य वर्णावे ..माझ्याकडे शब्द च नाहीयेत.. असो वरोती गावात रात्री 9 ला पोहचलो .. गावातल्या विठठल मंदिरासमोर बसलो.. काही नाही झालं तर झोपायची जागा आहे असे ठरवून टाकले.. पण मिहिरने " शिळीमकर काकांकडे भारी सोय केली.. अगदी रात्री ९ ला अंघोळीची पण सोय झाली... त्यांचा नवीन बांधलेल्या घरात आमची सोय झाली..
विसावा 


मस्त घरी झोपतो तशी गादी , अंथरून पांघरून अशी सागरसंगीत सोय झाली.. झोपेच्या सोयीचा तसा प्रश्न नव्हताच अगदी रस्तावर पण झोपायची तयारी असते आपली ..पण  दिवस तसा सार्थकी लागला आमचं 2 दिवसाचं अंतर आम्ही एका दिवसात पूर्ण केलं.. रात्री पाठ टेकली आणि जो पाऊस चालू झाला .थांबलाच नाही .मेघ पण वाटच पाहत होते ..आम्ही सुखरूप पोचतो कधी आणि सरी कधी बरसतात कधी..

                                                                                            -----  Pranav Ajit Mangurkar


क्रमशः  भाग २ लवकरच 



सहभागी भटके --




 

















                                           








                    भटकंती करताना हे नेहमी लक्षात ठेवा  




१ ) हा ट्रेक करताना  आपल्या मुक्कामाचे ठिकाण 
आधी निश्चित  करा 
२) अंतर खुप असलेने  योग्य नियोजन करूनच निघा 
३ ) वाटेत पानी मिलाने खुप अवघड आहे। त्यामुळे पानी जपून वापरावे 
४) निसर्गाचा समतोल `राखा। 



.