Friday, 2 February 2018

प्रवास 2 राजधानांच्या राजगड ते रायगड ( via singapur ) भाग दुसरा



       
सह्याद्रीचा अप्रतिम पैनारोमा 



राजगड पासून  सुरू झालेली पायपीट वरोती ला येऊन थबकली .  सह्याद्रीच्या  काळ्या पाषाण दगडावर  आजवर  खूपवेळा  विसावा घेतला पण  आज  सह्याद्रीने  जणूं  हिरवी चादर घालून स्वागत केले ,  याआधी भ्रमंती करताना कधीही निवांत पणे सोय झाली नव्हती पण आज ती अनुभवली , आज झालेला सारा शीण कुठल्या कुठे निघून पळून गेला , रात्री सह्याद्री  ने  आम्हा ५ मावळ्यांना एक सुरक्षित छप्पर दिले मगच त्यांने  पावसाला  भूमी चिंब करायची  परवानगी दिली , रात्रभर  भर  पावसात  अडकलो असतो रायगड ला साद घालणे अशक्यच होते .. पण त्याची कृपा होतीच ,  पूर्ण रात्र  पावसाने  साऱ्या  पंचक्रोशीला  न्हाहून टाकलं , उद्या सकाळी बाहेर पडायचं की नाही यावर  शिक्का मोर्तब काही केल्या होईना , इतक्या प्रचंड जोरदार  धारा , सोबतीला  सोसाट्याचा वारा , पाऊस वेळेत थांबला पण पावसाने खुप आव्हाने पुढ्यात वाढून ठेवली  ,  गावातील काकांनी तर गाडीने  जा असा  सल्ला  वजा  इशारा दिला , पण गाडीने जाणारे भटके कसले त्यात तब्बल 3 महिन्यांनी असा  कसदार  तंगडतोड ट्रेक  चालू झाला होता .. पण  काढता  पाय घेतलाच 
वरोति गावामागील ओढ़ा व् बंधारा 

               सकाळी मस्त चहा घेऊन मिहिरच्या काकांसोबत  सोबत गावामागील  नदीवरील पूल  जवळ केला .  कालच्या पावसाने  थोडंफार पाणी  साठलेलं पोहण्याची  तीव्र इच्छा फाट्यावर मारून  नाइलाजाने तिथून निघालो , आज  वेल्हा ला नेमका बाजार असतो त्यामुळे , मोहरी ,एकलगाव , कुसुर पेठ येथील गावकरी  आठवडा बाजाराला  डोईवर सामान घेऊन तुरुतुरु  डोंगर उतरत होते .. अगदी लहान सहान पोर सारं पण आईचा पदर धरून मागे धावत होती ..  तीच गम्मत एक स्फुर्ती देऊन ताजेतवाने करून गेली .. वरोतिपासून सुरू झालेला चड अगदी कुसुरपेठ पर्यंत आहे .. वाटेतुन जातां जाता मागे वळून पहावं , मागे  तोरणा आणि राजगड  आमच्या  वाटचालीवर लक्ष देऊन उभेच ...  काय केल्या  आमचा पिच्छा  दोघांनी ही सोडला नाही .. 
तोरणा राजगढ़ एक फ्रेम मध्ये
कुसुरपेठेचा अंगावर येणारा चढ चढून  वरती आलो .. शिळीमकर काकांचा निरोप घेऊन सिंगापूर  गावाकडे कूच केली ..




काकांनी सांगितल्या प्रमाणे शिवाजी मोरे ना भेटायचं मग ते  येतील 

वाट दाखवायला मग गावात जायचं त्यांचा शोध घायचा असे ठरलं.. वाटेत  एकेठिकाणी शिदोरी सोडली तेवढ्यात मोरे काका पुढ्यातून जात होते .. जसा प्लॅन होता अगदी तसच  चालला होतं.. आमचं काम फक्त एकच काम ओझोवाल्याच ..  बस चलते रहो.. मोरे काकांनी सिंगापूर नालीचा पर्याय पुढे केला ..
भटके अणि सोबतीला \अभेद्य असा लिंगाना 

सिंगापूर नालीचा प्रवेश  


सोबती 
 कालच्या पावसामुळे बोरट्याची नाळ उतरणे  रिस्की होते सो  सिंगापूर चा उतार  चालू झाला .. आमची देपाळलेली चाल पाहता 5 तास  तर हमखास लागणार हे निश्चित ..  माझे अवसान तिथेच गळाले .  पाय दुखत असताना देखील फक्त खाज  या एका कारणासाठी इथवर आलो होतो... शेवटी संध्याकाळी 5 वाजता  सर्वात शेवटी  घाटावरून कोकणात उतरलो .. उतरताना भिकनाल, अग्या नालीचे विलोभनीय दृश्य डोळ्यात साठवत .आलो.. अरेरे थांबा एक  अति महत्वाचा  क्षण राहिलाच . तो म्हणजे आपला  भव्य अतिदिव्य , कातळ सुळका लिंगाणा हो........ आकाश ठेंगणे करणारा .. रायलिंगचा साथीदार .. इथे कधीतरी night स्टे नक्कीच करायचंय ... लिंगाणा 2 वेळा केला .. एकदा दुखापत झाली त्यामुळे निम्म्या तुन सोडून दिला . आणि दुसऱ्या वेळी  पाण्याच्या प्रचंड दुर्भिश्यामुळे राहून1 गेला.. असो ..
दापोली गावातील सुंदर असे दत्त मंदिर 

अक्राळ विक्राळ निसर्ग चमत्कार 

गमती जमती 

कवर फोटोसाठी चाललेली धडपड 

 दापोली गावातील ओढा पार करून मोरे काकांच्या घरी आलो .. पाठीमागे  वळून पाहिले तर  सह्याद्री ने  काय रूपड निर्माण करून ठेवलंय.. सर्व काही अंगावर येऊ लागलेत .. असे जणू काही.. आपण हे सर्व उतरून खाली अलोत हेच  मनी पटेना.. डोळ्यात  सह्याद्रीचा  हा पॅनोरमा बसेना कॅमेरात काय घंटा बसणार.. गावातील दत्त  मंदिरात  थोडावेळ पडी घेतली . इथून बस नि जाऊ  वाघेऱ्या पर्यंत असा निर्णय झाला ..  मग काय निव्वळ टाईमपास सुरू.. गाव तिथे यस टी या संकल्पनेचा प्रचंड राग आला  .. मला चालतच जायचं होतं..  पण काय करणार  पोरांची अवस्था ही तशीच झालेली .. तावणार उन्ह , पाणी नाही , पाठीवर ओझं , आणि त्यात मला आणि सुरेंद्र दादाला सोडून सर्वांचा पहिलाच इतका मोठा ट्रेक .. छोटेमोठे ट्रेक झालेले पण रेंज ट्रेक तसा नव्हता झालेला...  गावात यस टी संध्याकाळी 7 ला होती .. त्याची वाट पाहत बसलो खरे .. पण गावात यस टी यायचे नावच घेऊन.. शेवटी आली पण न थांबताच  गावातील झाडाला वळसा मारून पुन्हा आल्या मार्गाने निघून गेली.. पोरांची तोंड पाहण्यासारखी झाली होती.. गावातील लोकांनी आणखी एक पर्याय पुढे केला. डोहाजवळ जी बस येईल त्या बसने जावा.. चलो चले म्हणत डोहाजवळ पोचलो ..  तो नजारा पाहून एकतरी  मुक्काम  इथे झालाच पाहिजे असं मन सांगत होत .. सगळ्यांची हीच तीव्र इच्छा  आणि  या सह्याद्री च्या  अप्रतिम  नजराण्याने शेवटी मुक्काम घडलाच...  दादा नि  अवधूत नि पुन्हा गावात जाऊन जेवण बनवून आणले ..राहुल व मिहीर नी  चहा बनवला .. चहा हुन सुख ते आणखी काय तेपण स्वतः बनवलेला . वा..... मजा आआआआआ गया.. भयाण शांततेत घळवलेली रात्र , घाबरलेला राहुल , काळमिट्ट  अंधार आणि दादाने परत यायला केलेला वेळ हे सर्व पुढील भागात .. तोपर्यंत  सिंगापूर नालीतच  सर्वांची भूत आणि मन , व पाय भटकूदेत ....…


राजगढ़ ते रायगढ़  वाचनासाठी खालील लिंक वर  क्लीक करा 
click  इथे करा 







भटकंती करताना हे नेहमी लक्षात  ठेवा





No comments:

Post a Comment