सह्याद्रीतील अशी ३६० सेकंद . ज्यासाठी किमान एक - दीड वर्षे खर्ची गेलीयेत ,ती ३६० सेकंद एका अवलिया भटक्यांसाठी, उकृष्ठ कलाकारांसाठी सह्याद्रीने मंतरलेली निसर्गरूपी चादर च ..
आपण आज या प्रवासात कोणत्याही गडकिल्ल्यावर वा घाटवाटेत विहार करणार नाहींआहोत तर सह्याद्रीशी प्रामाणिकपणे केलेल्या कार्याचा मागोवा घेणार आहोत , चला तर मग सफर करूया निसर्गाच्या कलाकुसरीची... आणि कलाकाराच्या कार्याची
आपण आज या प्रवासात कोणत्याही गडकिल्ल्यावर वा घाटवाटेत विहार करणार नाहींआहोत तर सह्याद्रीशी प्रामाणिकपणे केलेल्या कार्याचा मागोवा घेणार आहोत , चला तर मग सफर करूया निसर्गाच्या कलाकुसरीची... आणि कलाकाराच्या कार्याची
आज थोड्या वेगळ्या विषयाचा मागोवा घेतोय , बऱ्याच जणांना अजूनही प्रश्न पडला असेल हा सारखा ३६० चा जयघोष करतोय पण ते नेमकं काय . तर ही छोटीशी ६ मिनिटांची सह्याद्रीच्या कलाकुसरीची शॉर्टफिल्म . एक भटका जिवलग मित्र अनिकेत कस्तुरे याने एका ध्यासाने केलेली प्रायोगिक तत्वावर केलेलं चित्रीकरण . आज त्याने केलेल्या अथक परिश्रमाचं फळ आज 10000 लोकांच्या नजरेत दिसतंय . एक छोटी पण अतिशय महत्त्वाची एक पायरी आज सर झालीये त्याच या सह्याद्री पार्ट1 या चित्रफितीचा हा घेतलेला मागोवा .....
आपला सहयाद्री हा खऱ्या अर्थाने पर्वत नसून ती दख्खन पठाराची विभंग कडा आहे . सह्याद्रीला संपूर्ण जगात सह्याद्री या त्याच्या अस्तित्व रुपी नावाने लौकिक जिवंत ठेवणे त्याचे अवर्णनीय सौन्दर्य कॅमेराच्या माध्यमातून चित्ररूपी रुपात रंगवणे हेच ध्येय । ध्यानी मनी फक्त हाच वसा घेऊन सुरुवात केली खरी , पण कोणतेही काम अगदी सहज सुलभतेने झाले तर त्याची कष्टाची चव चाखता येत नाही . अनिकेत पुढे तर एक भली मोठी कोकणकडया सारखी अभेध्य मोठी भिंत उभी होती . असंख्य अडथळे ,खाच खळगे हे सर्व परिक्षा घेण्यासाठी उभे होतेच .
सुरुवात झाली ती ज्येष्ठा मेघांनी पण तोच सर्वात मोठा अडथळा ....( एखाद्य शिल्प आपल्याला प्रचंड भावतं खर . पण त्यामागील कथेचा आपण कधी जाणीवपुर्वक विचार केलाय का . हा पण एक संशोधनाचा विषय असो . त्या कालाकुसरीला रूप देणारा तो म्हणजे शिल्पकार आणि त्याचे हत्यार . ) .....सह्याद्रीला चित्रफितीत कैद करण्यासाठी छायाचित्रकाराचे हत्यार ते म्हणजे स्वतः च्या जीवापेक्ष्या प्रिय असा त्याचा कॅमेरा .. म्हणून मी ज्येष्ठा च्या मेघांना सर्वात मोठा अडथळा म्हणालो . पावसात कॅमेरा घेऊन चित्रीकरण करणं हे खुप मोठं दिव्य काम म्हणता येणार नाही ...बरेच जण म्हणतील त्यात काय एवढं सेफ्टी घेऊन चित्रीकरण करायचं पण सह्याद्रीच्या नभांसोबत हे असला वेढ धाडस करणं हे काही खायचं काम नाही. सह्याद्रीच्या अनवट पायवाटा तुडवायच्या तेपण सगळा संसार घेऊन . सोबतीला एकमेव साथीदार तो म्हणजे सह्याद्रीच त्याचा तो मित्र कोसळणारा प्रचंड पाऊस आणि निसरड्या वाटा ...
यापुढील behind the scenes अनिकेत कडून ऐकलंय आणि पाहिलंय .. त्याचेच शब्दांकन माझ्या शब्दात ... हे असे …....…
नुकतच भटकू लागलो होतो . कोणतरी फोन करावा .. येतोयस का इकडे चाललोय तिकडे चाललोय भटकायला .. आपण always रेडी . बॅग तर तयारच असते . जरा खाऊ टाकला पाणी भरून घेतलं. की ठोकली ना धूम...... पण आता एका संकल्पपूर्तीसाठी प्रयत्न करायचे व संकल्प सिद्धीस घेऊन जायच . हाच ध्यास असलेने योग्य नियोजन करणे भागच होते. पहिला कॅमेराच्या गौडबंगाल मोठं... कॅमेरा क्रॉप सेन्सर .. त्यावर फुल्लफ्रेम चा result काढायचा प्रयत्न. त्यासाठी करावे लागणारे जुगाड .. त्याची सोय करायची. प्रवासासाठी स्वतः ची गाडी नाही ... मग" गाव तिथे एस टी " ही संकल्पना आपल्यासाठी च . याची चांगलीच जाणीव झाली . सगळा संसार सोबतीला घेऊन महामंडळाच्या एस टी चा प्रवास हेपण एक मोठं दिव्य.. त्यात त्या वर्षी पावसाला पण प्रचंड चेव चढलेला .. तो काय विश्रांतीचे नावच घेईना. त्या पावसाने कॅमेराला कवेत घेतला की झालं तर . अख्ख आयुष्य टांगणीला. करिअर वरच पाणी .. फिरायचं . असे नानाविविध प्रश्न सोबतीला होते.
वर्षभर हळूहळू . सर्व छायाचित्रण पूर्ण केलं. त्या संपूर्ण वर्षात .. जे काय काय भोगलंय. ते आठवलं तरी आजही अंगावर काटा येतो. धड आपण खुप कामवतोय असेही नाही.. पैसे नसताना पोटाला चिमटे काढून दिवस काढले. टेंटशिवाय काढलेली भरपावसातील काळरात्र ..पावसात भिजल्याने आलेलं आजारपण त्याचेही औषध सह्याद्रीतच शोधल. त्यातच पोटापाण्यासाठी चाललेली धडपड.. या सर्वांचे फलित आपल्या समोर आहेच.
Back to my words .....
आज हे आपल्या समोर मांडतोय याचं कारण . या व्हिडिओने 10000 चा पहिला टप्पा पूर्ण केला तो एक आनंद दाई क्षण आणि एका कलाकाराला एका वेगळ्या पद्धतीने दिलेली दाद म्हणा ना .. आज आम्ही या अनिकेत घेतलेल्या ध्यासाला सोबत करतोय ... सोबतीला बरेच मित्र आहेत , माझेही एक खूप वर्ष्यापासूनचे स्वप्न पूर्णत्वास जातंय .. आम्हाला यापुढे ही अशीच साथ हवी .. तुमच्या पाठवळाची , तुमच्या आधाराने उत्तम पद्धतीने सह्याद्रीतील मृगजळ रुपी अद्भुत सौन्दर्य आपल्या समोर घेऊन येऊ ...
धन्यवाद अनिकेत आमच्या स्वप्नांना मार्ग दाखवून आकाश मोकळे केल्याबद्दल ... सह्याद्री 1 मधील आणखी 2 कलाकार त्यांच्याशिवाय काही गोष्टी अपूर्ण होत्या ते म्हणजे हृषीकेश गंगन आणि आनंद पांडे ..
.. सहयाद्री देवतेला नमन करून चला आपली रजा घेतो,
--- शब्दांकन ( प्रणव मांगुरकर)
टीम मेंबर - मिलिंद दीक्षित , आर्या कस्तुरे , वैदेही नेने , गोमटेश , दीपाली , सिद्धेश कुरपाने, अनिकेत कस्तुरे , प्रणव मांगुरकर )
--- शब्दांकन ( प्रणव मांगुरकर)
टीम मेंबर - मिलिंद दीक्षित , आर्या कस्तुरे , वैदेही नेने , गोमटेश , दीपाली , सिद्धेश कुरपाने, अनिकेत कस्तुरे , प्रणव मांगुरकर )
एवढं बोललो सह्याद्री १ बद्दल तर एकदा त्याचीही सफर करूनच जाऊ मग क्लिक करा -SAHYADRI PART 1
Keep exploring भटकेहो .......
कुठेही भटकंती किंवा पर्यटनासाठी जातांना खालील गोष्टी अनुसरण करा ( सह्याद्री ट्रेककर ब्लोगेर्स )
Keep exploring भटकेहो .......
कुठेही भटकंती किंवा पर्यटनासाठी जातांना खालील गोष्टी अनुसरण करा ( सह्याद्री ट्रेककर ब्लोगेर्स )
उत्तम...अजून लिहिते राहो आणि भटकते राहो...खूप खूप शुभेच्छा तुम्हा सर्व टीम ला....
ReplyDeletedhanyawad
Deleteमस्त रे प्रणव आणि अनिकेत.. पुढील सफरीला मला ही अनुभव घ्यायचा आहे 😀😇
ReplyDeleteखूप शुभेच्छा
kadhipasun bolavtoy,, chal shoot/trek la tuch yet nahiyes
Deleteसह्या भटक्याची पावले प्रथम डोंगराकडे वळतात...
ReplyDeleteत्याच्यावर तिथल्या इतिहासाचं गारूड निर्माण होतं...
मग तो शिवइतिहासाच्या अंगाने सह्याद्री बघू लागतो, आणि त्याने त्याला आपणच योद्धे असल्या सारखे वाटू लागते...
त्यानंतर त्याला तिथल्या निसर्गाची भूरळ पडते...
सह्याद्रीतला भूगोल अंगात भिनू लागतो आणि एक एक डोंगर...नदी...दर्या...रांगा...गावे...थांबे...हॉटेल्स...वाटाडे...ससगळे त्याचे सवंगडी बनू लागतात...
मग तो लिहू लागाते...फोटो काढू लागाते...संशोधकयही होतो मग तो! तुमची वाटचाल अशीच सुरू आहे...
सह्याद्रीत कॅमेरा नावाचं बिर्हाड घेऊन फिरणं कशाला म्हणतात, हे ज्याचे त्यालाच ठाऊक...
तुम्ही वर्ष दिड वर्ष सह्याद्रीत कॅमेरा घेऊन भटकलात...यातच सगळी मजा आली...
मी अजून तूमचा लघुपट बघितलेला नाही, पण तुमच्या भटकंतीची कल्पना आमच्याच अंगात रोमांच उभी करते...
मी स्वत: अनेक वर्ष सह्याद्रीत कॅमेरा वापरलाय...ज्यांना वाटत असेल ना, कॅमेरा भिजला तर काय होतं...तर माझ्या कॅमेर्यांने अनेक जलाभिषेक घेतले...दहा वर्षात...दोन एक वर्षांपूर्वी पन्हाळगडापासून त्याची शेवटची धुगधूगी जाणवू लागली होती...तीन दिवस विशाळगडापर्यंत तो धुगधूगत राहिला व अखेर त्याने मान टाकली...तो अजूनही माझ्याकडे आहे आणि आता खाईन तर तुपाशी, या उक्ती प्रमाणे फुलफ्रेमची प्रतिक्षा आहे...त्यामुळे माझा एक लघुपट काही सा रखडलाय...पण उधार पाधार कॅमेरा आणून तो यंदा पुर्ण करण्याचा इरादा आहे...
तुमच्या अशाच प्रयोगशील उपक्रमांसाठी अनेक शुभेच्छा!